Sanjay Raut: हा तर बालिशपणा, एकनाथ शिंदे अन् बंडखोर गटाच्या टीकेवर संजय राऊतांचं उत्तर, ‘ते काय आहेत मला माहित…’

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटावर टीकास्त्र सोडलंय. यावेळी त्यांनी  म्हटंल की,  मी बोलतो आणि आदित्य ठाकरे बोलतात म्हणून आम्ही येणार नाही, हा केवळ बालिशपणा आहे, असं संजय राऊत म्हणले आहेत.

Sanjay Raut: हा तर बालिशपणा, एकनाथ शिंदे अन् बंडखोर गटाच्या टीकेवर संजय राऊतांचं उत्तर, 'ते काय आहेत मला माहित...'
संजय राऊत भडकलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 10:24 AM

मुंबई :  महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरू असून राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde) आणि शिवसेना यांच्यात सुरू असलेल्या वादात आता भाजपच्याही (BJP) हलचाली सुरू आहेत. भाजपने राज्यपालांकडे महाविकास आघाडी सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली आहे. यामुळे राज्यपालांनी देखील मुख्यमंत्र्यांना उद्याच बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मविआ अडचणीत आलंय. यात शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे गटावर टीकास्त्र सोडलंय. यावेळी त्यांनी  म्हटंल की,  मी बोलतो आणि आदित्य ठाकरे बोलतात म्हणून आम्ही येणार नाही, हा केवळ बालिशपणा आहे, असं संजय राऊत म्हणले आहेत. तर पुन्हा एकदा बंडखोरांना मुंबईत येण्याची मागणी केलीय.

‘…हा बालिशपणा’

शिवसेना नेते संजय राऊत बंडखोरांवर बोलताना म्हणाले की, ‘मी बोलतो आदित्य ठाकरे बोलतात म्हणून आम्ही येणार नाही, हा केवळ बालिशपणा आहे. सध्या जी परिस्थिती त्यावर मार्गदर्शन करणं हे आमचं काम आहे. त्यात तुमच्या छातीत कळ येण्याची गरज नाही. कोणत्या कारणांनी तुम्ही पळताय सगळं खोटं आहे. तुम्ही मुंबई या मग बघू,’ असंही राऊत यावेळी म्हणालेत.

मविआ कोर्टात जाणार?

39 आमदारांनी बंडखोरी केल्यानं शिवसेनेचं संख्याबळी कमी झालं असून त्यापैकी 16 आमदारांवर पक्षानं अपात्रतेची कारवाई सुरु केली आहे. यासंदर्भातील खटला सुप्रीम कोर्टात सुरु आहे. आमदार अपात्रतेसंबंधी याचिकेचा निर्णय लागेपर्यंत बहुमत चाचणी अर्थात फ्लोअर टेस्ट घेऊ नये, अशी मागणी मविआतर्फे करण्यात आली होती. मात्र कोर्टानं ती अमान्य करत, बहुमत चाचणीत काही पेचप्रचंग उद्भवल्यास तुम्ही कोर्टात दाद मागू शकता, असंही सांगण्यात येतंय.

हे सुद्धा वाचा

राज्यपालांकडून पत्रं

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. उद्या 30 जून रोजीच बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे.

फ्लोअर टेस्टला

एकनाथ शिंदे यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही उद्या फ्लोअर टेस्टला सामोरे जाणार आहोत. मुंबईत येणार आहोत. आमच्याकडे बहुमत आहे. त्यांच्याकडे बहुमत आकडा नाहीये, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

1 जुलै रोजीच नवं सरकार?

दरम्यान, 30 जून रोजी फ्लोअर टेस्ट झाल्यानंतर 1 जुलै रोजीच नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. त्यासाठीच्या हालचाली भाजपकडून सुरू केल्या असल्याचं सांगितलं जात आहे.

महाराष्ट्र राज्य विधानसभासत्तेचं गणित
विधानसभेचे एकूण सदस्य288
दिवंगत सदस्य01
कारगृहात सदस्य02
सध्याची सदस्य संख्या285
एकनाथ शिंदे गटाकडे किती आमदार39
आता सभागृहाची सदस्य संख्या285
बहुमताचा आकडा143
भाजपचं संख्याबळभाजप (106)+शिंदे गट (39)+अपक्ष (27)=172
मविआचं संख्याबळशिवसेना (16)+ राष्ट्रवादी (51)+ काँग्रेस (44)= 111
शिंदे गट भाजपसोबत न गेल्यास भाजपकडे किती संख्याबळ?भाजप (106)+ अपक्ष (27) = 133
Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.