AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राहुल गांधींविरोधात ललित मोदी लंडनमध्ये तक्रार दाखल करणार

लंडन : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना आयपीएलचा संस्थापक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी फरार आरोपी ललित मोदीने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात दंड थोपटले आहे. राहुल गांधी यांनी ‘सारे मोदी चोर’ असे म्हटले होते, त्यावर ललित मोदी नाराज आहे. आता त्याने राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. ललित मोदीने ट्विट केले, ‘सारे मोदी चोर हैं’ […]

राहुल गांधींविरोधात ललित मोदी लंडनमध्ये तक्रार दाखल करणार
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM
Share

लंडन : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना आयपीएलचा संस्थापक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी फरार आरोपी ललित मोदीने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात दंड थोपटले आहे. राहुल गांधी यांनी ‘सारे मोदी चोर’ असे म्हटले होते, त्यावर ललित मोदी नाराज आहे. आता त्याने राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे.

ललित मोदीने ट्विट केले, ‘सारे मोदी चोर हैं’ या प्रकरणाला न्यायालयात घेऊन जाणार आहे. लंडनच्या न्यायालयात याबाबत तक्रार दाखल करेन. यावेळी मोदीने राहुल गांधीवर जोरदार टीका केली आणि काँग्रेसच्या घोटाळ्यांची यादीच जाहीर केली. तसेच 5 दशकांपासून भारताला लुटणारे गांधी कुटुंब माझ्यावर आरोप करत असल्याचे टीकास्त्रही मोदीने सोडले.

राहुल गांधींवर दाखल याचिका

जर्मनीमध्ये भारताची प्रतिमा मलिन करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत बिहारमधील एका वकिलाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. सुधीर कुमार ओझा असे या वकिलाचे नाव होते. अॅड. ओझा यांनी राहुल गांधींवर विदेशात जाऊन भारताची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला होता. गांधी यांनी भारतात होत असलेल्या आयसिसच्या (ISIS) प्रसाराला योग्य ठरवले होते, असा आरोप ओझांनी केला होता. याच वकिलांनी त्याआधी अन्य एका प्रकरणात तेजस्वी यादव यांच्याविरोधातही याचिका दाखल केली होती.

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...