AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ED ने वर्षा राऊत यांना बजावलं समन्स; 5 जानेवारी 2021ला हजर राहण्याचे आदेश

ईडीने (ED) वर्षा राऊत यांना 5 जानेवारी 2021 रोजी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितलेय.

ED ने वर्षा राऊत यांना बजावलं समन्स; 5 जानेवारी 2021ला हजर राहण्याचे आदेश
शिवसेना खासदार संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी वर्षा राऊत
| Edited By: | Updated on: Dec 29, 2020 | 8:02 PM
Share

मुंबईः ईडीनं नव्यानं शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत  (Varsha Raut) यांना समन्स बजावलाय. ईडीने (ED) वर्षा राऊत यांना 5 जानेवारी 2021 रोजी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितलेय. ईडीच्या म्हणण्यानुसार, प्रवीण राऊत आणि त्यांच्या पत्नीचे यापूर्वीच जबाब नोंदवण्यात आले असून, फक्त वर्षा राऊत यांचा जबाब नोंदवणं बाकी आहे. (ED Issues Summons To Varsha Raut; Order To Appear On 5 January 2021)

प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाऊंटमधून जवळपास 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा पैशाचा व्यवहार नेमका कशामुळे करण्यात आला, याबाबत ईडीला माहिती हवी आहे. त्यासाठीच ED कडून वर्षा राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

वर्षा राऊत यांनी EDला पत्र पाठवून चौकशीला अधिकचा वेळ मागून घेतल्याची बातमी समोर आली होती. पण असं कुठलंही पत्र EDला पाठवण्यात आलं नाही. तसंच वर्षा राऊत आज EDला सामोऱ्या जाणार का? याबाबतही अद्याप निर्णय झाला नसल्याचं सुनील राऊत म्हणाले. वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून संजय राऊतांच्या सहकाऱ्यासोबत केलेल्या 55 लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगण्यात आले होते.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हे संपूर्ण प्रकरण HDILशी संबंधित आहे. HDILच्या वाधवान बंधूंना PMC बँक घोटाळ्या प्रकरणी अटक केली होत. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास EOW करत होतं. पण पुढे या प्रकरणाचा तपास EDकडे सोपवण्यात आला. वाधवान बंधूंचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण राऊत यांचीही चौकशी करण्यात आली आहे. प्रवीण हे संजय राऊत यांच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहेत. मुंबईच्या गोरेगाव परिसरात एका पुनर्विकास प्रकल्पाचं काम HDIL कडून करण्यात येत होतं. त्यात अनियमितता समोर आल्यानंतर वाधवान बंधूंना अटक करण्यात आली.

प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या अकाऊंटमधून पैसे ट्रान्सफर

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाऊंटमधून जवळपास 55 लाख रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा पैशाचा व्यवहार नेमका कशामुळे करण्यात आला, याबाबत ईडीला माहिती हवी आहे. त्यासाठीच ED कडून वर्षा राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

23 लाखाचे दागिने, पालघर, अलिबागमध्ये जमिनी, PNB मध्ये 5 खाती, वर्षा राऊतांची प्रॉपर्टी किती?

सामनाच्या अग्रलेखात ना ईडी ना भाजपा तर चक्क कॉंग्रेस, वाचा सविस्तर बातमी

ED Issues Summons To Varsha Raut; Order To Appear On 5 January 2021

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...