AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेत छातीठोक सांगितलं, पण प्रत्यक्षात शार्जिलबाबत काय केलं? फडणवीसांचा सवाल

विधानसभेत छातीठोकपणे सांगणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शार्जिल उस्मानी (Sharjeel Usmani)  येऊन गेला तरी काही करु शकले नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विधानसभेत छातीठोक सांगितलं, पण प्रत्यक्षात शार्जिलबाबत काय केलं? फडणवीसांचा सवाल
Devendra Fadnavis_Uddhav Thackeray
| Updated on: Mar 16, 2021 | 4:02 PM
Share

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. विधानसभेत छातीठोकपणे सांगणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शार्जिल उस्मानी (Sharjeel Usmani)  येऊन गेला तरी काही करु शकले नाहीत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून मुख्यमंत्र्यांवर घणाघात केला.

देवेंद्र फडणवीस यांची फेसबुक पोस्ट

आपले मुख्यमंत्री विधानसभेत छातीठोकपणे म्हणाले, ‘शार्जिल उस्मानी जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात असेल तर त्याच्या मुसक्या…

Posted by Devendra Fadnavis on Tuesday, 16 March 2021

मुख्यमंत्री विधानसभेत काय म्हणाले होते? 

शर्जील उस्मानी पाताळात गेला तरी त्याला सोडणार नाही, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. मग आता ते पाताळात जाऊन शर्जीलला कधी पकडून आणणार, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी उपस्थित केला. शर्जील उस्मानी ही उत्तर प्रदेशातील घाण आहे, आमच्याकडील नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सुनावले होते.

शार्जिल उस्मानीचं वादग्रस्त वक्तव्य

पुण्यातील एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शार्जिल उस्मानीने वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘हिंदू समाज आहा पूर्णपणे सडला आहे’ असं वक्तव्य त्याने केलं होतं. ‘हिंदुस्तान मे हिंदू समाज बुरी तरिकेसे सड चुका है’, शरजिल उस्मानी याचं हे विधान भारतीय दंडसंहितेच्या कलम क्रमांक 153A आणि 295A अनुसार गुन्हा ठरते, अशी तक्रार भाजपने पुणे पोलिसात केली होती.

संबंधित बातम्या  

फडणवीस म्हणाले, शर्जील उस्मानी पाताळात गेला तरी सोडणार नाही, उद्धव म्हणाले, मग कधी जाताय?

Sharjeel Usmani : हिंदू समाज सडका झालाय म्हणणारा शरजील उस्मानी कोण आहे?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.