AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘त्या’ अनुभवानंतर आता राज्यपाल पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील; जयंत पाटलांचा टोला

राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. मात्र, आता त्या कटू आठवणी काढण्यात अर्थ नाही. | Jayant Patil

'त्या' अनुभवानंतर आता राज्यपाल पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील; जयंत पाटलांचा टोला
Rohit Dhamnaskar
Rohit Dhamnaskar | Updated on: Nov 23, 2020 | 3:46 PM
Share

पुणे: राज्यात गेल्यावर्षी अजित पवार (Ajit Pawar) यांना हाताशी धरुन भाजपकडून करण्यात आलेल्या सत्तास्थापनेच्या अयशस्वी प्रयोगाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महाविकासघाडीतील नेत्यांनी शपथविधीच्या आठवणींना उजाळा देत एकप्रकारे भाजपच्या जखमेवर मीठ चोळले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबत मिश्किल टिप्पणी केली. (Devendra Fadnavis and Ajit Pawar wee hours oath taking ceremony)

त्या अनुभवानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आता पहाटे कोणतीच गोष्ट करत नसतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी लगावला. राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. मात्र, आता त्या कटू आठवणी काढण्यात अर्थ नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले. तसेच महाराष्ट्राला आता भाजपची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. प्रवीण दरेकर यांनी पदवधीर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्तांतर होण्याचा दावा केला. बरं झालं ते पदवीधर निवडणुकीनंतर सत्तांतर होईल, असे बोलले. निवडणुकीआधी होईल, असे बोलले नाहीत. मात्र, आता राज्याला भाजपची गरज नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले.

पुणे पदवीधर मतदारसंघात बोगस मतदारांची नोंदणी पुणे मतदारसंघात बोगस मतदारांची नोंदणी झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. पदवीधर मतदारसंघाच्या याद्या उशिरा जाहीर झाल्या. यामध्ये दुबार नावे, एकच मोबाईल नंबर, चुकीचे पत्ते, अशा अनेक त्रुटी आहेत. या मतदारांपर्यंत प्रचारयंत्रणा पोहोचू नये, म्हणून कोणीतरी असे केले आहे. याविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

‘आम्ही फडणवीसांना टरबुज्या म्हणत नाही, चंपा म्हटल्यावर चंद्रकांत पाटलांनी राग मानू नये’ देवेंद्र फडणवीसांना राष्ट्रवादी कधी टरबुज्या म्हणत नाही. चंद्रकांतदादांच्या नावाचा शॉर्टफॉर्म चंपा आहे. त्यांनी राग मानून घेऊ नये, असा टिपणी जयंत पाटलांनी केली. अशाप्रकारे कोणाचाही अपमान करण्याला राष्ट्रवादी काँग्रेस समर्थन देत नाही. शरद पवार यांनी आम्हाला अशा गोष्टी शिकवल्या नाहीत, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

पहाटेच्या शपथविधीची वर्षपूर्ती, अमावास्येचा फेरा; संजय राऊतांची भाजपवर बोचरी टीका

पहाटेच्या शपथविधीची वर्षपूर्ती, आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस-अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीला 1 वर्ष पूर्ण!, ते सरकार अल्पजीवी का ठरलं?

(Devendra Fadnavis and Ajit Pawar wee hours oath taking ceremony)

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...