Gokul Dudh Sangh Election : गोकुळ निवडणुकीत अखेर सर्वात मोठा ट्विस्ट, महायुतीच्या 3 पराभूत उमेदवारांनी ऐन वेळी…सतेज पाटलांना जबर धक्का?
गोकुळ निवडणूक निकालाचा घोळ अजूनही कायम आहे. अगोदर महायुतीने आक्षेप घेतल्यानंतर एका जागेसाठी मतमोजणी पुन्हा करण्यात आली. यात सतेज पाटील यांच्या पॅनेलचे सचिन घोरपडे यांचा पराभव तर महायुतीच्या पॅनेलचे अमर पाटील यांचा पराभव झाला.

Gokul Election Result : कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निकालात ट्विस्टवर ट्विस्ट येत आहेत. मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीला सतेज पाटील यांचे पॅनेल आघाडीवर होते. नंतर मात्र ही आघाडी कमी होत गेली. एका जागेवर पुन्हा मतमोजणी झाल्यानंतर सतेज पाटील यांच्या पॅनेलचा पराभव झाला. ऐनवेळी आलेल्या या ट्विस्टमुळे सतेज पाटील यांना जबर धक्का बसला. त्यानंतर आता महायुतीने सर्वात मोठा ट्विस्ट आणला आहे. त्यामुळे आता ऐनवेळी गेम पलटणार का? असा सवाल उपस्थित झालाय.
नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणूक निकालाचा घोळ अजूनही कायम आहे. अगोदर महायुतीने आक्षेप घेतल्यानंतर एका जागेसाठी मतमोजणी पुन्हा करण्यात आली. यात सतेज पाटील यांच्या पॅनेलचे सचिन घोरपडे यांचा पराभव तर महायुतीच्या पॅनेलचे अमर पाटील यांचा पराभव झाला. म्हणजेच सतेज पाटील यांच्या पॅनेलची एक जागा कमी झाली. हा प्रकार घडल्यानंतर सतेज पाटील यांनी गंभीर आरोप केले होते. निकाल फिरवता यावा म्हणून मुद्दामहून संथ गतीने मतमोजणी केली जातेय, असा आरोप सतेज पाटील यांनी केला. त्यानंतर आता महायुतीच्या पॅनेलच्या तीन पराभूत उमेदवारांनी नवा ट्विस्ट आणला आहे.
आता नवा आक्षेप काय? काय घडतंय?
समोर आलेल्या माहितीनुसार महायुतीचे पराभूत उमेदवार युवराज पाटील यांनी फेरमतमोजणीसाठी पुन्हा अर्ज केला आहे. त्यामुळेच सतेज पाटील आजूनही मतमोजणी केंद्रात थांबून आहेत. दुसरीकडे पराभूत उमेदवार तथा गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांनी देखील फेरमतमोजणीसाठी अर्ज केला आहे. त्यामुळे आता दोन जागांसाठी पुन्हा मतमोजणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच सतेज पाटील मतमोजणी केंद्रावर बसून आहेत. आता नेमकं काय होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
रोहित पवार यांनीही केले गंभीर आरोप
दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी गोकुळच्या मतमोजणीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोईचा निकाल लावता यावा यासाठी सूत्र हलवली जात आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे या निवडणुकीत नेमकं काय होणार, अंतिम निकाल काय असणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
