AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर सोमय्यांचं पहिलं ट्विट, ठाकरेंना उद्देशून म्हणाले…

संजय राऊत यांनी वादळी पत्रकार परिषद घेत सोमय्यांचा भडवा म्हणत समाचार घेतला आहे. त्यानंतर किरीट सोमय्यांचेही आता ट्विट आले आहे. त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना टार्गेट केले आहे.

राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर सोमय्यांचं पहिलं ट्विट, ठाकरेंना उद्देशून म्हणाले...
सोमय्या आणि राऊत वाद वाढलाImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Feb 15, 2022 | 6:50 PM
Share

मुंबई : संजय राऊत यांनी वादळी पत्रकार परिषद (Sanjay Raut Press Conference) घेत सोमय्यांचा (Kirit Somaiya) भडवा म्हणत समाचार घेतला आहे. त्यानंतर किरीट सोमय्यांचेही आता ट्विट आले आहे. त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि संजय राऊतांना टार्गेट केले आहे. आणखी एका आरोपाचे स्वागत आहे. मी कुठल्याही बेकायदेशीर व्यवहारात सहभागी नाही. मात्र संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कोविड काळातील घोटाळ्यावर आणि सुजीत पाटकर, प्रवीण राऊत यांच्यावर का बोलत नाहीत? असा सवाल सोमय्यांनी विचारला आहे. तसेच भाजप नेते मोहीत कंबोज यांनीही पत्रकार परिषद घेत संजय राऊतांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच संजय राऊत माझ्या घरी आले होते, तर मला ते ओळखत कसे नाहीत? असा सवाल विचारत त्यांनी राऊतांवर जोरदार पलटवार केला आहे.

किरीट सोमय्यांचं ट्विट काय?

सोमय्यांनी काय पलटवार केला?

2017 मध्ये संजय राऊत संपादक असलेल्या सामना ने माझ्या पत्नीच्या नावाने असेच आरोप केले होते. आज त्याच बांधकाम व्यावसायिकाचे नाव घेऊन माझ्या मुलावर आरोप केले जात आहेत. या आरोपाबाबत ठाकरे सरकारने माझी जरूर चौकशी करावी , असे आव्हान भाजपा नेते  किरीट सोमय्या यांनी दिले आहे. सोमय्या यांनी म्हटले आहे की , ठाकरे सरकारने माझ्याविरुद्ध आतापर्यंत 10 गुन्हे दाखल केले आहेत, आणखी 3 दाखल होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता आणखी एका चौकशीस मी तयार आहे. खुशाल चौकशी करा. मी व माझ्या कुटुंबियांचा कोणत्याही भ्रष्ट , चुकीच्या व्यवहारात सहभाग नाही. खा. संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत कोविड उपचार केंद्रातील गैरव्यवहाराबाबत मी केलेल्या आरोपांबाबत तसेच त्यांचे प्रवीण राऊत, सुजीत पाटकर यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत एक शब्दही उच्चारला नाही, याकडेही डॉ. सोमय्या यांनी लक्ष वेधले.

‘राऊत साहेब तुम्ही उद्धव ठाकरेंचे ब्लू आईड बॉय आहात की शरद पवारांचे?’, मोहित कंबोज यांचा खोचक सवाल; आरोपांनाही जोरदार प्रत्युत्तर

इकडे संजय राऊतांची पत्रकार परिषद; आणि तिकडे भाजपची कार्यकारिणीच बरखास्त; कुठे झाली आहे बंडाळी

राऊतांनी भाजपच्या ज्या नेत्याचं नाव घेणे टाळलं, त्याचं नाव दरेकरांनीच उघड केलं, कोण कुणचा गेम करतंय?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली