National Emblem News : संयमाला उग्रतेचा मुलामा! राष्ट्रीय चिन्हावरुन नवा वाद, सम्राट अशोकांच्या स्तंभावरील संयमी असलेले सिंह उग्र केल्याने संताप

| Updated on: Jul 12, 2022 | 2:08 PM

Insult of National Symbol News : नवीन संसदीय भवनाच्या छतावर विराजमान अशोकस्तंभावरील सिंहावरुन वाद पेटला आहे. सम्राट अशोकांचे शालिन सिंह अचानक उग्र का करण्यात आले यावरुन वाद सुरु झाला आहे.

National Emblem News : संयमाला उग्रतेचा मुलामा! राष्ट्रीय चिन्हावरुन नवा वाद, सम्राट अशोकांच्या स्तंभावरील संयमी असलेले सिंह उग्र केल्याने संताप
आता राष्ट्रीय चिन्हावरुन नवा वाद
Image Credit source: TV9marathi
Follow us on

Controversy over National Emblem News : नव्याने उभारण्यात येत असलेल्या संसद भवनाच्या (New parliament Building) छतावर उभारण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रतिकावरुन (National Emblem) आता नवा वाद समोर (A new controversy erupted) आला आहे. अशोक स्तंभावरुन हा नवा वाद उफाळला आहे. सोमवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्याने उभ्या राहत असलेल्या संसद भवनाच्या छतावर राष्ट्रीय चिन्हं अशोक स्तंभाची (Ashok Stambh) मोठ्या थाटात स्थापना केली. कास्यं धातू हे राष्ट्रीय चिन्हं कोरण्यात आले आहे. या राष्ट्रीय चिन्हाचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 11 जुलै रोजी केलं. पण आता या चिन्हातील सिंहाचे हावभाव आणि बदललेल्या भाव मुद्रांवरुन (changed gestures and postures) वातावरण तापले आहे. अशोक स्तंभावरील सिंह हे संयमी आणि शांत आहेत. परंतू नव्याने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय चिन्हावरुन वाद सुरु झाला आहे. या नवीन अशोक स्तंभावरील सिंहाची प्रतिमा अधिक उग्र आणि आक्रमक असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सिंहाच्या उग्र मुद्रेवरुन सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. सिंहाना नाहक उग्र रुप देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. ट्विटवर (Twit) यावरुन वाद रंगला आहे. अनेकांनी या प्रतिमेवरुन नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या मुद्यावर जनता शांत असल्याबद्दलही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या ट्विटवर अनेक जण प्रतिक्रिया ही देत आहेत.

काय म्हटलंय ट्विटमध्ये

एमआयएमचे अध्यक्ष खासदार असुदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर टीका करत. त्यांनी घटनादत्त अधिकारांचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.

हे सुद्धा वाचा

कसे आहे नवीन राष्ट्रीय चिन्हं

नव्याने तयार होणा-या संसदेच्या छतावर राष्ट्रीय चिन्हं अशोक स्तंभ (Ashok Stambh News) स्थापित करण्यात आला आहे. कांस्य धातूत तयार करण्यात आलेल्या या अशोक स्तंभाची उंची 20 फूट आहे. तर वजन 6500 किलोग्रॅम आहे. अशोक स्तंभ स्थापन करण्यापूर्वी 8 टप्प्यात त्याची तयारी करण्यात आली. क्ले मॉडेलिंग/ कम्प्युटर ग्राफिक त्यानंतर ब्रांझ कास्टिंग आणि पॉलिशिंग या प्रक्रियांमधून हे अप्रतिम शिल्प साकारण्यात आले आहे.

राष्ट्रीय चिन्हाचा इतिहास

भारताचे राष्ट्रीय चिन्हाची निर्मिती मौर्य साम्राज्याचे तिसरे शासक सम्राट अशोक यांनी केलेली आहे. 26 जानेवारी 1950 रोजी राज्य घटनेचा स्वीकार करताना हे चिन्ह देशासाठी स्वीकारण्यात आले. या स्तंभाच्या शिखरावर चार सिंहाच्या प्रतिमा चिन्हांकित केलेल्या आहेत. या स्तंभावर चार सिंह आहेत. हे चारही सिंह चार दिशांना तोंड करून उभे आहेत. या सिंहांच्या खाली हत्ती, घोडा, सिंह आणि बैल आदी प्राण्यांचे चित्र कोरण्यात आले आहे. यांशिवाय स्तंभावर 24 आरे असलेले चक्र देखील आहे. या चक्राला अशोक चक्र असे संबोधतात. स्तंभावर कमळाचे फुल ही कोरलेले आहे. हे सिंह म्हणजे शक्ती, धैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतिक आहेत. घोडा हा गती आणि ऊर्जेचे प्रतिक आहे. तर बैल हा मेहनत आणि कठोर परिश्रमाचे प्रतिक म्हणून वापरण्यात आले आहे. तर हत्ती हा अफाट सामर्थ्याचे प्रतिक आहे.