AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Rathod press conference | 16 दिवसांनी माध्यमांसमोर, संजय राठोड यांचा शब्द अन् शब्द, जसाच्या तसा

पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूवरुन माझ्यावर जे आरोप झाले त्यात कोणतंही तथ्य नाही, असं संजय राठोड म्हणाले. | Sanjay Rathod

Sanjay Rathod press conference | 16 दिवसांनी माध्यमांसमोर, संजय राठोड यांचा शब्द अन् शब्द, जसाच्या तसा
संजय राठोड
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Feb 23, 2021 | 2:44 PM
Share

पोहरादेवी (वाशिम) :  “पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूवरुन माझ्यावर जे आरोप झाले त्यात कोणतंही तथ्य नाही. माझ्यावर नाहक आरोप केले गेले आहेत. पूजा चव्हाण ही आमच्या समाजातली आहे. तिच्या मृत्यूचं आम्हालाही दु:ख आहे.आम्ही पूजाच्या कुटुंबीयांसोबत आहोत. मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली आहे. चौकशीतून सगळं बाहेर येईल”, असं वनमंत्री संजय राठोड म्हणाले.  (Maharashtra Minister Sanjay Rathod Press Conference At Pohradevi over pooja Chavan Suicide)

तब्बल 15 दिवसांनंतर पूजा चव्हाण संजय राठोड माध्यमांसमोर आले. पोहरादेवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. यावेळी त्यांच्यावर झालेले सगळे प्रयत्न फेटाळताना माझं राजकीय करिअर उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी केला.

काय म्हणाले संजय राठोड…?

संजय राठोड म्हणाले, “पूजा चव्हाण हिचा पुण्यात मृत्यू झाला. तिच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी आणि माझा समाज सहभागी आहे. परंतु महाराष्ट्रात या सगळ्या प्रकरणावरुन घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न झाला ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे.”

“मी मागासवर्गीय कुटुंबातून, भटक्या विमुक्त कुटुंबातून ओबीसीचं नेतृत्व करणारा एक कार्यकर्ता आहे. गेल्या 30 वर्षांचं माझं राजकीय आणि सामाजिक काम उद्धवस्त करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून झालं, हे आपण सगळ्यांनी पाहिलं.”

“आपण सर्वजण प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे जे काही दाखवण्याचा प्रयत्न केला, मी आपल्याला खात्रीने सांगू शकतो यामध्ये कोणतंही तथ्य नाही. मी विश्वासाने सांगू शकतो माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावली आहे. चौकशीतून सत्य समोर येईल.”

“माझ्या कुटुंबाची, वैयक्तिक माझी, बदनामी करु नका. तपासातून सत्य बाहेर येईल, असं ते म्हणाले. तसंच एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका, अशी कळकळीची विनंतीच संजय राठोड यांनी हातजोडून केली.”

“गेल्या 15 दिवसांपासून विविध माध्यमांद्वारे जी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला गेला ती आता थांबवा कारण चौकशीतून सगळे काही समोर येईल, अशी कळकळीची विनंती त्यांनी हात जोडून केली.”

माझी, कुटुंबाची आणि समाजाची बदनामी थांबवा

या सगळ्या प्रकरणात माझी, माझ्या कुटुंबाची आणि समाजाची बदनामी झाली ती आता थांबवा. कारण मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या चौकशीतून सगळं काही समोर येईल, असं संजय राठोड म्हणाले.

(Maharashtra Minister Sanjay Rathod Press Conference At Pohradevi over pooja Chavan Suicide)

संबंधित बातम्या :

संजय राठोड म्हणतात, मी मागासवर्गीय, ओबीसी समाजाचा, घाणेरडं राजकारण केलं जातंय! 

एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका; संजय राठोड यांची हात जोडून विनंती

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...