AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लालकृष्ण अडवाणींचा राजकारणातून संन्यास, गडकरींची माहिती

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात याबाबत माहिती दिली. लालकृष्ण अडवाणी यांचं वय झालंय, प्रत्येकाच्या निवृत्तीचं एक वय असतं. आमच्यासाठीही हे लागू आहे, अशी माहितीही गडकरींनी दिली. 91 वर्षीय अडवाणींना यावेळी भाजपने तिकीट दिलेलं नाही. पण त्यांनीच निवृत्ती घेतली असल्याची माहिती गडकरींनी दिली. […]

लालकृष्ण अडवाणींचा राजकारणातून संन्यास, गडकरींची माहिती
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM
Share

नागपूर : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात याबाबत माहिती दिली. लालकृष्ण अडवाणी यांचं वय झालंय, प्रत्येकाच्या निवृत्तीचं एक वय असतं. आमच्यासाठीही हे लागू आहे, अशी माहितीही गडकरींनी दिली. 91 वर्षीय अडवाणींना यावेळी भाजपने तिकीट दिलेलं नाही. पण त्यांनीच निवृत्ती घेतली असल्याची माहिती गडकरींनी दिली.

अडवाणींचं सध्याचं वय 91 वर्षे आहे, जे पुढच्या निवडणुकीपर्यंत 96 वर्षे होईल. त्यामुळेच अडवणींऐवजी यावेळी भाजपने दुसरा उमेदवार दिला आहे. अडवाणी आतापर्यंत गुजरातमधील गांधीनगरच्या जागेवरुन लढायचे. यावेळी त्यांच्या जागी भाजपाध्यक्ष अमित शाह गांधीनगरमधून लढणार आहेत. भाजपवर अडवणांनी डावलल्यावरुन टीका होत असल्यामुळे गडकरींनी त्यांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर दिलं.

लालकृष्ण अडवाणी यांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला पंतप्रधान म्हणून 2014 मध्ये सर्वात अगोदर विरोध केला होता. तेव्हापासूनच अडवाणींना बाजूला सारल्याचा आरोप केला जातो. अडवाणींसह भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनाही तिकीट दिलेलं नाही. भाजपने मार्गदर्शक मंडळामध्ये अडवाणी आणि इतर सर्व ज्येष्ठ नेत्यांचा समावेश केला होता.

Follow Us
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.