AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Floor Test : बिहारमध्ये नितीश कुमार, तेजस्वी यादवांनी विश्वासमत जिंकलं, भाजपवर हल्लाबोल, भाजप आमदारांचा बहिष्कार

नितीश कुमार यांचं नाव 2024 मधील निवडणुकीवरून चर्चेत आले. विरोधी पक्षाकडून नितीश कुमार यांचं नाव पीएम पदासाठी सांगितलं जातंय. परंतु, माझी इच्छा काही होण्याची नसल्याचं त्यांनी सांगितलं.

Bihar Floor Test : बिहारमध्ये नितीश कुमार, तेजस्वी यादवांनी विश्वासमत जिंकलं, भाजपवर हल्लाबोल, भाजप आमदारांचा बहिष्कार
बिहारमध्ये नितीश कुमार, तेजस्वी यादवांनी विश्वासमत जिंकलं
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Aug 24, 2022 | 8:11 PM
Share

बिहार विधानसभेत आज नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारनं बहुमत सिद्ध केलं. बहुमत चाचणीवेळी मोठा गोंधळ झाला. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी बहुमत चाचणीवर बहिष्कार (Boycott) टाकला. त्यानंतर ते सभागृहाबाहेर गेले. बहुमत चाचणीच्यावेळी नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी भाजपवर हल्लाबोल केला. 2020 मध्ये मला मुख्यमंत्री (Chief Minister) व्हायचं नव्हतं. पण, भाजपनं माझ्यावर दबाव टाकल्याचा खुलासा नितीश कुमार यांनी केला. भाजपचं म्हणणं होतं की, आवाजी मतदानानं विश्वासमतं पारित झालं. मग, मतदानाची गरज काय. परंतु, मतदान झालं. भाजपनं मतदानावर बहिष्कार टाकला. मतदानात (Voting) नितीश कुमार यांच्या बाजूनं 160 मतं पडली.

2020 मध्ये मुख्यमंत्री होऊ इच्छित नव्हतो

सभागृहात आपल्या भाषणाची सुरुवात नितीश कुमार यांनी भाजपवर हल्लाबोल करून केली. ते म्हणाले, भाजपनं आधी नंदकिशोर यादव यांना विधानसभा अध्यक्ष करण्याचं ठरविलं होतं. परंतु, नंतर विजय सिंहा यांना विधानसभा अध्यक्ष बनविण्यात आलं. नितीश कुमार पुढं म्हणाले, 2020 जास्त जागा भाजपच्या असल्यानं त्यांनी मुख्यमंत्री करावा, असं म्हटलं होतं. परंतु, माझ्यावर मुख्यमंत्री पद स्वीकारावं यासाठी दबाव टाकण्यात आला. नितीश कुमार यांचं नाव 2024 मधील निवडणुकीवरून चर्चेत आले. विरोधी पक्षाकडून नितीश कुमार यांचं नाव पीएम पदासाठी सांगितलं जातंय. परंतु, माझी इच्छा काही होण्याची नसल्याचं त्यांनी सांगितलं.

2024 च्या निवडणुकीवर काय म्हणाले नितीशकुमार

भाजपची साथ सोडल्याबद्दल देशातील बहुतेक पक्षांनी त्यांच्या निर्णयाला योग्य ठरविलं. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी म्हटलं की, सर्व मिळून लढल्यास 2024 ची निवडणूक भाजपला भारी पडू शकते. केंद्राकडून फक्त प्रचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपनं जेडीयूला संपविण्याचा कट रचण्यात येत होता. सर्व जुन्या नेत्यांना बाजूला करण्यात आलं. अटल बिहारी वाजपेयी आजारी होते. तेव्हा लालकृष्ण अडवानी यांना सत्ता मिळायला हवी होती. परंतु, असं झालं नाही. पाटणा विद्यापीठाला केंद्राच्या विद्यापीठाचा दर्जा देण्याची मागणी मान्य झाली नसल्याचं ते म्हणाले.

तेजस्वी यादव म्हणाले, 2024 मध्ये 40 जागा जिंकणार

नितीश कुमार भाजप आमदार नितीन नवीन यांना म्हणाले, हे बोलतील तेव्हा केंद्रावाले यांना समोर करतील. विरोध करतील तेव्हा केंद्राकडून त्यांना योग्य जागा दिली जाईल. केंद्रानेच सभागृहातून पळण्याचा आदेश दिला असेल. नितीश कुमार यांच्यापूर्वी तेजस्वी यादव यांनी सभागृहाला संबोधित केलं. ते म्हणाले, भाजपला 2024 च्या निवडणुकीची भीती आहे. 2024 मध्ये बिहारमध्ये लोकसभेच्या 40 पैकी 40 जागा आम्ही जिंकणार आहोत. भाजप भीतीमुळं सभागृहात आमचा सामना करू शकली नाही. त्यामुळं भाजप सीबीआय, ईडी आणि आयटीला समोर करत आहेत. बिहार, गृरुग्रामसह 24 ठिकाणी छापेमारी झाल्याचं त्यांनी सांगितलं.

Follow Us
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत