AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सतेज पाटलांना धक्का, डी. वाय. पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश

पुणे : बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून, त्यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. डॉ. डी. वाय. पाटील हे याआधी काँग्रेसमध्ये सक्रीय होते. डॉ. डी. वाय. पाटील यांचे […]

सतेज पाटलांना धक्का, डी. वाय. पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:48 PM
Share

पुणे : बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांच्या उपस्थितीत डॉ. डी. वाय. पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून, त्यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारले. डॉ. डी. वाय. पाटील हे याआधी काँग्रेसमध्ये सक्रीय होते.

डॉ. डी. वाय. पाटील यांचे सुपुत्र सतेज पाटील यांचे राजकारणातील कट्टर शत्रू मानले जाणारे धनंजय महाडिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. त्यामुळे मुलाचा मुख्य विरोधक ज्या पक्षात आहे, त्याच पक्षात डॉ. डी. वाय. पाटील यांनी प्रवेश केल्याने कोल्हापूरसह महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सतेज पाटील हे काँग्रेसचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आहेत, तसेच ते माजी गृहराज्य मंत्री आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी त्यांचे चुलत भाऊ अमल महाडिक यांचा प्रचार केला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील यांचा पराभव झाला होता.

कोण आहेत डी. वाय. पाटील?

डॉ. ज्ञानदेव यशवंतराव पाटील यांचे शिक्षण, आरोग्य क्षेत्रात भरीव काम आहे. केंद्र सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवले आहे. डॉ. डी.वाय. पाटील ह्यांच्या नावाच्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत.

डी. वाय. पाटील हे 2009 ते 2013 या काळात त्रिपुरा, तर 2013 ते 2014 या काळात बिहराचे राज्यपाल होते. शिवाय, त्यांच्याकडे पश्चिम बंगालच्या राज्यपालपदाचाही काही काळ कार्यभार होता.

1957 ते 1962 या काळात ते काँग्रेसकडून कोल्हापूरचे महापौर होते. 1967 आणि 1972 साली ते पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत आमदार म्हणूनही निवडून गेले होते.

डी. वाय पाटील यांच्या शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रातील संस्था (सौजन्य – विकिपीडिया) :

  • डी वाय पाटील विद्यानगरी
  • डॉ डी वाय पाटील एज्युकेशनल एंटरप्रायजेस चॅरिटेबल ट्रस्ट
  • डॉ डी वाय पाटील ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स (इंटिग्रेटेड कँपस), चरोली बु. व्हाया लोहगाव-पुणे
  • डॉक्टर डी वाय पाटील नॉलेज सिटी, चरोली बु. व्हाया लोहगाव-पुणे

शाळा

  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, वरळी, मुंबई
  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, नागपूर
  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, नेरूळ, नवी मुंबई
  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, पुणे
  • डी.वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, अँटवर्प, बेल्जियम

महाविद्यालये

  • डॉ डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, चरोली बु० व्हाया लोहगाव-पुणे .
  • डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील आयुर्वे्द महाविद्यालय, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील एज्युकेशनल सोसायटीचे महिला मेडिकल कॉलेज, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील होमिओपॅथिक कॉलेज, पिंपरी-पुणे
  • डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, नेरुळ, नवी मुंबई
  • डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, नवी मुंबई
  • डी. वाय. पाटील कॉलेज दंत महाविद्यालय, नेरूळ-नवी मुंबई
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, नेरूळ-नवी मुंबई
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कोल्हापूर
  • डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ ऑक्युपेशनल थेरपी, कोल्हापूर
  • डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कसबा बावडा-कोल्हापूर

विद्यापीठे

  • पद्मश्री डी.वाय. पाटील विद्यापीठ, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई
  • डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, पुणे
  • डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ, कोल्हापूर

हॉस्पिटल

  • डी.वाय. पाटील हॉस्पिटल, नवी मुंबई
  • डी.वाय. पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे
  • डी.वाय. पाटील हॉस्पिटल, कोल्हापूर

क्रीडा संस्था

  • डी.वाय. पाटील स्टेडियम, नेरूळ-नवी मुंबई

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?.

‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं