AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘स्वप्निल लोणकरची आत्महत्या म्हणजे सरकारने केलेली हत्या’, आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात

भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ले चढवायला सुरुवात केलीय. स्वप्निल लोणकरची आत्महत्या म्हणजे सरकारने केलेली हत्या असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय.

'स्वप्निल लोणकरची आत्महत्या म्हणजे सरकारने केलेली हत्या', आमदार गोपीचंद पडळकरांचा घणाघात
गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप
| Edited By: sagar joshi | Updated on: Jul 04, 2021 | 3:39 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यातील एका तरुणाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललंय. स्वप्नील लोणकर असं या तरुणाचं नाव आहे. अथक परिश्रम घेऊन एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला. पण उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाले तरी त्याला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने 29 जून रोजी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं आहे. या घटनेनंतर भाजप नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ले चढवायला सुरुवात केलीय. स्वप्निल लोणकरची आत्महत्या म्हणजे सरकारने केलेली हत्या असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय. (Gopichand Padalkar criticizes Thackeray government over Swapnil Lonakar’s suicide)

स्वप्निल लोणकरची आत्महत्या म्हणजे सरकारनं केलेली हत्या आहे. स्वप्निलप्रमाणे एमपीएससीच्या इतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची वाट सरकार पाहत आहे का? असा सवालही पडळकर यांनी ठाकरे सरकारला विचारलाय. येत्या 8 दिवसात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा अन्यथा रस्त्यावर उतरु, असा इशाराही त्यांनी दिला आहे. सरकारने एमपीएसएसीच्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात. तसंच एमपीएससीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कराव्या, अशी मागणीही पडळकर यांनी केलीय.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे माझ्या मुलाची आत्महत्या

“सध्या महाराष्ट्रमध्ये बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यात कोरोनामुळे आधीच शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडे मोडलं आहे. अशा परिस्थितीत आपली कमावती मुलं हा घरच्यांसाठी आधार असतो. पण अशा काळात जर सरकारच्या नाकर्तेपणामुळे कर्ती मुली सोडून गेली तर कुटुंबीयांनी काय करायचं? आम्ही तर म्हणू की सरकारच्या नाकर्तेपणामुळे माझ्या मुलाने आत्महत्या केलीय”, असा आरोप स्वप्नीलच्या कुटुंबियांनी केलाय.

‘MPSCला स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे’

पुण्यातील आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. एकूणच एमपीएससीच्या कार्यपद्धतीचं नव्याने अवलोकन करणं आवश्यक आहे. अनेक जागा रिक्त आहेत. परीक्षा उशिरा होतात. अनेक तरुण यामुळे भरडले जात आहे. एमपीएससीला स्वातंत्र्य हवंच पण स्वैराचार नको, अशा कडक शब्दात फडणवीस यांनी एमपीएससीवरही तोफ डागली आहे.

युवी पिढी नैराश्यात, MPSC परीक्षा घ्या आणि प्रलंबित नियुक्त्याही द्या

कोरोनामुळं स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळं युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की, आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात, अशी मागणी रोहित पवार यांनी ट्विट करुन सरकारकडे केली आहे.

संबंधित बातम्या :

MPSC उत्तीर्ण, पण दीड वर्षांपासून नोकरी नाही; पुण्यात तरुणाची गळफास घेत आत्महत्या

‘राज्यातील युवा, शेतकरी, कलाकार आत्महत्येच्या वाटेवर, सरकार बिल्डरांना सवलती देण्यात व्यस्त’, भाजपचं टीकास्त्र

Gopichand Padalkar criticizes Thackeray government over Swapnil Lonakar’s suicide

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...