AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरात कॅडरचे IPS अधिकारी, थेट दिल्लीच्या पोलीस कमिश्नरपदी, राकेश अस्थानांना लॉटरी कशी लागली?

राकेश अस्थाना हे चार दिवसानंतर म्हणजेच 31 जुलै रोजी निवृत्त होणार होते. त्यांची सेवा त्यादिवशी संपते. पण त्याआधीच त्यांना दिल्ली पोलीस कमिश्नर म्हणून नियुक्त करण्यात आलंय. त्यांचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असेल.

गुजरात कॅडरचे IPS अधिकारी, थेट दिल्लीच्या पोलीस कमिश्नरपदी, राकेश अस्थानांना लॉटरी कशी लागली?
दिल्ली पोलीस कमिश्नरपदी राकेश अस्थानांची नियुक्ती
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 27, 2021 | 11:23 PM
Share

गेल्या काही वर्षात सर्वाधिक चर्चेत असलेले एक IPS अधिकारी म्हणजे राकेश अस्थाना. कधी ते सीबीआयचे स्पेशल डायरेक्टर म्हणून चर्चेत राहीले तर कधी आसारामच्या केसमुळे. कधी कोर्टानं फटकारलं म्हणून तर कधी ड्रग्जविरोधातल्या कारवायांमुळे. आता तर त्यांची दिल्ली पोलीस कमिश्नर म्हणून घोषणा करण्यात आलीय. विशेष म्हणजे राकेश अस्थाना हे गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.

दिल्ली पोलीस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात. त्यामुळे पोलीस कमिश्नरपदी अस्थानांच्या नावाचा आदेश केंद्रीय गृहमंत्रालयानं काढलाय. सध्या अस्थाना हे बीएसएफचे डीजी (BSF DG) म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे अस्थाना हे सुरतचे कमिश्नरही राहीलेले आहेत. त्यांच्याच काळात आसारामच्या केसचा उलगडा झाला होता. त्यानंतर सुशांतसिंह राजपुतच्या ड्रग्ज कनेक्शनची केसही अस्थानांच्याच निगराणीखाली चालली.

कोण आहेत राकेश अस्थाना? राकेश अस्थाना हे गुजरात कॅडरचे 1984 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. लालू प्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्याची महत्वपूर्ण चौकशीही अस्थाना यांच्याच नेतृत्वात झाली होती. त्यावेळेस ते सीबीआयचे एसपी म्हणून कार्यरत होते. त्यानंतर लालू प्रसाद यादव हे सर्वोच्च शिखरावर असताना, चारा घोटाळ्यातच त्यांना अटक झालेली होती. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर गुजरात कॅडरचे जे काही अधिकारी प्रतिनियुक्तीवर केंद्रात आले त्यात अस्थानाही आले. सीबीआयचे स्पेशल डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याच काळात त्याचा सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्यासोबत वाद झाला. नंतर अस्थानांची बदली सीबीआयबाहेर करण्यात आली. आताही सीबीआयच्या संचालकपदासाठी अस्थानांचं नाव चर्चेत होतं. पण त्यांना थेट दिल्लीच्या पोलीस कमिश्नरपदी नियुक्त करण्यात आलंय. विशेष म्हणजे दिल्लीच्या कमिश्नरपदी एजीएमयूटी(AGMUT) अरूणाचल, गोवा, मिजोरम, आणि केंद्र शासित प्रदेश ह्या कॅडरच्याच अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. पण अस्थाना याला अपवाद ठरलेत. गुजरात कॅडरचे अधिकारी असूनही ते दिल्लीच्या पोलीस कमिश्नरपदी नियुक्त केले गेलेत.

निवृत्तीच्या चार दिवस आधी राकेश अस्थाना हे चार दिवसानंतर म्हणजेच 31 जुलै रोजी निवृत्त होणार होते. त्यांची सेवा त्यादिवशी संपते. पण त्याआधीच त्यांना दिल्ली पोलीस कमिश्नर म्हणून नियुक्त करण्यात आलंय. त्यांचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असेल.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!