AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणाचा ‘नगरी पॅटर्न’, राम शिंदेंना विखेंचा झटका, पवारांसोबत आतून युती, ‘खास’ माणसासाठी पक्ष टांगणीला?

राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही, त्यात नगरचं राजकारण म्हटलं की अंदाज लावायचं काम नाही...! Hidden alliance of MLA Rohit Pawar And MP Sujay Vikhe Patil

राजकारणाचा 'नगरी पॅटर्न', राम शिंदेंना विखेंचा झटका, पवारांसोबत आतून युती, 'खास' माणसासाठी पक्ष टांगणीला?
राम शिंदे आणि रोहित पवार
| Updated on: Feb 09, 2021 | 9:52 AM
Share

अहमदनगर :  राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही, त्यात नगरचं राजकारण म्हटलं की अंदाज लावायचं काम नाही…! इथे कधी जवळची माणसं अगदी कट्टर विरोधक होतात तर कधी कट्टर विरोधकही खांद्यावर हात टाकून फक्त लढ म्हणतात…! असाच प्रसंग आहे नगरच्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत….! माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे खंदे समर्थक जगन्नाथ राळेभात (Jagganath Ralebhat) यांच्या घरात पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे संचालकपद येत आहे आणि ही किमया होणार आहे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या छुप्या युतीने…. (Hidden alliance of MLA Rohit Pawar And MP Sujay Vikhe Patil over Ahmednagar District bank Election)

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक जगन्नाथ राळेभात यांच्या घरात पुन्हा एकदा जिल्हा बँकेचे संचालकपद येत आहे. विखेसमर्थक असलेल्या राळेभात यांचा बिनविरोध संचालकपदाचा मार्ग राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामुळे सोपा झाला आहे. विखे-पवारांच्या ऐनवेळीच्या छुप्या युतीने माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) बॅकफूटला गेले आहेत.

माजी मंत्री राम शिंदे हे राळेभात यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत होते. परंतु राजकारणात कनेक्ट महत्त्वाचा म्हणतात तो यासाठीच… राम शिंदेंचा राळेभात यांच्याशी कनेक्ट कमी पडला आणि आणि ‘बिनविरोध’ निकालाचा चेंडू आमदार पवार यांनी स्वतःच्या कोर्टातून टोलवला.

जामखेड तालुका सोसायटी मतदारसंघातून जगन्नाथ राळेभात आणि त्यांचे पूत्र अमोल यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आमदार पवारांनी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांना निवडणूक रिंगणात उतरविले. भोसलेंच्या उमेदवारीने निवडणुकीतील चुरस वाढली. सुरुवातीला राळेभात पिता-पुत्रांपैकी एकच अर्ज राहून बिनविरोध निवडणूक होईल, असे चित्र निर्माण झाले आहे.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता राळेभात यांचे पुत्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुधीर राळेभात यांनी आमदार रोहित पवारांशी चर्चा केली. त्यानंतर आमदार पवारांनी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश भोसले यांना या निवडणुकीतून माघार घेण्याची सूचना केली. आमदार रोहित पवारांच्या आदेशानंतर पुढचं नियोजन सुरु झालं. त्यानुसार आता राळेभात पिता-पुत्रापैकी एकाचा बँकेत बिनविरोध संचालक म्हणून जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

रोहित पवार यांनी सुरेश भोसले यांना अर्ज मागे घ्यायला लावून तसंच ऐनवेळी विखेंशी छुपी युती करुन राजकारणाचा ‘नगरी पॅटर्न’ दाखवून दिला आहे. यापुढच्या नगर जिल्ह्यातील निवडणुकांसाठी रोहित पवारांचं हे बेरजेचं राजकारण महत्त्वाचं मानलं जात आहे. मात्र यामुळे माजी मंत्री राम शिंदे यांना चांगलाच धक्का बसल्याची चर्चा आहे.

(Hidden alliance of MLA Rohit Pawar And MP Sujay Vikhe Patil over Ahmednagar District bank Election)

हे ही वाचा :

अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात तू तू मैं मैं; नेमकं काय घडलं…?

“काहीही करा, आमच्या जालिंदरला वाचवा”; करारी, आक्रमक अजितदादा जेव्हा भावुक होतात…!

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.