AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुजय विखेंविरुद्ध संग्राम की अरुण जगताप?

अहमदनगर: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोठ्या रंजक घडामोडी घडत आहेत. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नगरचं राजकारणच पालटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सुजय विखे पाटील यांना दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीही जाहीर केली आहे. त्यामुळे सुजय विखेंविरोधात निवडणूक कोण लढवणार याबाबत आता राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. राष्ट्रवादीकडून दोन नावं […]

सुजय विखेंविरुद्ध संग्राम की अरुण जगताप?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM
Share

अहमदनगर: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात मोठ्या रंजक घडामोडी घडत आहेत. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नगरचं राजकारणच पालटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी सुजय विखे पाटील यांना दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीही जाहीर केली आहे. त्यामुळे सुजय विखेंविरोधात निवडणूक कोण लढवणार याबाबत आता राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

राष्ट्रवादीकडून दोन नावं चर्चेत

आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहे. राष्ट्रवादी सुजय विखेंविरोधात कोणाला उमेदवारी देणार हे येत्या काही तासात जाहीर होईल. सध्या राष्ट्रवादीकडून दोन नावं चर्चेत आहेत. त्यातील पहिलं नाव म्हणजे विद्यमान विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप आणि दुसरं म्हणजे त्यांचे सुपुत्र संग्राम जगताप होय. या दोघांपैकी एकाला नगरमधून लोकसभेसाठी उतरवण्याची तयारी राष्ट्रवादीने केल्याचं सांगण्यात येत आहे.

संग्राम जगताप

विधानसभेचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांना लोकसभेचं तिकीट देऊन राष्ट्रवादी काँग्रेस नगरमध्ये मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत आहे. संग्राम जगताप हा नगरमधील तरुण चेहरा आहे. त्यांच्या मागे तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. महत्त्वाचं म्हणजे नगरचं राजकारण ज्यांच्याभोवती फिरतं ते भाजप आमदार शिवाजी कर्डिले हे संग्राम जगताप यांचे सासरे आहेत. महानगरपालिकेत संग्राम जगताप यांनी सासरे शिवाजी कर्डिलेंच्या भाजपला मदत केली होती. त्याची परतफेड शिवाजी कर्डिले करु शकतात.

संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली तर नगरमध्ये सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप असा दोन तरुणांचा सामना होऊ शकतो.

अशावेळी शिवाजी कर्डिले हे लेकीच्या नवऱ्याला मदत करणार की काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये आलेल्या सुजय विखेंना मदत करणार असा प्रश्न असेल.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी खासदार यशवंत गडाख यांचे सुपुत्र प्रशांत गडाख यांचं आणि विखे घराण्याचं वैर आहे. त्यामुळे त्यांचीही ताकद संग्राम जगतापांच्या मागे उभी राहू शकते.

अरुणकाका जगताप

राष्ट्रवादीचे विधानपरिषदेतील आमदार अरुण जगताप हे सुजय विखेंविरोधात लोकसभा लढवण्याची दाट शक्यता आहे. अरुण जगताप यांना उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादीची सर्व ताकद त्यांच्या मागे उभी राहू शकते.  विशेष म्हणजे, अहमदनगरमधील भाजपचे महत्त्वाचे नेते मानले जाणारे आमदार शिवाजी कर्डिले हे राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप यांचे व्याही आहेत. म्हणजेच, अरुण जगताप यांचे सुपुत्र आमदार संग्राम जगताप यांची पत्नी ही शिवाजी कर्डिले यांची कन्या आहे. त्यामुळे नगरमध्ये कर्डिले आणि जगताप कुटुंबात येत्या लोकसभेच्या निमित्ताने धर्मसंकट उभं राहण्याची शक्यता आहे. पण महानगरपालिकेत संग्राम जगताप यांनी सासरे शिवाजी कर्डिलेंच्या भाजपला मदत केली होती. त्याची परतफेड शिवाजी कर्डिले करु शकतात.

कोण आहेत अरुण जगताप?

अरुण जगताप हे राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादीचे विधानसभेचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील आहेत. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांची मुलगी ही संग्राम जगताप यांची पत्नी आहे. नगर महापालिका निवडणुकीत केडगावमध्ये शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात या सर्वांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यावेळी आमदार संग्राम जगताप यांना अटक झाली होती तर अरुण जगताप पसार होते. अरुण जगताप यांनी विधानपरिषद निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपलं शिक्षण चौथी पास इतकं दिलं आहे.

संबंधित बातम्या

नगरमध्ये सुजयला राष्ट्रवादीकडून अरुणकाका भिडणार? 

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी