AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC Election live | मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज दाखल, संपूर्ण ठाकरे कुटुंब विधानभवनात उपस्थित

विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी (MLC Election live) उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

MLC Election live | मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी अर्ज दाखल, संपूर्ण ठाकरे कुटुंब विधानभवनात उपस्थित
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: May 11, 2020 | 12:26 PM
Share

मुंबई : विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी (MLC Election live) उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: उमेदवार असल्याने या निवडणुकीकडे विशेष लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब येऊन विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित होते.

मतांचं गणित पाहून काँग्रेसने दुसऱ्या जागेचा हट्ट सोडल्याने आता महाविकास आघाडी पाच जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर भाजपने चार जागांवर दावा केला आहे. संख्याबळ पाहता महाविकास आघाडी पाच आणि भाजपच्या चार जागा निवडून येतील, त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. (MLC Election live)

दरम्यान, भाजपने आपल्या उमेदवारांचे अर्ज यापूर्वीच भरले आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे उमेदवार आज आपले अर्ज दाखल करत आहेत.  एकूण 9 जागांपैकी शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि काँग्रेस 1 तर भाजप 4 जागा लढवणार आहे.

MLC Election Live Update 

  • मुख्यमंत्री सहकुटुंब उपस्थित
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषदेचा अर्ज भरण्यासाठी विधानभवनात दाखल
  • महाविकास आघाडीचे नेते विधानभवनात दाखल
  • विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. सकाळपासूनच उमेदवार विधानभवनात येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल मिटकरी आणि शशिकांत शिंदे हे दाखल झाले आहेत.

भाजपचे उमेदवार

या निवडणुकीसाठी सर्वात आधी भाजपने आपले चार उमेदवार जाहीर केले.  भाजपने 4 जागांवर उमेदवारी लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी देऊन अर्ज भरले आहेत.

मुख्यमंत्री उमेदवार

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: या निवडणुकीतील उमेदवार आहेत. त्यामुळे ज्या निवडणुकीत मुख्यमंत्री उमेदवार असतात ती बिनविरोध करण्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात संकेत आहेत. मात्र आता काँग्रेसने वाढीव जागा मागितल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.

कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण?

उद्धव ठाकरे – शिवसेना निलम गोऱ्हे – शिवसेना

राजेश राठोड – काँग्रेस राजकिशोर मोदी – काँग्रेस (अर्ज मागे)

शशिकांत शिंदे – राष्ट्रवादी अमोल मिटकरी – राष्ट्रवादी

रणजितसिंह मोहिते पाटील – भाजप गोपीचंद पडळकर – भाजप प्रवीण दटके – भाजप डॉ. अजित गोपछेडे – भाजप

विधानपरिषदेच्या 9 जागांचा निवडणूक कार्यक्रम 

  • 4 मेपासून 11 मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार
  • 12 मे – उमेदवार अर्जांची छाननी
  • अर्जमाघारीसाठी 14 मे पर्यंतची मुदत
  • 9 जागांसाठी 21 मे रोजी मतदान
  • मतदानाच्या दिवशीच मतमोजणी
  • 26 मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण

(MLC Election live)

संबंधित बातम्या 

MLC Polls : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार, काँग्रेसने 6 व्या जागेचा आग्रह सोडला 

MLC Polls | राष्ट्रवादीच्या पुढे काँग्रेसचं पाऊल, दुसरा उमेदवारही जाहीर, विधानपरिषदेचं गणित बदलणार   

आधी विधानसभा, आता विधानपरिषदेला डावललं, मेधा कुलकर्णींच्या डोळ्यात दुसऱ्यांदा पाणी, दादांनी प्रॉमिस मोडल्याचा आरोप

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...