Maharashtra Floor Test: भाजपा कामाला लागले, सर्व आमदारांनो मुंबई गाठा, रात्रीपर्यंत प्रेसिडेंशियल हॉटेलवर मुक्काम

| Updated on: Jun 29, 2022 | 10:26 AM

सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आलायं. संपूर्ण भाजपा कामाला लागलीयं. इतकेच नाही तर सर्व आमदारांना मुंबई गाठण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

Maharashtra Floor Test: भाजपा कामाला लागले, सर्व आमदारांनो मुंबई गाठा, रात्रीपर्यंत प्रेसिडेंशियल हॉटेलवर मुक्काम
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तासंघर्ष सुरूयं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दिल्लीवरुन परतल्यानंतर थेट राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर गेले होते. आता सत्तास्थापनेसाठी हालचालींना वेग आलायं. संपूर्ण भाजपा कामाला लागलीयं. इतकेच नाही तर सर्व आमदारांना मुंबई गाठण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. भाजपाच्या सर्व आमदारांचा रात्रीचा मुक्काम प्रेसिडेंशियल हॉटेलवर (Hotel) असणार आहे. पुढील काही तासांमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जातंय.

भाजपच्या सर्व आमदारांना मुंबईमध्ये येण्याचे आदेश

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत आपल्यासोबत 51 आमदारांना घेतले आहे. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार सध्या आसाममधील हाॅटेलवर आहेत. मात्र, उद्या एकनाथ शिंदे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. एकनाथ शिंदे गट भाजपासोबत सत्तास्थापन करणार हे स्पष्टच आहे. आता सत्तास्थापन करण्यासाठी संपूर्ण भाजपा कामाला लागलीयं. राज्यातील सर्व आमदारांना मुंबईमध्ये दाखल होण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले.

हे सुद्धा वाचा
महाराष्ट्र राज्य विधानसभासत्तेचं गणित
विधानसभेचे एकूण सदस्य288
दिवंगत सदस्य01
कारगृहात सदस्य02
सध्याची सदस्य संख्या285
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार39
आता सभागृहाची सदस्य संख्या285
बहुमताचा आकडा143
भाजपचं संख्याबळभाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172
मविआचं संख्याबळशिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ?भाजप (106)+ अपक्ष (27) = 133

भाजपाची संपूर्ण यंत्रणाच कामाला

शिवसेनेने एकनाथ शिंदे गटासोबत गेलेल्या 16 आमदारांवर अपत्रातेची कारवाई सुरु केली आहे. मात्र दोन अपक्ष आमदारांनी ही कारवाई करणाऱ्या विधानसभा उपाध्यांविरोधातच अविश्वास ठराव दाखल केला आहे. यासंबंधीची याचिका कोर्टात प्रलंबित आहे. आमदार अपात्र ठरल्यास शिंदेगटाचे संख्याबळ कमी होऊ शकते. 16 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा कोर्टात आहे. जोपर्यंत या आमदारांबाबतचा निर्णय होत नाही. तोपर्यंत अधिवेशन घेता येत नाही, असे संजय राऊत यांना म्हटंले आहे.