AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खडसेंची पवारांशी गुप्त भेट, मुक्ताईनगरमधून भाजपचा फलक हटवला, राष्ट्रवादीप्रवेशाच्या चर्चांना बळ

शरद पवार- एकनाथ खडसे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली. पवारांच्या भेटीनंतर खडसे देहरादूनला रवाना झाले.

खडसेंची पवारांशी गुप्त भेट, मुक्ताईनगरमधून भाजपचा फलक हटवला, राष्ट्रवादीप्रवेशाच्या चर्चांना बळ
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Dec 19, 2019 | 10:22 AM
Share

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुप्त भेट झाल्याची माहिती आहे. पवार-खडसे भेटीनंतर एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना जोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांनी स्वपक्षावर उघड नाराजी (Eknath Khadse Sharad Pawar Secrete Meet) व्यक्त केली होती.

शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची अज्ञातस्थळी भेट झाल्याची माहिती ‘टीव्ही9 मराठी’च्या सूत्रांनी दिली आहे. पवार-खडसे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाली. पवारांच्या भेटीनंतर खडसे देहरादूनला रवाना झाले.

विशेष म्हणजे जळगावातील मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसेंच्या संपर्क कार्यालयावरील भाजपचं चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले फलक काढल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे खडसे भाजपला रामराम ठोकण्याची शक्यता बळावली आहे. पंकजा भाजपमध्येच राहणार, पण माझा भरोसा धरु नका, असे उघड संकेत एकनाथ खडसेंनी गेल्या आठवड्यात गोपीनाथगडावरुन दिले होते.

एकनाथ खडसेंच्या भेटीगाठी

एकनाथ खडसे हे भाजपवर नाराज आहेत. मुलगी रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांना भाजपच्याच नेत्यांनी पाडल्याचा जाहीर आरोप खडसेंनी केला होता. या पार्श्वभूमीवर आधी खडसेंनी पंकजा मुंडेंची भेट घेतली होतीच, शिवाय दिल्लीत जाऊन शरद पवारांचीही भेट घेतली होती.

एकनाथ खडसे हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र भाजप नेते भेटलेच नव्हते. तिथे त्यांची शरद पवारांसोबत चर्चा झाली होती. दिल्लीतून परतल्यानंतर खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

गोपीनाथ गडावर खडसेंचा हल्लाबोल

एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी (12 डिसेंबर) बीडमधील गोपीनाथ गडावरुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर घणाघात केला होता. “देवेंद्र फडणवीसांना पक्षाचा अध्यक्ष (प्रदेशाध्यक्ष) करायचं हे गोपीनाथ मुंडेंनी मला सांगितलं, मुंडे साहेबांनी सांगितलं म्हणून मी संमती दिली, पण ज्यांनी मोठं केलं त्यांनाच अशी वागणूक दिली”, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर हल्ला केला होता.

शेठजी-भटजीचा पक्ष म्हणून भाजपला हिणवले जात होते, मात्र त्या पक्षाला मोठे करण्याचे काम गोपीनाथ मुंडेंनी केलं. मुंडे साहेबांनी कधी पाठीत खंजीर खुपसला नाही, त्यांचं वाक्य नेहमी आठवतं, हम तो डुबेंगे सनम, लेकिन तुम्हे साथ लेकर डुबेंगे, जो संघर्ष त्यांच्या वाट्याला आला, तोच प्रसंग माझ्याही आयुष्यात, असं एकनाथ खडसेंनी सांगितलं होतं.

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना मागील काही काळापासून चांगलाच वेग आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यानंतर अनेक भाजप नेत्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. त्यामुळे ते काय भूमिका घेणार असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. अशातच आता ऐन हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होणारी पवार-खडसे भेट आता चर्चेचा विषय ठरत आहे. या भेटीदरम्यान काय मोठा निर्णय होणार की ही भेटही केवळ चर्चेचाच विषय ठरणार हे आता येणाऱ्या काळातच स्पष्ट (Eknath Khadse Sharad Pawar Secrete Meet) होणार आहे.

Follow Us
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल.

मोदींचा घातपात करण्याचा कट होता का? एकनाथ शिंदे यांचा राहुल गांधींना सवाल

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न.

भाजप आमदाराच्या गाडीवर हल्ला, मारण्याचा प्रयत्न

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या