AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी निवडणूक प्रचारात नाही, पण गरज लागेल तिथे सुप्रियासोबत : सदानंद सुळे

पुणे: राज्यातील लक्षवेधी लढत असलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुप्रिया सुळे यांनी कौन्सिल हॉलमध्ये आघाडीकडून अर्ज भरला. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. यांच्याशिवाय सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे, मुलगी रेवती आणि बहीण नीता पाटील […]

मी निवडणूक प्रचारात नाही, पण गरज लागेल तिथे सुप्रियासोबत : सदानंद सुळे
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM
Share

पुणे: राज्यातील लक्षवेधी लढत असलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुप्रिया सुळे यांनी कौन्सिल हॉलमध्ये आघाडीकडून अर्ज भरला. यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज नेते उपस्थित होते. यामध्ये दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली. यांच्याशिवाय सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे, मुलगी रेवती आणि बहीण नीता पाटील हे सुद्धा फॉर्म भरताना हजर होते.  दरम्यान अर्ज भरण्यापूर्वी आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. नरपतगिरी चौकात सभा घेऊन सरकार हल्लाबोल केला.

यावेळी सुप्रिया सुळेंनी सरकारवर टीका केली. “नोटबंदीने देशात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या असून, अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मात्र सरकार व्यक्तिगत पातळीवर टीका करत आहे” असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

आम्ही टीका करणार नाही.  मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, ते एका  पक्षाचे नाहीत. त्यामुळे व्यक्तीगत नाही तर विकासावर निवडणूक लढायला पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मला  कौटुंबीक पाठबळ आहे, त्यामुळे मी ही कठीण परीक्षा समजत नाही, असं सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

यावेळी पती सदानंद सुळे यांनी सुप्रिया जिंकणार असल्याचा दावा केला. सुप्रियाने प्रामाणिक काम केलं आहे. निवडणूक काळातही आम्ही संपर्कात असतो. निवडणूक प्रचारात माझा  सहभाग नाही. मात्र गरज लागेल तिथं मी पुढं राहील, असं सदानंद सुळे यांनी यावेळी सांगितलं.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...