AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gokul Dudh Election Winner List : गोकुळ निवडणुकीत ऐनवेळी गेम, तरी सतेज पाटलांनी मैदान मारलं, विजयी उमेदवारांची पूर्ण यादी समोर

मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या कलांमध्ये सेतज पाटील यांच्या पॅनेलचे 15 उमेदवार आघाडीवर होते. नंतर हा फरक कमी होत गेला. एका जागेसाठी पुन्हा मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर सतेज पाटलांच्या पॅनेलचे सचिन घोरपडे पराभूत झाले.

Gokul Dudh Election Winner List : गोकुळ निवडणुकीत ऐनवेळी गेम, तरी सतेज पाटलांनी मैदान मारलं, विजयी उमेदवारांची पूर्ण यादी समोर
gokul dudh sangh election result winner listImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 19, 2026 | 7:23 PM
Share

Gokul Dudh Election Result :  कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. गोकुळवर सत्ता मिळवण्यासाठी महायुतीने तसेच सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वातील पॅनेलने पूर्ण ताकद लावली होती. दरम्यान या निवडणुकीचा निकाल आता समोर आलाय. या निवडणुकीत कोल्हापूरकरांनी सतेज पाटील यांच्या पेनेलला यावेळी साथ दिली. एकूण 25 जागांसाठी निवडणूक झाली होती. यातील 13 जागांवर सतेज पाटील यांच्या पॅनेलच्या उमेदवारांचा तर 12 जागांवर महायुतीच्या पॅनेलचा विजय झालाय.

सतेज पाटलांची एक जागा कमी कशी झाली?

या निवडणुकीत महायुतीने राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी आणि विरोधकांनी सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वात राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडी नावाने पॅनेल उभे केले होते. समोर आलेल्या निकालानंतर गोकुळवर आता सतेज पाटलांच्याच पॅनेलची सत्ता असणार हे आता स्पष्ट झाले आहे. मतमोजणी सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या कलांमध्ये सेतज पाटील यांच्या पॅनेलचे 15 उमेदवार आघाडीवर होते. नंतर हा फरक कमी होत गेला. एका जागेसाठी पुन्हा मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर सतेज पाटलांच्या पॅनेलचे सचिन घोरपडे पराभूत झाले. तर महायुतीच्या पॅनेलचे अमर पाटील यांचा विजय झाला. त्यामुळे सतेज पाटील यांच्या एक पॅनेलची एक जागा कमी झाली. तरीदेखील गोकुळ चालवण्यासाठी जो जादुई आकडा हवा आहे, तो सतेज पाटील यांच्या पॅनेलने गाठला आहे.

गोकुळ निवडणुकीतील सर्व विजयी उमेदवारांची यादी (Gokul Dudh Election Winner candidate Full List)

सर्वसाधारण गट

१. अभिजित प्रभाकर तायशेटे (सतेज पाटील)

२. शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर (सतेज पाटील)

३. राहुल पांडुरंग पाटील (महायुती) ⁠

४ चेतन अरुण नरके (महायुती)

५ अजित शशिकांत नरके (महायुती)

६ किसन बापूसो चौगले (सतेज पाटील)

७ अंबरीषसिंह संजय घाटगे (महायुती)

८ बाबासाहेब श्रीपती चौगले (सतेज पाटील)

९ राहुल बजरंग देसाई (सतेज पाटील)

१० विद्याधर बाबुराव गुरबे (सतेज पाटील)

११ विरेंद्र संजय मंडलिक (महायुती)

१२ मदन बाबुराव देसाई (महायुती)

१३ बाबासाहेब विष्णू देवकर (सतेज पाटील)

१४ राजेश नरसिंगराव पाटील (महायुती)

१५ रणजितसिंह दिलीपराव पाटील (महायुती)

१६ रणजितसिंह कृष्णराव पाटील (महायुती)

१७ अजित पांडुरंग पाटील (महायुती)

१८ कर्णसिह गायकवाड (महायुती )

१९ विश्वजीत दिनकरराव जाधव (सतेज पाटील)

२० अमर पाटील कोडोली (महायुती)

महिला राखीव गट

१. अंजना केदारी रेडेकर (सतेज पाटील)

२. भाग्यश्री धीरज डोंगळे (सतेज पाटील)

इतर मागासवर्गीय गट

१. शशिकांत शामराव खोत (सतेज पाटील)

अनुसूचित जाती गट

१. राजू बाबा आवळे (सतेज पाटील)

भटक्या-विमुक्त जमाती गट

१. बयाजी शेळके (सतेज पाटील) २. ⁠..

…..

समविचारी आघाडी (सतेज पाटील) – 13 महायुती – 12

Follow Us
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्
Tiger Shroff Case : टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट समोर; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्.....