Gokul Dudh Election Result : गोकुळ निवडणुकीचा निकाल फिरवण्यासाठी…रोहित पवारांच्या ट्वीटने एकच खळबळ, वकिलांची फौज दाखल!

गोकुळवर सत्ता हवी असेल तर 13 जागांचा जादुई आकडा गाठणे गरजेचे आहे. सतेज पाटलांच्या पॅनेलने हा आकडा पार केलाय. त्यामुळे आता गोकुळवर सत्तांतर होणार, असं हे आता स्षप्ट झालंय. परंतु रोहित पवार यांच्या आरोपांनी नवी खळबळ उडाली आहे.

Gokul Dudh Election Result : गोकुळ निवडणुकीचा निकाल फिरवण्यासाठी...रोहित पवारांच्या ट्वीटने एकच खळबळ, वकिलांची फौज दाखल!
rohit pawar and gokul election result live update
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2026 | 8:58 PM

Gokul Dudh Election Result Updates : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल आता जवळजवळ स्पष्टच झालाय. या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वातील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी पॅनेलने बाजी मारली आहे. या दूध संघासाठी एकूण 25 जागांसाठी निवडणूक झाली होती. यातील 13 जागांवर सतेज पाटील यांचे उमेदवार तर 12 जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले आहेत. दरम्यान, एका जागेवर मतांची फेरमोजणी झाल्यानंतर सतेज पाटील यांच्या विजयी उमेदवारांचा आकडा 14 वरून 13 वर आला. मतांच्या फेरमोजणीत महायुतीच्या उमेदवाराचा विजय झाला. आता याच कारणामुळे महाविकास आघाडीचे नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. सतेज पाटील यांच्या गंभीर आरोपानंतर आता आमदार रोहित पवार यांनीदेखील खळबळजनक आरोप केले आहेत. गोकुळचा निकाल फिरवण्यासाटी सूत्र हलवली जातायत, असं म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिलीय.

एका जागेवर पुन्हा मतमोजणी का झाली? निकाल काय लागला?

गोकुळ दूध संघासाठी मतांची मोजणी केली जात होती. सुरुवातीच्या कलामध्ये सतेज पाटील यांचे पॅनेल आघाडीवर होते. नंतर आघाडीचा हा फरक हळूहळू कमी झाला. एका जागेसाठी मतांची पुन्हा मोजणी करण्यात आली. त्यानतंर सतेज पाटील यांच्या पॅनेलचे सचिन घोरपडे पराभूत झाले. तर महायुतीच्या पॅनेलचे अमर पाटील यांचा विजय झाला. त्यानंतर सतेज पाटील यांच्या पॅनेलचा 13 तर महायुतीच्या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचा एकूण 12 जागांवर विजय झाला. गोकुळवर सत्ता हवी असेल तर 13 जागांचा जादुई आकडा गाठणे गरजेचे आहे. सतेज पाटलांच्या पॅनेलने हा आकडा पार केलाय. त्यामुळे आता गोकुळवर सत्तांतर होणार, असं हे आता स्षप्ट झालंय. परंतु रोहित पवार यांच्या आरोपांनी नवी खळबळ उडाली आहे.

Loading...

रोहित पवार यांनी काय आरोप केला?

एकीकडे गोकुळ निवडणुकीचा गोंधळ कायम असताना दुसरीकडे रोहित पवार यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया खात्यावर एक पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. ‘गोकुळ दूधसंघाच्या बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुकीचा कौल क्लिअर आहे. पण…… आता खरा सत्तेचा दुरुपयोग सुरु झाल्याचं कळतंय. निवडून आलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र न देता फेरमतमोजणीच्या माध्यमातून अपेक्षित निकाल फिरण्यासाठी सूत्रं हलवली जातायत,’ असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. तसेच लक्षात ठेवा, जर का निकाल चोरण्याचा प्रयत्न केला तर गाठ प्रामाणिक सभासदांशी आहे. घराबाहेरही पडू देणार नाहीत… नेत्यांनाही आणि पिलावळींनाही, असा थेट इशाराही त्यांनी दिलाय. दरम्यान, महायुतीच्या तीन उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केल्यानंतर कायदेशीर बाजू जाणून घेण्यासाठी वकिलांना पाचारण करण्यात आले आहे. निकालात काही बदल जाला तर नेमकं काय करता येईल, यावर चर्चा सुरू झालीय. त्यामुळे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us