AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनधिकृत बॅनर लावू नका, मुख्यमंत्र्यांचे भाजप कार्यकर्त्यांना आदेश

मुंबई : अनधिकृत बॅनरबाजीविरोधात आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच पावलं उचलली आहेत. अनधिकृत होर्डिंग, बॅनर लावू नका, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. विशेष म्हणजे, अनधिकृतपणे उभारण्यात येणाऱ्या बॅनरवर आणि कमानींवर मुख्यमंत्र्याचा फोटो न लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. अनधिकृत होर्डिंग, बॅनर न लावण्याबाबत मुख्यमंत्र्यानी थेट पत्रातून सर्व कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन […]

अनधिकृत बॅनर लावू नका, मुख्यमंत्र्यांचे भाजप कार्यकर्त्यांना आदेश
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM
Share

मुंबई : अनधिकृत बॅनरबाजीविरोधात आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच पावलं उचलली आहेत. अनधिकृत होर्डिंग, बॅनर लावू नका, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. विशेष म्हणजे, अनधिकृतपणे उभारण्यात येणाऱ्या बॅनरवर आणि कमानींवर मुख्यमंत्र्याचा फोटो न लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

अनधिकृत होर्डिंग, बॅनर न लावण्याबाबत मुख्यमंत्र्यानी थेट पत्रातून सर्व कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन केलं आहे. जर अनधिकृत होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर, कमानी लावणाऱ्या कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर पक्षातर्फे शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सहीनिशी हे पत्र भाजपच्या सर्व कार्यलयात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या पत्रात सार्वजनिक ठिकाणी बॅनर, होर्डिंग लावण्यासाठी तेथील अधिकाऱ्यांची परवानगी असणे गरजेचे आहे. होर्डिंग उभारण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. जर परवानगीशिवाय कुणी बॅनर, होर्डिगं लावले किंवा नियमांचे उल्लघंन केले, तर पक्षातर्फे कारवाई केली जाईल आणि पदावरुन निलंबित केले जाईल, असा थेट इशारा भाजपकडून या पत्रातून देण्यात आला आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्याच्या या पत्रामुळे सध्या भाजप कार्यकर्तेही बॅनर आणि होर्डिंग लावण्याच्या संभ्रमात असल्याचे दिसत आहे, तर अनेकांनी मुख्यमंत्र्याच्या या निर्णयाचे स्वागत करत समर्थन केले आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...