AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खातेवाटपावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणतात…

मी चांगलं काम करेन, सर्वांना सोबत घेऊन काम करेन, आवडीची लोकं माझ्यासोबत आहेत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया.

खातेवाटपावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणतात...
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jan 05, 2020 | 1:27 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाविकास आघाडी सरकारचं खातेवाटपं अखेर जाहीर झालं (Ministers and Portfolio distribution of Congress). मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाच्या यादीला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली. त्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आलं. यामध्ये यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांना खातेवापट जाहीर करण्यात आलं आहे.

खाते वाटपानंतर मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, अशोक चव्हाण, यशोमती ठाकूर इत्यादी मंत्र्यांनी त्यांना देण्यात आलेल्या जबाबदारीबाबत मतं व्यक्त केली आहेत.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 

“मी चांगलं काम करेन, सर्वांना सोबत घेऊन काम करेन, आवडीची लोकं माझ्यासोबत आहेत. मी उद्या पदभार स्वीकारेन”, अशी प्रतिक्रिया पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

“खातेवटपाचा संपूर्ण अधिकार पक्षातील नेत्यांचा आहे. त्यांनी माझ्या बाबतीत जो निर्णय घेतला त्याप्रमाणे काम करेन”, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. “हा विभाग मी पूर्वी सांभळला आहे. उद्यापासून कामाला लागणार आहे. अधिकाऱ्यांची उद्या मुंबईत बैठक बोलवणार आहे”, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

“मला मिळालेलं खातं मोठं आहे. या खात्याच्या माध्यमातून समाजकार्य होणार आहे. पाण्याचं पुण्य करण्याची जबाबदारी मला मिळाली आहे. पाण्यापासून वंचितांना पाणी देणार. अपनी झलक सबसे अलग अशा पद्धतीचं माझं काम असणार. पाणी कसं पाजयच हे मला चांगलं माहीत आहे”, अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

राज्यमंत्री सतेज पाटील

“आघाडी सरकारच्या काळातील चार वर्षाचा गृह राज्यमंत्री पदाचा अनुभव असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठांनी माझ्यावर पुन्हा एकदा ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली. या जबाबदारीला न्याय देण्याचा माझा प्रयत्न असेल, असं राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं. राज्यातील महिला सुरक्षेबरोबरच मायक्रोफायनान्स कंपन्यांनी घातलेल्या घोळावर प्राधान्याने काम करणार असल्याचं सांगतानाच आघाडी सरकारच्या काळात घेतलेला 5 हजार पोलीस भरतीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सतेज पाटील यांनी सांगितलं. सतेज पाटलांकडे गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण हे खाते देण्यात आले आहेत.

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडणार, असं अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं. “पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी जी जबाबदारी दिली आहे, ती पार पाडणार असून, या नवीन मिळालेलं अन्न औषध प्रशासन या खात्यात अधिक जोमाने काम करणार”, असं डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितलं.

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर

“या खात्यामध्ये महिलांना सक्षम करण्याची संधी मला मिळणार आहे. मागच्या काळात ज्या गोष्टी होऊ शकल्या नाहीत, ते या निमित्ताने होतील”, अशी अपेक्षा महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली. तसेच, काँग्रेसमध्ये खातेवाटपावरून कोणतीही नाराजी नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

“शालेय शिक्षण खूप मोठं खातं आहे. महाराष्ट्राचे भविष्य विद्यार्थी आहेत, शिक्षणाच्या क्षेत्रात सर्व समाजातील मुला-मुलींना समान दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी माझा प्रयत्न असेल”, असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सागंतिलं.

ठाकरे मंत्रिमंडळाचे खातेवाटप

राष्ट्रवादी 16 (12 + 04)

अजित पवार (उपमुख्यमंत्री) : वित्त, नियोजन जयंत पाटील : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास छगन भुजबळ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण दिलीप वळसे पाटील : कामगार, राज्य उत्पादन शुल्क धनंजय मुंडे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य अनिल देशमुख : गृह हसन मुश्रीफ  : ग्राम विकास राजेंद्र शिंगणे : अन्न व औषध प्रशासन नवाब मलिक : अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता राजेश टोपे : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण जितेंद्र आव्हाड : गृहनिर्माण बाळासाहेब पाटील : सहकार, पणन

राष्ट्रवादी – राज्यमंत्री

दत्तात्रय भरणे : सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन

आदिती तटकरे : उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क

संजय बनसोडे : पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य

प्राजक्त तनपुरे : नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन

———–

शिवसेना 14 (10 + 04)

सुभाष देसाई : उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा एकनाथ शिंदे : नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) संजय राठोड : वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन गुलाबराव पाटील : पाणी पुरवठा व स्वच्छता दादा भुसे : कृषि, माजी सैनिक कल्याण संदीपान भुमरे : रोजगार हमी, फलोत्पादन अनिल परब : परिवहन, संसदीय कार्य उदय सामंत : उच्च व तंत्र शिक्षण आदित्य ठाकरे : पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार शंकरराव गडाख (क्रांतिकारी पक्ष) : मृद व जलसंधारण

शिवसेना – राज्यमंत्री

अब्दुल सत्तार : महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य

शंभूराज देसाई : गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन

बच्चू कडू (प्रहार जनशक्ती) : जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार

राजेंद्र येड्रावकर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य

—————

काँग्रेस 12 (10 + 02)

बाळासाहेब थोरात : महसूल नितीन राऊत : उर्जा अशोक चव्हाण : सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून) के सी पाडवी : आदिवासी विकास विजय वडेट्टीवार : इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन अमित देशमुख : वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य सुनिल केदार : पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण यशोमती ठाकूर : महिला व बालविकास वर्षा गायकवाड : शालेय शिक्षण अस्लम शेख : वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास

काँग्रेस – राज्यमंत्री

सतेज पाटील : गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण

डॉ. विश्वजीत कदम :  सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा

Maharashtra cabinet ministers reactions after portfolio distribution

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...