रोहिणी खडसे, पंकजा मुंडेंना जाणीवपूर्वक पाडले, खडसेंचा गंभीर आरोप, धनंजय मुंडेंना मदत मिळाल्याचाही दावा

भाजपने अंतर्गत राजकारणातून रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांना पाडले, असा खळबळजनक आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Eknath Khadse on Pankaja Munde and Rohini Khadse, रोहिणी खडसे, पंकजा मुंडेंना जाणीवपूर्वक पाडले, खडसेंचा गंभीर आरोप, धनंजय मुंडेंना मदत मिळाल्याचाही दावा

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse on Pankaja Munde and Rohini Khadse) यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपने अंतर्गत राजकारणातून रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांना पाडले, असा खळबळजनक आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. दैनिक लोकमतने याबाबतचं वृत्त दिलं आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत कुरघोड्या तर झाल्याच, पण त्यांना पाडण्याचे उद्योग झाले, असा घणाघाती आरोप खडसेंनी केला. (Eknath Khadse on Pankaja Munde and Rohini Khadse)

अ‍ॅड. रोहिणी खडसे यांना पाडण्यात आलंच, पण पंकजा मुंडे यांच्याही कार्यकर्त्यांचा असाच आरोप आहे, असं खडसे म्हणाले. इतकंच नाही तर खडसेंनी याबाबत पुरावे गोळा करुन, पाडापाडीचं काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे.

पंकजांविरोधात धनंजय मुंडेंना मदत?

लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, खडसेंनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. “पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळेच पंकजा मुंडे यांना पाडण्यात आलं, इतकंच नाही तर त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनाही मदत पुरवण्यात आल्याचं पंकजांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे”, असं खडसेंनी सांगितलं. याशिवाय रोहिणी खडसे यांच्याविरोधात तर भाजपचे कार्यकर्ते उघडपणे विरोधात काम करत होते, त्यांची नावं मी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पाठवली आहेत. मात्र अद्याप त्यांच्यावर कारवाई झालेली  नाही, मी कारवाईची वाट पाहात आहे, असं खडसे म्हणाले.

नाराज नेते गोपीनाथ गडावर?

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला त्यांची कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आपला पुढील प्रवास ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. मात्र पंकजांच्या सोबतीला भाजपमधील आणखी दोन नाराज नेत्यांचा मेळा जमण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीसांवर उघड नाराजी व्यक्त करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि मुंबईतील भाजपचं बडं प्रस्थ असलेले प्रकाश मेहता 12 डिसेंबरला गोपीनाथगडावर जाण्याची चिन्हं व्यक्त केली जात आहेत. यावेळी भाजपमधील तीन धडाडीचे नेते आपल्या मनातील खदखद (Pankaja Munde BJP Leaders Unhappy) व्यक्त करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या  

गोपीनाथगडावर राजकीय भूकंपाचे संकेत, पंकजा मुंडेंसह भाजपचे दोन नेते खदखद मांडणार? 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *