AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाषण लांबवणाऱ्या खासदाराला सोडून हेलिकॉप्टरचं टेकऑफ

लखनौ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेते वेगवान सभा घेत या शहरातून त्या शहरात जातात. पण काही नेत्यांना बोलण्याचा मोह आवरता येत नाही आणि पुढील सर्व कार्यक्रम लांबणीवर पडतात. उत्तर प्रदेशातील भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे चिरंजीव राजवीर सिंह यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला. एटाचे विद्यमान खासदार राजवीर सिंह उत्तर प्रदेशातील कौशांबी […]

भाषण लांबवणाऱ्या खासदाराला सोडून हेलिकॉप्टरचं टेकऑफ
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM
Share

लखनौ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेते वेगवान सभा घेत या शहरातून त्या शहरात जातात. पण काही नेत्यांना बोलण्याचा मोह आवरता येत नाही आणि पुढील सर्व कार्यक्रम लांबणीवर पडतात. उत्तर प्रदेशातील भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे चिरंजीव राजवीर सिंह यांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला.

एटाचे विद्यमान खासदार राजवीर सिंह उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात कोसम ईनाम गावात भाषण करत होते. इथे भाजपकडून विनोद सोनकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजवीर हे प्रचारासाठी हेलिकॉप्टरने आले होते. पण सभा लांबली आणि हेलिकॉप्टरच्या पुढील उड्डाणाची वेळ झाली.

मोदी सरकारच्या योजनांचं कौतुक करण्यात राजवीर सिंह एवढे व्यस्त झाले, की त्यांना हेलिकॉप्टरच्या वेळेचंही भान राहिलं नाही. राजवीर यांना टेकऑफची सूचनाही देण्यात आली होती. पण अजून 10 मिनिट थांबा असं म्हणत त्यांनी भाषण लांबवलं.

राजवीर सिंह यांचं भाषण लांबत असताना पायलटला पुढील ठिकाणी पोहोचण्यासाठी उशिर होत होता. त्यामुळे पायलटने खासदार महोदयांना व्यासपीठावरच सोडलं आणि टेकऑफ केलं. हेलिकॉप्टरचं उड्डाण हे ठरलेल्या वेळेवरच केलं जातं. पण राजवीर सिंह यांना याचा विसर पडला असावा, ज्यामुळे त्याना नंतर कारने लखनौला जावं लागलं. यामुळे ते नाराजही दिसून आले.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक