AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेडमध्ये यावेळी मॅनेज होणारा उमेदवार देऊ नका, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आढावा घेत आहेत. भाजपकडूनही नांदेडमध्ये कार्यकर्त्यांचा बूथ मेळावा घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मेळाव्याला हजर राहिले. या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे अदृश्य हात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना मॅनेज होणारा उमेदवार देऊ नका असं उघडपणे वक्तव्य केलं. […]

नांदेडमध्ये यावेळी मॅनेज होणारा उमेदवार देऊ नका, मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

नांदेड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आढावा घेत आहेत. भाजपकडूनही नांदेडमध्ये कार्यकर्त्यांचा बूथ मेळावा घेण्यात आला. लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मेळाव्याला हजर राहिले. या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांचे अदृश्य हात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील यांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना मॅनेज होणारा उमेदवार देऊ नका असं उघडपणे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद देत नारेबाजी केली.

वाचाआमदाराचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’, लवकरच भाजपात प्रवेश!

लोकसभा निवडनुकीत मॅनेज होणारा उमेदवार देऊ नका म्हणजे आपल्याला नांदेडची जागा जिंकणं सोप होईल, असंही प्रताप पाटील म्हणाले. निवडणुका दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण ज्या ‘शाळा’ करतात ते मला चांगलंच ठाऊक आहे, अस वक्तव्य पाटील यांनी केलं. निवडणुकी दरम्यान अशोक चव्हाण विरोधी उमेदवाराला मॅनेज करतात, हे प्रताप पाटील यांनी व्यासपीठावर जाहीरपणे सांगितल्याने भाजपा कार्यकर्ते प्रचंड सुखावले. पाटील यांच्या या बोलण्यावर प्रचंड टाळ्या वाजवत भाजपा कार्यकर्त्यांनी दाद दिली. त्यानंतर भाषणासाठी उभे राहिलेल्या भास्करराव पाटील खतगावकर यांनीही प्रताप पाटील यांच्या मॅनेज वक्तव्याचा धागा पकडत भाषण केलं.

वाचानांदेड लोकसभा : अशोक चव्हाणांची यंदा मुख्यमंत्रीपदासाठी बॅटिंग

अशोक चव्हाण यांचे मेहुणे असलेल्या खतगावकर यांनी व्यासपीठावरच कुणीही अशोक चव्हाण यांना मॅनेज नसल्याचं सांगितलं. तसंच खतगावकर यांनी उघडपणे पहिल्यांदा आपल्या मेहुणे अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. जिल्ह्यातील सहकार क्षेत्र संपवण्याचं काम अशोक चव्हाण यांनी केल्याची टीका त्यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही बोलताना प्रतापरावांच्या मॅनेज वक्तव्याचा संदर्भ घेतला. अशोक चव्हाण हे आपले सर्वांशी चांगले संबंध असल्याचं भासवतात. पण तुम्ही चिंता करू नका, यावेळी नांदेडची जागा आपण जिंकूच, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

व्हिडीओ पाहा :

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला