AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणुकीत केसीआर काँग्रेसप्रणित महाआघाडीचा खेळ बिघडवणार?

हैदराबाद : देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणत काँग्रेसकडून महाआघाडी बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध राज्यातील भाजपविरोधी पक्षांना यामध्ये एकत्र आणलं जात आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी घेतली आहे. पण महाआघाडीचा खेळ बिघडेल, अशी एक तिसरी आघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर […]

लोकसभा निवडणुकीत केसीआर काँग्रेसप्रणित महाआघाडीचा खेळ बिघडवणार?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM
Share

हैदराबाद : देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणत काँग्रेसकडून महाआघाडी बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध राज्यातील भाजपविरोधी पक्षांना यामध्ये एकत्र आणलं जात आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी घेतली आहे. पण महाआघाडीचा खेळ बिघडेल, अशी एक तिसरी आघाडी अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जातंय. ना काँग्रेस, ना भाजप असं त्यांचं मत आहे. यासाठी ते ओदिशाचा सत्ताधारी पक्ष बीजेडी म्हणजेच बिजू जनता दल आणि पश्चिम बंगालचा सत्ताधारी पक्ष तृणमुल काँग्रेसला सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेटही घेतली आहे.

ओदिशामध्ये बीजेडीचं मोठं वजन आहे. के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली, तर सोमवारी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली. सपा आणि बसपाचे प्रमुख अनुक्रमे अखिलेश यादव आणि मायावती यांचीही भेट ते घेणार आहेत. वाचाराहुल गांधींचं नेतृत्त्व पवारांनाही मान्य, विरोधकांची मोट बांधण्याचा विडा उचलला

केसीआर यांनी या तिसऱ्या आघाडीबाबत सूचक संकेत दिले आहेत. आमची चर्चा सुरु आहे. लवकरच एका प्लॅनसह समोर येऊ. यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी कोलकात्यात ममतांची भेट घेतल्यानंतर दिली. त्यामुळे आता ही तिसरी आघाडी महाआघाडीत बिघाडी करण्याची शक्यता आहे.

देशातलं सर्वात मोठं राज्य उत्तर प्रदेशमध्ये 80 मतदारसंघ आहेत. या राज्यातील प्रमुख प्रादेशिक पक्ष सपा आणि बसपाने काँग्रेसशी जवळीक न साधता एकत्र येण्याचा निर्णय घेतलाय. दोन्ही पक्षांच्या मतांचं विभाजन टाळल्यास काय होऊ शकतं याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वीच गोरखपूर (यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा लोकसभा मतदारसंघ) पोटनिवडणुकीत आला होता. सपा आणि बसपाने एकत्र येत भाजपचा दारुण पराभव केला होता.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या