AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलमध्ये 6 EVM सापडल्याने खळबळ

बिहार :  बिहारच्या मुजफ्फरपूर लोकसभा मतदारसंघात एका हॉटेलमध्ये तब्बल 6 EVM (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन) सापडल्याने खळबळ उडाली आहे.  या मतदारसंघात काल पाचव्या टप्प्यात मतदान झालं. त्यावेळी लोकांना एका स्थानिक हॉटेलमध्ये ईव्हीएम असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी नागरिकांनी तातडीने हॉटेलबाहेर गर्दी करुन गोंधळाला सुरुवात केली. या EVM दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर स्वत: अधिकाऱ्यानेच (सेक्टर मजिस्ट्रेट) ठेवले […]

हॉटेलमध्ये 6 EVM सापडल्याने खळबळ
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Share

बिहार :  बिहारच्या मुजफ्फरपूर लोकसभा मतदारसंघात एका हॉटेलमध्ये तब्बल 6 EVM (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन) सापडल्याने खळबळ उडाली आहे.  या मतदारसंघात काल पाचव्या टप्प्यात मतदान झालं. त्यावेळी लोकांना एका स्थानिक हॉटेलमध्ये ईव्हीएम असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी नागरिकांनी तातडीने हॉटेलबाहेर गर्दी करुन गोंधळाला सुरुवात केली.

या EVM दुसऱ्या तिसऱ्या कोणी नव्हे तर स्वत: अधिकाऱ्यानेच (सेक्टर मजिस्ट्रेट) ठेवले होते. हे ईव्हीएम उपविभागीय अधिकाऱ्याने ताब्यात घेतले. तसंच याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याचं सांगितलं.

मुजफ्फरपूरचे जिल्हाधिकारी रंजन घोष यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सोमवारी मुजफ्फरपूरच्या स्थानिक हॉटेलमध्ये EVM आणि VVPAT मशिन मिळाले होते. सेक्टर मॅजिस्ट्रेटला काही राखीव मशीन देण्यात आले होते. मशीन खराब झाल्यानंतर ती मशीन वापरली जाणार होती. बिघडलेली EVM बदलल्यानंतर अधिकाऱ्याच्या कारमध्ये 2 बॅलिटिंग युनिट, 1 कंट्रोल युनिट आणि एक VVPAT आढळले”

या अधिकाऱ्याने मशीन्स हॉटेलमध्ये घेऊन जाणं चुकीचं होतं. ते नियमाविरुद्ध आहे. याप्रकरणी विभागीय चौकशी होईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली