AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिक पटेलला हायकोर्टाचा दणका, निवडणूक लढता येणार नाही!

गांधीनगर : लोकसभा निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला पाटीदार नेता हार्दिक पटेलला गुजरात हायकोर्टाने दणका दिलाय. हायकोर्टाने हार्दिक पटेलला निर्दोष मुक्त करण्याची याचिका फेटाळली आहे. यामुळे त्याला निवडणूक लढता येणार नाही. अमरेली किंवा जामनगर मतदारसंघातून हार्दिक पटेल निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती. हार्दिक पटेलवर 2015 मध्ये मेहसाणा दंगली प्रकरणी खटला सुरु आहे. कनिष्ठ न्यायालयाकडून हार्दिक […]

हार्दिक पटेलला हायकोर्टाचा दणका, निवडणूक लढता येणार नाही!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

गांधीनगर : लोकसभा निवडणूक लढण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला पाटीदार नेता हार्दिक पटेलला गुजरात हायकोर्टाने दणका दिलाय. हायकोर्टाने हार्दिक पटेलला निर्दोष मुक्त करण्याची याचिका फेटाळली आहे. यामुळे त्याला निवडणूक लढता येणार नाही. अमरेली किंवा जामनगर मतदारसंघातून हार्दिक पटेल निवडणूक लढणार असल्याची चर्चा होती.

हार्दिक पटेलवर 2015 मध्ये मेहसाणा दंगली प्रकरणी खटला सुरु आहे. कनिष्ठ न्यायालयाकडून हार्दिक पटेलला शिक्षाही सुनावण्यात आली होती. या निर्णयाविरोधात हार्दिक पटेलने हायकोर्टात आव्हान दिलं होतं, ज्यावर सुनावणीस नकार देत कोर्टाने निर्दोष मुक्त करण्याची मागणी फेटाळली. कोर्टाच्या या निर्णयामुळे लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार हार्दिक पटेलला निवडणूक लढता येणार नाही.

हार्दिक पटेलची याचिका फेटाळण्यापूर्वी त्याच्यावर दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांनाही विचारात घेण्यात आलं. त्याच्यावर काही गंभीर गुन्ह्यांसह एकूण 17 एफआयआर दाखल आहेत. कनिष्ठ न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर हार्दिक पटेलला हायकोर्टाने जामीन दिला होता. हार्दिक पटेलचा काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्येही समावेश आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...