AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या मतदानाला सुरुवात, खडसे विरुद्ध महाजन, कोण ठरणार अव्वल?

जळगाव, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, एरंडोल, फैजपूर, पाचोरा 7 तालुक्यात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

जळगाव जिल्हा दूध संघाच्या मतदानाला सुरुवात, खडसे विरुद्ध महाजन, कोण ठरणार अव्वल?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 10, 2022 | 9:21 AM
Share

जळगावः जळगावात (Jalgaon) आज जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) विरुद्ध भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून जळगावातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. आज या लढतीचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. दूध संघाच्या 20 जागांसाठी मतदानाला साकळी आठ वाजेपासून सुरुवात झाली आहे.

जळगाव, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, एरंडोल, फैजपूर, पाचोरा 7 तालुक्यात आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीला 441 जण मतदान करणार आहेत. भुसावळ मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी मतदानाचा हक्क बजावला. भुसावळमध्ये एक मतदान केंद्र लावण्यात आले आहे. या केंद्रावर 44 जण मतदान करणार आहेत.

जळगाव दूध संघ निवडणूकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जळगावच्या  महापौर जयश्री महाजन यांच्या सासू मालती महाजन या  जळगाव तालुक्यातून उमेदवार आहेत. जळगाव शहरातील सत्य वॉलभ मतदान केंद्रावर महापौर जयश्री महाजन यांनी आणि त्यांच्या सासू मालती महाजन यांनी मतदान करून मतदानाचा पहिला हक्क बजावला असल्याचे पाहायला मिळाले दूध संघावर ताबा मिळवण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात चुरस पहायला मिळतेय. एकनाथ खडसे या निवडणुकीत एकटे पडल्याचं चित्र आहे. कारण मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार खडसे यांच्याविरोधात आहेत.

जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकारण पाहता, शिंदे-भाजप गटासाठीदेखील ही लढाई सोपी नाही. त्यामुळे या राजकीय आखाड्यात कोण विजयी ठरणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

हा तर कबड्डीचा सामना…

दरम्यान, जळगावचा हा सामना आमच्यासाठी कबड्डीचा सामना असल्याची प्रतिक्रिया क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तर या सामन्याचा मी अंपायर आहे, असं प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी दिलं. गिरीश महाजन यांनी त्यालाही उत्तर दिलं. अंपायर वगैरे नाही. तुम्ही आमच्यासमोर येऊन ही राजकीय कबड्डी खेळून जिंकून दाखवा, असं आव्हान गिरीश महाजन यांनी दिलंय.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा