AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेचे मंत्रिपदाचे चारही दावेदार पराभूत!

मुंबई : लोकसभेचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रासह देशभरात भाजपप्रणित एनडीएला तुफान यश मिळालं आहे. एनडीएतील महाराष्ट्रातील महत्त्वाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही राज्यात चांगल्या जागा मिळाल्या. मात्र, यंदा शिवसेनेच्या चार अशा उमेदवारांचा पराभव झाला, जे शिवसेनेकडून केंद्रात मंत्रिपदाचे दावेदार मानले जातात. विशेष म्हणजे, हे चारही दावेदार विद्यमान खासदार होते. त्यामुळे त्यांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा आहे. […]

शिवसेनेचे मंत्रिपदाचे चारही दावेदार पराभूत!
| Edited By: | Updated on: May 23, 2019 | 9:12 PM
Share

मुंबई : लोकसभेचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रासह देशभरात भाजपप्रणित एनडीएला तुफान यश मिळालं आहे. एनडीएतील महाराष्ट्रातील महत्त्वाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही राज्यात चांगल्या जागा मिळाल्या. मात्र, यंदा शिवसेनेच्या चार अशा उमेदवारांचा पराभव झाला, जे शिवसेनेकडून केंद्रात मंत्रिपदाचे दावेदार मानले जातात. विशेष म्हणजे, हे चारही दावेदार विद्यमान खासदार होते. त्यामुळे त्यांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागणारा आहे.

अनंत गीते

अनंत गीते हे रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार होते. अनंत गीते हे 1998 पासून शिवसेनेचे खासदार होते. केंद्रात महत्त्वाची मंत्रिपदंही त्यांनी सांभाळली आहेत. शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव केला.

अनंत गीते 2014 साली लोकसभेत गेल्यानंतर, मोदी सरकारमध्ये केंद्रीय अवजड उद्योगमंत्री झाले. केंद्रात शिवसेनेच्या वाट्याला एकच मंत्रिपद आलं, ते मंत्रिपद सेनेने अनंत गीतेंना दिलं. आता पुन्हा गीते विजयी झाले असते, तर ते पुन्हा एकदा केंद्रीय मंत्रिपदाचे दावेदार असते.

चंद्रकांत खैरे

औरंगाबादमधून सलग चारवेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे यंदा मात्र पराभूत झाले. औरंगाबादमध्ये चौरंगी लढत झाली. या लढतीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी बाजी मारली. चंद्रकांत खैरेंच्या पराभव हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जातो. कारण औरंगाबादचा खासदार म्हणजे चंद्रकांत खैरे असे समीकरणच गेली 20 वर्षे जुळले होते. मात्र, यंदा हे समीकरण पार विस्कटले आहे.

केंद्रात पुन्हा मोदी सराकर सत्तेत आलं आहे. या सत्तेत शिवसेनेलाही वाटा मिळेल, हे निश्चित. त्यामुळे जी मंत्रिपदं शिवसेनेच्या वाट्याला येतील, त्यासाठी चंद्रकांत खैरेंचं नाव आघाडीवर असतं. याचे कारण चंद्रकांत खैरे हे ‘मातोश्री’चे एकनिष्ठ मानले जातात. तसेच, अनुभवानेही ज्येष्ठ खासदार होते. मात्र, पराभवामुळे त्यांच्या या शक्यतेवर पाणी फेरलं आहे.

आनंदराव अडसूळ

अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ पराभूत झाले आहेत. आघाडी पुरस्कृत युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी अडसूळ यांचा पराभव केला. आनंदराव अडसूळ हे वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ नेते आहेत. तसेच, शिवसेनेचे अत्यंत एकनिष्ठ नेते आणि कार्यकर्ता ते खासदार असा त्यांचा प्रवास आहे.

अडसूळ यांच्या पराभवामुळे शिवसेनेतील अत्यंत अनुभवी, ज्येष्ठ खासदार संसदेत नसेल. शिवसेनेला सर्वात मोठा धक्का आहे. आनंदराव अडसूळ जिंकले असते, तर मोदी सरकारच्या आगामी मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळण्याची दाट शक्यता होते.

शिवाजीराव आढळराव पाटील

पुण्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघातून सलग तीनवेळा खासदार असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांचा यंदा सिनेअभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभव केला. शिवाजीराव आढळराव पाटील हे कट्टर शिवसैनिक, एकनिष्ठ आणि वयाने-अनुभवाने ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे शिवसेनेकेडून कायम शिरुरमधून त्यांना उमेदवारी दिली गेली आणि ते जिंकूनही येत असत. मात्र, यंदा राष्ट्रवादीने पूर्ण ताकद डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीशी उभी केली आणि त्यात अमोल कोल्हे यांचा विजय झाला.

शिरुरमधून पराभव पत्कारावा लागल्याने शिवाजीराव आढळराव पाटलांना संभाव्य मंत्रिपदावरही पाणी फेरावं लागलं आहे. कारण शिवाजीराव आढळराव पाटील जिंकले असते, तर मोदींच्या आगामी मंत्रिमंडळात शिवसेनेकडून त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता जास्त होती.

मतदारसंघभाजप/शिवसेनाकाँग्रेस/ राष्ट्रवादीवंचित बहुजन आघाडीविजयी उमेदवार
नंदुरबारहिना गावित (भाजप) के. सी. पाडवी (काँग्रेस)दाजमल गजमल मोरे (VBA)हिना गावित (भाजप)
धुळे सुभाष भामरे (भाजप) कुणाल पाटील (काँग्रेस) सुभाष भामरे
जळगावउन्मेष पाटील (भाजप)गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)अंजली रत्नाकर बाविस्कर (VBA)उन्मेष पाटील (भाजप)
रावेररक्षा खडसे (भाजप) उल्हास पाटील (काँग्रेस)नितीन कांडेलकर (VBA)रक्षा खडसे (भाजप)
बुलडाणाप्रतापराव जाधव (शिवसेना)राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)बळीराम सिरस्कार (VBA)प्रतापराव जाधव (शिवसेना) आघाडी
अकोलासंजय धोत्रे (भाजप) हिदायत पटेल (काँग्रेस)प्रकाश आंबेडकरसंजय धोत्रे (भाजप)
अमरावतीआनंदराव अडसूळ (शिवसेना)नवनीत कौर राणा गुणवंत देवपारे (VBA)नवनीत कौर राणा
वर्धा रामदास तडस (भाजप) चारुलता टोकस (काँग्रेस)धनराज वंजारी (VBA) रामदास तडस (भाजप)
रामटेककृपाल तुमाणे (शिवसेना)किशोर उत्तमराव गजभिये (काँग्रेस) किरण रोडगे-पाटनकर (VBA)कृपाल तुमाणे (शिवसेना)
नागपूरनितीन गडकरी (भाजप)नाना पटोले (काँग्रेस)नितीन गडकरी (भाजप)
भंडारा-गोंदियासुनील मेंढे (भाजप)नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)एन. के. नान्हे (VBA)सुनील मेंढे (भाजप)
गडचिरोली-चिमूरअशोक नेते (भाजप) नामदेव उसेंडी (काँग्रेस)डॉ. रमेश गजबे (VBA)अशोक नेते (भाजप)
चंद्रपूर हंसराज अहीर (भाजप) सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर (काँग्रेस)अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे (VBA)बाळू धानोरकर (काँग्रेस)
यवतमाळ - वाशिमभावना गवळी (शिवसेना)माणिकराव ठाकरे (काँग्रेस)प्रो. प्रवीण पवार (VBA)भावना गवळी (शिवसेना)
हिंगोली हेमंत पाटील (शिवसेना)सुभाष वानखेडे (काँग्रेस)मोहन राठोड (VBA) हेमंत पाटील (शिवसेना)
नांदेडप्रताप पाटील चिखलीकर (भाजप)अशोक चव्हाण (काँग्रेस) प्रा. यशपाल भिंगे (VBA)प्रताप पाटील चिखलीकर (भाजप)
परभणीसंजय जाधव (शिवसेना)राजेश विटेकर (राष्ट्रवादी)आलमगीर खान अखिल मोहम्मद खान (VBA)संजय जाधव (शिवसेना)
जालनारावसाहेब दानवे (भाजप) विलास औताडे (काँग्रेस)डॉ. शरदचंद्र वानखेडे (VBA)रावसाहेब दानवे (भाजप)
औरंगाबादचंद्रकांत खैरे (शिवसेना)सुभाष झांबड (काँग्रेस)इम्तियाज जलील (VBA)इम्तियाज जलील (VBA)
दिंडोरीडॉ. भारती पवार (भाजप)धनराज महाले (राष्ट्रवादी)बापू केळू बर्डे (VBA)डॉ. भारती पवार (भाजप)
नाशिकहेमंत गोडसे (शिवसेना)समीर भुजबळ (राष्ट्रवादी)पवन पवार (VBA)हेमंत गोडसे (शिवसेना)
पालघरराजेंद्र गावित (शिवसेना)बळीराम जाधव - बहुजन विकास आघाडीसुरेश अर्जुन पाडवी (VBA)राजेंद्र गावित (शिवसेना)
भिवंडीकपिल पाटील (भाजप) सुरेश टावरे (काँग्रेस)डॉ. ए. डी. सावंत (VBA)कपिल पाटील (भाजप)
कल्याणश्रीकांत शिंदे (शिवसेना)बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)श्रीकांत शिंदे (शिवसेना)
ठाणेराजन विचारे (शिवसेना)आनंद परांजपे (राष्ट्रवादी)मल्लिकार्जुन पुजारी (VBA)राजन विचारे (शिवसेना)
मुंबई-उत्तर गोपाळ शेट्टी (भाजप) उर्मिला मातोंडकर (काँग्रेस)गोपाळ शेट्टी (भाजप)
मुंबई - उत्तर पश्चिमगजानन कीर्तिकर (शिवसेना)संजय निरुपम (काँग्रेस)गजानन कीर्तिकर (शिवसेना)
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व)मनोज कोटक (भाजप)संजय दीना पाटील (राष्ट्रवादी)संभाजी शिवाजी काशीद (VBA)मनोज कोटक (भाजप)
मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन (भाजप) प्रिया दत्त (काँग्रेस) पूनम महाजन (भाजप)
मुंबई दक्षिण मध्यराहुल शेवाळे (शिवसेना)एकनाथ गायकवाड (काँग्रेस)डॉ. संजय भोसले (VBA)राहुल शेवाळे (शिवसेना)
दक्षिण मुंबईअरविंद सावंत (शिवसेना)मिलिंद देवरा (काँग्रेस)डॉ. अनिल कुमार (VBA)अरविंद सावंत (शिवसेना)
रायगडअनंत गीते (शिवसेना)सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)सुमन कोळी (VBA) सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
मावळश्रीरंग बारणे (शिवसेना)पार्थ पवार (राष्ट्रवादी)राजाराम पाटील (VBA)श्रीरंग बारणे (शिवसेना)
पुणेगिरीश बापट (भाजप)मोहन जोशी (काँग्रेस)अनिल जाधव (VBA)गिरीश बापट (भाजप)
बारामतीकांचन कुल (भाजप)सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)नवनाथ पडळकर (VBA)सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
शिरुर शिवाजीराव आढळराव-पाटील (शिवसेना)अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
अहमदनगरसुजय विखे (भाजप)संग्राम जगताप (राष्ट्रवादी)सुधाकर आव्हाड (VBA)सुजय विखे (भाजप)
शिर्डीसदाशिव लोखंडे (शिवसेना)भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)डॉ. अरुण साबळे (VBA)सदाशिव लोखंडे (शिवसेना) आघाडीवर
बीडडॉ. प्रीतम मुंडे (भाजप) बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी) प्रा. विष्णू जाधव (VBA)डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)
उस्मानाबादओमराजे निंबाळकर (शिवसेना)राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी)अर्जुन सलगर (VBA)ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
लातूरसुधाकरराव श्रंगारे (भाजप) मच्छिलिंद्र कामत (काँग्रेस)राम गारकर (VBA)सुधाकरराव श्रंगारे (भाजप)
सोलापूरजयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)सुशिलकुमार शिंदे (काँग्रेस)प्रकाश आंबेडकर (VBA)जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)
माढारणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)संजय शिंदे (राष्ट्रवादी)अ‍ॅड. विजय मोरे (VBA)रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
सांगलीसंजयकाका पाटील (भाजप) विशाल पाटील (स्वाभिमानी)गोपीचंद पडळकर (VBA)संजयकाका पाटील (भाजप)
सातारानरेंद्र पाटील (शिवसेना)उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)सहदेव एवळे (VBA)उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
रत्नागिरी-सिंधुदुर्गविनायक राऊत (शिवसेना)नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस)मारुती रामचंद्र जोशी (VBA)विनायक राऊत (शिवसेना)
कोल्हापूर संजय मंडलिक (शिवसेना)धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) डॉ. अरुणा माळी (VBA)संजय मंडलिक (शिवसेना)
हातकणंगलेधैर्यशील माने (शिवसेना)राजू शेट्टी (स्वाभिमानी)अस्लम बादशाहजी सय्यद (VBA)धैर्यशील माने (शिवसेना)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या