AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रीम कोर्टात ज्यांच्या अधिकारांवरून घमासान, ते म्हणाले, ‘माझ्यावर अविश्वास होता तर नव्या विधानसभा अध्यक्षांची निवडही अवैध होती?

अपात्र आमदारांना अत्यंत कमी दिवसांची नोटीस बजावण्यात आली, असा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात करण्यात आला. यावरून नरहरी झिरवळ यांनीही प्रतिक्रिया दिली.

सुप्रीम कोर्टात ज्यांच्या अधिकारांवरून घमासान, ते म्हणाले, 'माझ्यावर अविश्वास होता तर नव्या विधानसभा अध्यक्षांची निवडही अवैध होती?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Feb 17, 2023 | 3:27 PM
Share

चंदन पूजाधिकारी, नाशिकः महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची (Maharashtra political crisis) सुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात (Supreme court) सुरु आहे. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, राज्यपालांचे (Governor) अधिकार तसेच अध्यक्षांविरोधात अविश्वासाची नोटीस असताना होणारे परिणाम आणि पक्षांतर बंदीचा कायदा यावरून ठाकरे गट तसेच शिंदे गटाच्या वकिलांमार्फत जोरदार युक्तिवाद सुरु आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळताना विधानसभा अध्यक्ष पद रिक्त होतं. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. त्यामुळे उपाध्यक्ष पदावरील नरहरी झिरवळ हेच अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळत होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात नरहरी झिरवळ यांची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरते.

नरहरी झिरवळ काय म्हणाले?

नाशिकमध्ये तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ज्या सभागृहाने माझी उपाध्यक्षपदी निवड झाली. त्याच सभागृहात माझ्याविरोधात अविश्वास ठराव येणं अपेक्षित आहे. मात्र तसे झालेले नाही.

तसेच मेलवरून मला पाठवलेली नोटीस हा अविश्वास ठराव असेल आणि मी त्यानंतर घेतलेले निर्णय योग्य नसतील तर ज्या प्रमाणे आमदार अपात्रतेची कारवाई अयोग्य ठरेल त्याचप्रमाणे नव्या सरकारमधील माझ्या उपस्थितीत झालेला नव्या अध्यक्षांचा शपथविधी कसा वैध धरता येईल? हा अत्यंत महत्त्वाचा सवाल नरहरी झिरवळ यांनी उपस्थित केला.

7 दिवसांची मुदत दिली…

अपात्र आमदारांना अत्यंत कमी दिवसांची नोटीस बजावण्यात आली, असा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात करण्यात आला. यावरून नरहरी झिरवळ यांनीही प्रतिक्रिया दिली. आमदारांना ७ दिवसांपर्यंत मुदत देता येते. त्यापेक्षाही कमी दिवसांची देता येते.

आम्ही दोन दिवसांची मुदत दिली होती. त्यांनी ती वाढवून सात दिवसांची मागायला हवी होती. सात दिवसांपेक्षाही जास्त त्यांनी मुदत मागितली असती तर ती देता आली असती. मात्र आमदारांनी ती मागितली नाही, असं वक्तव्य झिरवळ यांनी केलंय.

माझ्यावर अविश्वास होता. म्हणजे मी अनधिकृत होत नाही. केवळ माझ्याविरोधातील नोटिशीवरून मी अविश्वास दाखल होतो असं नाही. त्यापुढेही बरीच प्रक्रिया आहे.

आता हे बंद झालं पाहिजे…

सरकार म्हणून राज्यात जो विस्कळीत पणा आला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता वैतागली आहे. आता हे एकदाचं बंद झालं पाहिजे. आम्ही रोज तेच ऐकतो. यात आमचे प्रश्न तसेच राहतात. अजूनही कुठेही ताळमेळ नाही. कोरोनाने दीड दोन वर्ष, २० वर्ष मागे नेलं. कोरोना हे नैसर्गिक संकट होतं पण हे आपलं कृत्रिम संकट आहे, असं वक्तव्य नरहरी झिरवळ यांनी केलंय.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट