AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गँगस्टर अरुण गवळीचा पक्ष राज्यभर निवडणूक लढण्याच्या तयारीत

लातूर : निवडणुकांच्या तोंडावर कुख्यात गुंड अरुण गवळीचा पक्षही सक्रिय झाला आहे. राज्यभर विधानसभा आणि लोकसभेच्या जागा लढवण्याची तयारी अखिल भारतीय सेनेने सुरु केली आहे. अरुण गवळीच्या पत्नी आणि अभा सेनेच्या सरचिटणीस आशा गवळी या सध्या राज्यभर फिरून कार्यकर्त्यांची फळी उभी करत आहेत. त्यांनी लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये नुकतीच सभा घेतली. आरक्षण आणि जातीच्या नावावर राजकारण […]

गँगस्टर अरुण गवळीचा पक्ष राज्यभर निवडणूक लढण्याच्या तयारीत
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM
Share

लातूर : निवडणुकांच्या तोंडावर कुख्यात गुंड अरुण गवळीचा पक्षही सक्रिय झाला आहे. राज्यभर विधानसभा आणि लोकसभेच्या जागा लढवण्याची तयारी अखिल भारतीय सेनेने सुरु केली आहे. अरुण गवळीच्या पत्नी आणि अभा सेनेच्या सरचिटणीस आशा गवळी या सध्या राज्यभर फिरून कार्यकर्त्यांची फळी उभी करत आहेत. त्यांनी लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये नुकतीच सभा घेतली.

आरक्षण आणि जातीच्या नावावर राजकारण करून काही पक्ष लोकांमध्ये मतभेद निर्माण करत आहेत. मात्र आपला पक्ष हा केवळ लोकांच्या सेवेसाठी आहे. गवळी कुटुंबीयांचा त्यात काहीच स्वार्थ नसल्याचं आशा गवळी यांनी म्हटलं आहे. उदगीर विधानसभा निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने आशा गवळी यांनी उदगीर इथे पक्षाच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी त्या बोलत  होत्या.

कुख्यात गुंड अरुण गवळी यांचा पक्ष म्हणून आखिल भारतीय सेनेची ओळख आहे. तरीही कार्यकर्त्यांची या पक्षाला राज्यभर कमतरता नाही. प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांचं जाळं उभं करण्यात आलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षाने पक्षबांधणीला सुरुवात केली आहे.

गँगस्टर अरुण गवळीने 1997 साली अखिल भारतीय सेना या पक्षाची स्थापना केली. अरुण गवळीने त्याच्या पक्षाच्या वतीने 2004 सालची लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबईत त्याने जवळपास 26 टक्के मतं मिळवली होती. पण त्याचा पराभव झाला. त्याच वर्षी विधानसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय सेनेच्या 20 उमेदवारांनी निवडणूक लढवली, पण अरुण गवळी वगळता एकही उमेदवार निवडून आला नाही.

अरुण गवळी सध्या शिवसेना नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी तुरुंगवास भोगत आहे. ऑगस्ट 2012 मध्ये त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. अरुण गवळी तुरुंगात गेल्यानंतरही त्याच्या पत्नीकडून पक्षबांधणी सुरु आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...