AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस नेत्यांची सावरकरांबाबत अपमानकारक भाषा, तेव्हा शिवसेना गप्प का?, राम कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल

काँग्रेस नेते सावरकरांसंदर्भात अपमानकारक भाषा बोलत होते त्यावेळी शिवसेना गप्प का होती?", असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

काँग्रेस नेत्यांची सावरकरांबाबत अपमानकारक भाषा, तेव्हा शिवसेना गप्प का?, राम कदमांचा उद्धव ठाकरेंना सवाल
ram kadam
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 26, 2020 | 8:16 AM
Share

मुंबई :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचे पाठ स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहातून देशाला सांगितले. (Ram Kadam Criticize CM Uddhav Thackeray) मात्र, आमचा प्रश्न एकच आहे, काँग्रेस नेते सावरकरांसंदर्भात अपमानकारक भाषा बोलत होते त्यावेळी शिवसेना गप्प का होती?”, असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला घेरले होते. त्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत (Ram Kadam Criticize CM Uddhav Thackeray).

यावर राम कदम यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरेंवर घणाघात केला आहे. “आज उद्धव ठाकरे हे सर्वांवर टीका करत असताना त्यांना सावरकरांचा अपमान करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी, शिवसेना नेत्यांना चालतात का? सत्ता आणि सिंहासनासाठी सावरकरांचा अपमान शिवसेनेला चालतो? हा खरा प्रश्न आहे, असं म्हणत राम कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

त्याशिवाय, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन त्यांच्यावर पलटवार केला. “ज्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी राम मंदिर विरोधकांसमोर गुडघे टेकले; त्यांनी हिंदू मंदिरं, घंटा, हिंदू धर्म, हिंदू पूजा पद्धती, आरतीची चेष्टा करू नये”, असं किरीट सोमय्या म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपर चौफेर टीका केली. मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक जण सरकार पाडण्याच्या मागे आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केला. तसेच हिम्मत असेल तर हे सरकार पाडून दाखवा असं आव्हानही त्यांनी विरोधकांना दिलं. त्यांनतर विरोधकांनाही ठाकरेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे (Ram Kadam Criticize CM Uddhav Thackeray).

संबंधित बातम्या : 

काळी टोपी घालणाऱ्यांनो, सरसंघचालक हिंदुत्वाबाबत काय म्हणतात ते समजून घ्या; उद्धव ठाकरेंचा हल्ला

मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी असेल तर हे मोदींचच अपयश; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मराठा, ओबीसी, धनगर समाज सर्वांना न्याय देईन, मुख्यमंत्री म्हणून वचन : उद्धव ठाकरे

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार