…. तर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मदत नाही, काँग्रेस कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका

बारामती : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं काम करतात. मात्र प्रत्येकवेळी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून दगाबाजी केली जाते. त्यामुळेच आता राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होत असताना लोकसभा निवडणुकांपूर्वी इंदापूरची जागा कोणाला देणार हे जाहीर करावं, अन्यथा आम्ही लोकसभा निवडणुकीत काम करणार नाही, अशी भूमिका इंदापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी समविचारी पक्षांची […]

.... तर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मदत नाही, काँग्रेस कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

बारामती : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं काम करतात. मात्र प्रत्येकवेळी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून दगाबाजी केली जाते. त्यामुळेच आता राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होत असताना लोकसभा निवडणुकांपूर्वी इंदापूरची जागा कोणाला देणार हे जाहीर करावं, अन्यथा आम्ही लोकसभा निवडणुकीत काम करणार नाही, अशी भूमिका इंदापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी समविचारी पक्षांची जुळवाजुळव करत असतानाच इंदापूरच्या जागेवरुन वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनीही याच जाहीर कार्यक्रमात इंदापूर आणि पुरंदरच्या जागेचा निर्णय लोकसभेपूर्वी जाहीर करण्याची मागणी केली.

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असली तरी इंदापूर तालुक्यात हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकतात हे अनेकदा पाहायला मिळालंय. भाजप सरकारबद्दलची नाराजी लक्षात घेता आता राष्ट्रीय पातळीवरुनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. असं असलं तरी इंदापूरच्या जागेवरून मात्र वादंग निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शनिवारी इंदापूर नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचं भूमीपूजन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, रमेश बागवे, आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत पार पडलं. या कार्यक्रमात नगरपरिषदेचे गटनेते कैलास कदम यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी इंदापूर विधानसभेची जागा कोणाला द्यायची याचा निर्णय जाहीर करावा, अन्यथा आम्ही लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचं काम करणार नाही हीच कार्यकर्त्यांची भूमिका असल्याचं जाहीर केलं. काँग्रेसचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं प्रामाणिकपणे काम करतात, मात्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडूनच दगाफटका होत असल्याने इंदापूरची जागा कोणाला हे जाहीर करावं अशी मागणी त्यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत इंदापूरमधील काँग्रेस कार्यकर्ते आघाडीचा धर्म पाळत राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं काम प्रामाणिकपणे करतात. मात्र तरीही राष्ट्रवादीकडून सतत काँग्रेसची गळचेपी करण्याचा प्रयत्न होत असल्याने इंदापूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याच भाषणाचा धागा पकडत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनीही इंदापूरबरोबरच पुरंदरच्या जागेबद्दलही भूमिका जाहीर केली पाहिजे अशी मागणी केली.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातलं विळ्याभोपळ्याचं नातं सर्वश्रूत आहे. त्यामुळेच अनेकदा हर्षवर्धन पाटील यांचा पाडाव करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून झालाय. यापूर्वी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आघाडी तुटली तरी इंदापूरची जागा काँग्रेसला सोडणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर अनेकदा या विषयावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत धुसफूस झाल्याचं पाहायला मिळालंय. आज तर थेट काँग्रेस कार्यकर्त्यांसह जिल्हाध्यक्षांनी पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांसमोरच लोकसभा निवडणुकीपूर्वी इंदापूर विधानसभेची जागा कोणाला देणार हे जाहीर झाल्याशिवाय लोकसभेच्या आघाडीच्या उमेदवाराचं काम करणार नाही असा पवित्रा घेतलाय.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.