स्वातंत्र्याच्या ७० वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली – गोपीचंद पडळकर

कोरोनाच्या काळात धनगर समाज आर्थिकदृष्ट्या अत्यंत खचला असल्याचं चित्र आहे. परंतु त्या समाज्याचं राज्य सरकारला काहीचं देण घेण नसल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यापासून गावागावात हल्ले, विस्तापितांना टाचेखाली चिरड्याचे प्रकार पुन्हा एकदा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

स्वातंत्र्याच्या ७० वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली - गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 1:43 PM

मुंबई – आमदार गोपीचंद पडळकरांनी (gopichand padalkar) वंचित बहुजन आघाडी (VBA) सोडल्यानंतर ते भाजपमध्ये (BJP) दाखल झाले, तेव्हापासून ते वारंवार महाविकास आघाडीतील नेत्यांना वारंवार आपल्या बोलण्यातून टार्गेट करीत असल्याचे पाहायला मिळते. भाजपकडून गोपिचंद पडळकरांना आमदारकी मिळाल्यापासून ते नेहमी आपल्या समाजाच्या मागण्यासाठी सत्तेत असलेल्या नेत्यांना टार्गेट करीत असल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच त्यांनी 70 वर्षे सत्तेत असलेल्या प्रस्तापितांनी राजकारणासाठी धनगर समाजाची कोंडी केली असल्याचे सांगत काँग्रेससह इतर पक्षांवरती टीका केली आहे. मागच्या पाच वर्षात ज्यावेळी भाजपाचं सरकार सत्तेतं होतं. त्यावेळी त्यांनी धनगर समाज्याचे हिताचे अनेक निर्णय घेतले. तसेच त्यांनी सुरू जनहिताच्या अनेक योजना सध्याचं सरकार बंद करीत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. तसेच सध्याचं सरकार ३ कोटी धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्याचं काम करतंय असं म्हणून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरती टीका केली आहे.

१ हजार कोटींच्या निधीची तरतूद

स्वातंत्र्याच्या ७० वर्षात प्रस्थापितांनी धनगर समाजाची कोंडी केली होती. जोपर्यंत धनगर समाजाला ‘एसटी’चा दाखला मिळत नाही. तोपर्यंत ती कोंडी फोडण्याची ताकद फडणवीस सरकारनं धनगर समाजासाठी दिलेल्या “जे आदिवासांनी ते धनगरांना” या धोरणांतर्गत महाराजा यशवंतराव होळकर महामेष योजनेसह २२ कल्याणकारी योजनेत होती. यासाठी १ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र प्रस्थापितांनी सत्ता ताब्यात घेऊन परत ३ कोटी धनगर समाजाच्या तोंडावर बोळा फिरवण्याचं काम केलंय असं म्हणतं आमदार गोपीचंद पडळकरांनी महाविकास आघाडी सरकारवती टीका केली. मुघल, इंग्रजांचा प्रत्येक गनिमांना अंगावर घेऊन स्वातंत्र्याचा ध्वज उंचवणारा माझा समाज आहे. आज माझ्या समाजाचा वापर प्रस्थापितांच्या सतरंज्या उचलण्यासाठी व्हावी, अशी काही मोजक्या घराण्यांची इच्छा असल्याचे देखील ते म्हणाले.

३ कोटी धगनर बांधवांशी गाठ आहे

कोरोनाच्या काळात धनगर समाज आर्थिकदृष्ट्या अत्यंत खचला असल्याचं चित्र आहे. परंतु त्या समाज्याचं राज्य सरकारला काहीचं देण घेण नसल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात सत्तेत आल्यापासून गावागावात हल्ले, विस्तापितांना टाचेखाली चिरड्याचे प्रकार पुन्हा एकदा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहेत. राज्य सरकारला माझं एकचं सांगणं आहे की, माझ्या धनगर समाज्याला जो पुर्वी निधी दिला जात होता. त्याची पुन्हा पूर्तता करावी अन्यथा लक्षात ठेवा गाठ ३ कोटी धगनर बांधवांशी तुमची गाठ आहे.

तुला खाऊ देतो म्हणत चिमुकलीवर अत्याचार, औरंगाबादमध्ये दोन अल्पवयीन मुलांचे संतापजनक कृत्य!

Rescue operation video : खडकाळ कड्यावरून 300 फूट खाली कोसळला युवक पण हवाईदलानं वाचवलं, पाहा थरार

अक्षरशः हैवानीयत; येवल्यात लाकडी दांडक्याने गुरासारखी मारहाण, अंगावर काटा आणणारा व्हिडिओ!

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.