AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फार वेदना झाल्या; मला जग सोडून जावंस वाटत होतं : धनंजय मुंडे

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde on Viral Video about Pankaja Munde) यांनी आज (20 ऑक्टोबर) बीडमध्ये पत्रकार परिषदेत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबतचे सर्व आरोप फेटाळले आहे. यावेळी बोलताना धनंजय मुंडे भावूक झाले.

फार वेदना झाल्या; मला जग सोडून जावंस वाटत होतं : धनंजय मुंडे
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 20, 2019 | 1:21 PM
Share

बीड: राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde on Viral Video about Pankaja Munde) यांनी आज (20 ऑक्टोबर) बीडमध्ये पत्रकार परिषदेत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबतचे सर्व आरोप फेटाळले. यावेळी बोलताना धनंजय मुंडे भावूक झाले. त्यांना बोलताना अश्रूही अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले, “ज्या बहिणीसाठी 2009 मध्ये हा परळीचा मतदारसंघ सोडला, त्यांच्याकडूनच जर अशी बदनामी होत असेल आणि निवडणूक जिंकण्यासाठी हे होत असेल, तर असं राजकारणही नको आणि जीवनही नको.” जर निवडूनच यायचं होतं तर एका शब्दाने जरी म्हटलं असतं तर निवडणूक लढलो नसतो. मात्र, असं करण्याची आवश्यकता नव्हती, असं म्हणत त्यांनी आपला उद्वेग व्यक्त केला.

धनजंय मुंडे म्हणाले, “मी 17 ऑक्टोबरला सभेत जे बोललो त्यात एडीट करुन काही लोक आम्हा बहिण भावाच्या नात्यात विष कालवत आहेत. मागील 20 वर्षांपासून मी राजकारणात आहे, मात्र कधीही असं बोललो नाही. या घटनेने मन पिळवटून निघालं. मी माझ्या सख्या बहिणींकडून आधी राखी बांधली नाही, पण पंकजा आणि प्रितमकडून बांधली. याआधीही दोन भावांमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न झाला. त्याचा परिणाम मी आजही भोगतो आहे. आमचं रक्ताचं नातं आहे. आम्हा बहिण-भावाच्या नात्यात कोण विष कालवण्याचा प्रयत्न करतो आहे याच्या खोलात जाणार. मी अनेक निवडणुका जिंकलो आणि हरलो. मात्र, कधीही कुणाविषयी असं व्यक्तिगत बोललो नाही.”

Dhananjay Munde Emotional 2

(बोलताना भावूक झालेले धनंजय मुंडे)

ज्याला विष कालवायचं होतं त्यांनी विष कालवून माझी बदनामी केली. अशा काही गोष्टी निवडणुकीच्या शेवटच्या काळात होतील, याचा अंदाज होता. मात्र, इतक्या खालच्या पातळीवर होईल, असं वाटलं नाही. निवडणूक विचाराने लढवावी आणि जिंकावी. मात्र, असं घडल्यानं, या नात्यावर डाग लागल्याने हे जग सोडून जावं, असं वाटत होतं. हा अभद्र आरोप निवडणूक जिंकण्यासाठी होत असेल तर असं राजकारणही नको आणि जीवनही नको, असं म्हणत धनंजय मुंडेंनी आपला उद्वेग व्यक्त केला.

‘भाजपमध्ये आलेले नवे भाऊ या बहिण भावाच्या नात्यात विष कालवत आहेत’

धनंजय मुंडे म्हणाले, “मी असं काय केलं ज्यामुळे असं शेवटचं अस्त्र वापरलं. ज्यांनी हे केलं त्याच्यापर्यंत मी पोहचेन. आता नव्याने भाजपमध्ये आलेले नवे भाऊ या बहिण भावाच्या नात्यात विष कालवत असतील तर हे दुर्दैवी आहे. काही दिवसातच ही व्हिडीओ कुणी एडीट केली हे लोकांसमोर येईल. काल माझ्याविरोधातील आरोपांची शहानिषा न करता गुन्हा दाखल करण्यात आला.”

2009 मध्ये याच बहिणीसाठी या मतदारसंघाचा त्याग केला आणि याच बहिणीला निवडून आणलं. तेच लोक जर बदनाम करत असतील, तर जगावं की मरावं असा माझ्यासमोर प्रश्न आहे, असंही धनंजय मुंडेनी नमूद केलं.

दरम्यान, पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह विधानाच्या आरोपानंतर रात्री उशिरा धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर धनंजय मुंडे यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाने स्वतःहून दखल घेत कारवाई करणार असल्याचं सांगितलं. धनंजय मुंडे यांचं वक्तव्य अशोभनीय आणि लज्जा उत्पन्न करणार आहे, अशी प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी व्यक्त केली.

धनंजय मुंडे यांच्या आक्षेपार्ह विधानाचा विरोध करण्यासाठी परळी शहरात मूक मोर्चा काढण्यात येत होता. परळी शहरातील महिलांनी हा मूक मोर्चा काढला होता. या मोर्चात शेकडो महिला सहभागी झाले होते. यावेळी महिलांनी काळ्या पट्ट्या तोंडाला पट्ट्या बांधून मूक मोर्चा काढला. शिवाजी चौकातून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

Follow Us
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...