AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रिपद न दिल्याने नाराज, काँग्रेस आमदार पी एन पाटील राजीनामा देण्याची शक्यता

काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर मतदारसंघातील आमदार पी एन पाटील (Congress MLA P N Patil) हे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

मंत्रिपद न दिल्याने नाराज, काँग्रेस आमदार पी एन पाटील राजीनामा देण्याची शक्यता
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jan 01, 2020 | 3:35 PM
Share

कोल्हापूर : काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर मतदारसंघातील आमदार पी एन पाटील (Congress MLA P N Patil) हे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी पी एन पाटील यांच्यावर दबाव आणल्याचं सांगण्यात येत आहे. पी एन पाटील समर्थकांनी घेतलेल्या मेळाव्यात सामूदायिक राजीनामा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर आता आमदार पी एन पाटील (Congress MLA P N Patil) काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात कोल्हापुरातून काँग्रेसने सतेज पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. त्यामुळे पी एन पाटील समर्थक नाराज आहेत.  पी एन पाटील समर्थकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी जाहीर केली होती. काँग्रेस पक्षासोबत तब्बल 40 वर्ष एकनिष्ठ राहूनही मंत्रिपद न मिळाल्याने पी. एन. पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

आमदार पी. एन. पाटील यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये एक तराजू दाखवण्यात आला होता. या तराजूच्या एका पारड्यात पैसे आणि दुसऱ्या पारड्यात 40 वर्षांची पक्षनिष्ठा दाखवण्यात आली होती. यामध्ये पैशाचं पारडं हे जड असल्याने ते झुकलेलं दाखवलं, तर पक्षनिष्ठतेचं वजन कमी असल्याचं दाखवण्यात आलं होतं. हा फोटो अनेक पी. एन. पाटील समर्थकांनी त्यांच्या सोशल मीडियावर स्टेटसला अपलोड केला होता. या प्रकारानंतर सतेज पाटील समर्थकांनीही सोशल मीडियातूनच पी एन पाटील समर्थकांना उत्तर दिलं होतं.

महाविकास आघाडीच्या  मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने तीनही पक्षातील अनेक आमदार नाराज आहेत. काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी तर थेट पुणे काँग्रेस कार्यालयावर दगडफेक केली. हा प्रकार ताजा असताना तिकडे कोल्हापुरातील काँग्रेस आमदार नाराज असल्याचं चित्र आहे.

कोण आहेत पी एन पाटील?

  • पी एन पाटील हे काँग्रेसचे विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत.
  • कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात
  • 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांचा पराभव केला.
  • पी एन पाटील यांचा 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत पराभव झाला होता.
  • पी एन पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपद भूषवलं होतं.

संबंधित बातम्या  

‘एकनिष्ठतेपेक्षा पैशांचं वजन अधिक’, कोल्हापुरात फोटो व्हायरल; पी एन पाटील गट नाराज 

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...