AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सख्खे भाऊ पक्के वैरी, जयकुमार विरुद्ध शेखर गोरे, ‘माऊली संवाद’ला तुफान गर्दी

शिवसेना नेते शेखर गोरे (Jaykumar Gore vs Shekhar Gore) यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला महिलांची तुफान गर्दी होती.

सख्खे भाऊ पक्के वैरी, जयकुमार विरुद्ध शेखर गोरे, ‘माऊली संवाद’ला तुफान गर्दी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Sep 17, 2019 | 12:07 PM
Share

Jaykumar Gore vs Shekhar Gore सातारा : शिवसेना सचिव आणि अभिनेता आंदेश बांदेकर यांचा ‘माऊली संवाद’ हा कार्यक्रम माण तालुक्यातील दहिवडी इथे पार पडला. शिवसेना नेते शेखर गोरे (Jaykumar Gore vs Shekhar Gore) यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला महिलांची तुफान गर्दी होती. माण आणि खटाव तालुक्यातून हजारो महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

माण खटावचे काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये दाखल झालेले आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात त्यांचे सख्खे बंधू शेखर गोरे यांचे आव्हान आहे. भाजपने हा मतदारसंघ जयकुमार गोरेंसाठी मागितला आहे. तर शेखर गोरे यांना तिकीट देण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. सख्खे भाऊ एकमेकांविरोधात बाह्या सरसावून सज्ज आहेत.या दोघांमध्येच विधानसभा निवडणुकीची लढत होणार आहे.

या मेळाव्याच्या निमित्ताने स्वत:ची ताकद दाखवण्याचा प्रयत्न शेखर गोरेंनी केला.

राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी स्वत:ची ताकद या कार्यक्रमातून दाखवली. त्यामुळे आमदार जयकुमार गोरे यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत मोठे आव्हान असल्याची चर्चा सातारा जिल्ह्यात होत आहे.

कोण आहेत जयकुमार गोरे?

  • जयकुमार गोरे हे 2014 मध्ये सातारा जिल्ह्यातील माण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले
  • 2009 आणि 2014 असे दोन वेळा ते या मतदारसंघात निवडून आले आहेत.
  • 2009 मध्ये अपक्ष तर 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली.
  • माण विधानसभा मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे जयकुमार गोरेंची भूमिका यंदा महत्त्वाची ठरली
  • काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी असली, तरी माण मध्ये जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही
  • जयकुमार गोरे यांनी सोलापुरात महाजनादेश यात्रेत अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला

कोण आहेत शेखर गोरे?

  • शेखर गोरे हे आमदार जयकुमार गोरे यांचे सख्खे लहान बंधू आहेत.
  • शेखर गोरे यांनी 2014 ची विधानसभा निवडणूक रासपच्या तिकिटावर लढवली होती, त्यावेळी त्यांचा पराभव झाला
  • शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र लोकसभा निवडणुकीवेळी शरद पवारांसमोरच त्यांचा राडा झाला
  • राष्ट्रवादी काँग्रेसमधे प्रवेश करुन त्यांनी विधानपरिषदेची निवडणूक लढवली. मात्र त्यामध्येही कॉंग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला.
  • नुकतंच शेखर गोरे यांनी मुंबईत मातोश्रीवर येऊन शिवसेनेत प्रवेश केला.

संबंधित बातम्या 

VIDEO : पवारांनी हात पकडून थांबवलं, तरी पदाधिकारी ऐकेना, साताऱ्यात गोंधळ 

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ