AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एबी फॉर्मसह अर्ज भरलेला असताना तिकीट कापलं, स्मिता वाघ यांची हतबल प्रतिक्रिया

जळगाव : भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून पक्षाने चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिली. पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाने घेतलेल्या या निर्णयाबाबत आमदार स्मिता वाघ यांचे समर्थक नाराज झाले आहेत. जळगावात त्यांच्या निवासस्थानी जळगाव लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते जमले होते. त्यांनी पक्षाच्या या निर्णयाविरोधात […]

एबी फॉर्मसह अर्ज भरलेला असताना तिकीट कापलं, स्मिता वाघ यांची हतबल प्रतिक्रिया
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM
Share

जळगाव : भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी रद्द करून पक्षाने चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिली. पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाने घेतलेल्या या निर्णयाबाबत आमदार स्मिता वाघ यांचे समर्थक नाराज झाले आहेत. जळगावात त्यांच्या निवासस्थानी जळगाव लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्ते जमले होते. त्यांनी पक्षाच्या या निर्णयाविरोधात प्रचंड रोष व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षात आम्ही 40 वर्षांपासून निष्ठेने काम करत आहोत. परंतु एबी फॉर्मसह अर्ज भरलेला असताना आमचं तिकीट कापून चार वर्षांपूर्वी पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली. प्रामाणिकता आणि निष्ठा हा कदाचित माझ्या स्वभावातील दोष असेल. तरीही आम्ही पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा निष्ठेने प्रचार करणार आहोत, असे मत जळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या तिकीट रद्द केलेल्या उमेदवार स्मिता वाघ यांनी व्यक्त केले.

भाजपने उमेदवारी का बदलली?

जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या अंतर्गत कलहामुळे उमेदवारी कापल्याचं सांगण्यात येत आहे. जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून गुलाबराव देवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे जळगावात आता उन्मेष पाटील विरुद्ध गुलाबराव देवकर यांच्यात लढत होणार आहे.

विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांच्या बंडांचा फटका बसण्याची शक्यता, तसंच राष्ट्रवादीचे उमेदवार माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या तुलनेत स्मिता वाघ कमकुवत ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांच्या ऐवजी चाळीसगावचे भाजप आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

भाजपला जाहीर केलेला उमेदवार बदलावा लागल्याची ही पहिलीच घटना ठरली. आधी गिरीश महाजन यांच्या पत्नीच्या नावाची चर्चा सुरु होती. पण आता उन्मेष पाटलांचे नाव निश्चित झाल्याने, जळगावमधील राजकीय वातावरण बदलून गेलं आहे.

Follow Us
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...