AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे कल दुपारनंतर तर मध्यरात्री चित्र स्पष्ट होणार! काय आहे कारण?

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालाकडे उमेदवारांसह कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदार डोळे लावून बसला आहे. असं असलं तरी या निवडणुकीचे निकाल हाती येणास मध्यरात्र होण्याची शक्यता आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे कल दुपारनंतर तर मध्यरात्री चित्र स्पष्ट होणार! काय आहे कारण?
प्रत्येक मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे. अनेक मतदान केंद्रावर पांढऱ्या रंगात गोलाकार वर्तुळही काढण्यात आली. त्या वर्तुळातच मतदानकर्त्यांनी उभे राहावे असे सांगण्यात आले आहे.
sagar joshi
sagar joshi | Updated on: Dec 03, 2020 | 10:06 AM
Share

मुंबई: राज्यातील 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. उमेदवारांसह कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मतदार या निवडणुकीच्या निकालाकडे डोळे लावून बसला आहे. असं असलं तरी या निवडणुकीचे निकाल हाती येणास मध्यरात्र होण्याची शक्यता आहे. तर निकालाचा पहिला कल दुपारी 2 नंतर हाती येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.(Graduate, teacher constituency results will be delayed)

नागपूर पदवीधर मतदारसंघ

नागपूर पदवीधर मतदारसंघात एकूण 1 लाख 32 हजार 923 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. त्यानुसार नागपूर पदवीधर मतदारसंघात 64.38 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या मतदारसंघाच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली आहे. नागपूर विभागीय क्रीडा संकुलात 4 हॉलमध्ये एकूण 28 टेबलवर मतमोजणी सुरु करण्यात आली आहे. टेबलवर काऊंटिंग सुपरवायजर म्हणून एक उपविभागीय किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी देण्यात आला आहे.

कशी असेल मतमोजणी प्रक्रिया?

  • सुरुवातीला सर्व मतपत्रिका एका मोठ्या बॅाक्समध्ये टाकल्या जाणार
  • सर्व मतपत्रिका एकत्र मिसळणार
  • त्यानंतर २५-२५ मतपत्रिकांचे गठ्ठे तयार केले जाणार, यासाठी १२ फेऱ्या लागणार
  • दुपारी एक पर्यंत ही प्रक्रिया चालणार, त्यानंतर मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात
  • मतमोजणी करताना प्रत्येक टेबलावर एक हजार मतपत्रिका ठेवण्यात येणार
  • एकूण २८ टेबलवर ही मतमोजणी होणार
  • प्रत्येक फेरीत २८ हजार मतपत्रिकांची मोजणी
  • १ लाख ३२ हजार ९३२ मतं मोजायला पाच फेऱ्या लागतील
  • एकूण वैध मतास दोन ने भागून आलेल्या उत्तरात एका अंकांची भर घालून कोटा ठरवला जातो
  • निर्धारीत कोटा जो उमेदवार पहिल्या पसंतीने मतं घेऊन पूर्ण करेल तो विजयी
  • पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण झाला नाही तर दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीची प्रक्रिया सुरु होते

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली आहे. यात प्रत्यक्ष बॅलेट पेपर मोजण्यास सुरु झालीय. त्यासाठी एकूण 56 टेबल मांडण्यात आले आहेत.(Graduate, teacher constituency results will be delayed)

मतमोजणी प्रक्रिया :

  • सुरुवातीला पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होणार आहे.
  • पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कुणाचाच विजय झाला नाही तर दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जाणार आहेत.
  • दुसऱ्या पसंतीची मतं मोजावी लागली तर निकाल हाती येण्यास उद्याचा दिवस उजाडण्याची शक्यता आहे.
  • एकूण 290 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मतमोजणी करण्यात येत आहे. त्यात 2 लाख 40 हजार 649 बॅलेट पेपरची मोजणी होणार आहे.
  • मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पडली तर पहिला कल दुपारी 4 वाजता हाती येईल. तर रात्री 8 वाजेपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात होईल.
  • अंतिम निकाल हाती येण्यास रात्री उशीर होऊ शकतो

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा पहिला कल हाती येण्यास संध्याकाळचे 6 वाजण्याची शक्यता आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत वैध आणि अवैध मतं बाजूला करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यामुळे संध्याकाळी पहिला कल हाती येईल आणि मतदारसंघाचा निकाल हाती येण्यास 36 तास लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मतमोजणी प्रक्रिया:

  • सुरवातीला पाचही जिल्ह्यातील मत पत्रिका एकत्र केल्या जाणार
  • त्यानंतर वैध- अवैध मत वेगळी करणार
  • नंतर वैध मतांच्या मतपत्रिकेचे गठ्ठे केले जाणार
  • त्यानंतर पहिल्या पसंतीची मत मोजणी सुरु होणार
  • पहिल्या फेरीत जर पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण झाला नाही तर दुसऱ्या पसंतीच्या मतांवर निकाल अवलंबून

अमरावती शिक्षक मतदारसंघ

अमरावती शिक्षक मतदारसंघात 5 जिल्ह्यात एकूण 30 हजार 869 म्हणजे 86.73 टक्के मतदान झालं आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात मतपत्रिकांचे गठ्ठे बनवणं आणि त्यांची सरमिसळ केली जाणार आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघात दोन कक्षात 14 टेबलवर मतमोजणी होत आहे. 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिका एकत्रित करण्यात येत आहे. त्यानुसार प्रत्येक टेबलवर 40 गठ्ठे करण्यात येतील. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण होईल. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा पूर्ण झाला नाही तर आवश्यकतेनुसार दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या पसंतीची मतं मोजण्यात येणार आहे. त्यामुळे निकाल हाती येण्यास उशीर होऊ शकतो.

संबंधित बातम्या:

विधान परिषदेच्या 6 जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून सर्वस्व पणाला! कोणत्या मतदारसंघात कुणामध्ये मुख्य लढत?

विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक : कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण?

Graduate, teacher constituency results will be delayed

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ