AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा : विनोद तावडे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का? असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पवारांच्या एका मुलाखतीचा दाखला देत विनोद तावडेंनी हा सवाल उपस्थित केला. शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले होते, 2004 मध्ये मनमोहनसिंग पंतप्रधान होतील, हे कोणाला वाटले नव्हते. कारण त्यांनी […]

शरद पवारांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा : विनोद तावडे
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे का? असा सवाल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पवारांच्या एका मुलाखतीचा दाखला देत विनोद तावडेंनी हा सवाल उपस्थित केला.

शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले होते, 2004 मध्ये मनमोहनसिंग पंतप्रधान होतील, हे कोणाला वाटले नव्हते. कारण त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली नव्हती. मनमोहन सिंग त्यावेळी राज्यसभेत होते त्यामुळे ते अचानक पंतप्रधान होऊ शकले, या पवारांच्या विधानाचा संदर्भ देऊन तावडे म्हणाले की, “यंदा शरद पवार निवडणूक लढवित नाहीत, पण ते राज्यसभेचे सदस्य आहेत. याचाच अर्थ शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा आहे, ती त्यांनी बहुतेक आपल्या मुलाखतीत बोलून दाखविली असावी”

काँग्रेस राष्ट्रावादीचे जे महागठबंधन आहे, त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही, तो निवडणुकीनंतर ठरेल, राहुल गांधी यांना पंतप्रधान होण्याची उत्सुकता नाही, असेही शरद पवार यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले आहे, तसेच तुटलेल्या फुटलेल्या महागठबंधनमध्ये मायावती, ममता बॅनर्जी या सर्वांनाच पंतप्रधान बनण्याची इच्छा आहे, परंतु या महागठबंधनमध्ये असलेल्या गोंधळामुळे त्यांचा एक उमेदवार निश्चित होत नाही, या परिस्थितीत देशाची जनताही या गोंधळलेल्या महागठबंधनला मतदान करण्याऐवजी एनडीए महायुतीला मतदान करेल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात काल अंमळनेरमध्ये जी घटना घडली ती अतिशय चुकीची आहे. अशी घटना होणे, हे भाजपला शोभणारी नाही. या घटनेमागे काहीही आणि कोणतेही कारण असले, तरीही या पध्दतीची कुठलीही घटना पक्ष खपवून घेणार नाही, असं तावडेंनी नमूद केलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...