AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिनी विधानसभेसाठी सज्ज व्हा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वात मोठी अपडेट

Local Body Election Schedule: राज्यातील जनतेला आणि राजकीय पक्षांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे वेध लागले आहेत. 31 जानेवारी पर्यंत या निवडणुका पार पाडाव्यात असे आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. आता या निवडणूकीच्या वेळापत्रकाबाबत सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

मिनी विधानसभेसाठी सज्ज व्हा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वात मोठी अपडेट
Local Body Election Schedule
| Updated on: Nov 01, 2025 | 7:52 PM
Share

राज्यातील जनतेला आणि राजकीय पक्षांचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे वेध लागले आहेत. जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. 31 जानेवारी पर्यंत या निवडणुका पार पाडाव्यात असे आदेश न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिले आहेत. मात्र अजूनही निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. अशातच आता पुढील काही दिवसांमध्ये निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट

गेल्या काही काळापासून महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. मात्र आता न्यायालयाच्या आदेशानंतर या निवडणुका लवकरच पार पडणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील आढवड्यात या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. 5 किंवा 6 तारखेला वेळापत्रक जाहीर होऊ शकतं. यानंतर लगेच आचारसंहिता लागणार आहे. तसेच या निवडणुका 3 टप्प्यात होणार असल्याचे आणि मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

3 टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता

सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात नगरपालिका, दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि तिसऱ्या टप्प्यात महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. मात्र या निवडणुकींच्या तारखा कधी जाहीर केल्या जातील याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही, मात्र या निवडणुका 31 जानेवारी पूर्वी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

दिलीप वळसे पाटलांनी सांगितली तारीख

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकां निवडणुकीच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहे. या तारखा जाही करताना त्यांनी कार्यकर्त्यांना लगेच कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले की, ‘मी तारीख जाहीर करत नाही, तो अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. पण आमच्याकडील माहितीनुसार 5 नोव्हेंबर ला नगरपालिका, नगरपंचायत निवडणूक जाहीर होतील तर 15 डिसेंबरला जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदान होईल. जिल्हा परिषदेच्या निवडणूका सुरु असताना महानगरपालिकांच्या निवडणूका जाहीर होऊन 15 जानेवारीला मतदान होईल आणि 31 जानेवारीला सर्व निवडणुका पूर्ण होतील.’ मंचर येथे युवक-युवती मेळाव्यात बोलताना वळसे पाटलांनी ही माहिती दिली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...