AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Politics : मोठी बातमी! राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्या सकाळी 11 वा. बहुमत चाचणी

Maharashtra Political News : बहुमत सिद्ध करा, या आशयाचं हे पत्र आहे.  काल रात्रीच हे पत्र पाठवण्यात आलं आहे. राज्यपालांनी हे पत्र पाठवल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागेल.

Maharashtra Politics : मोठी बातमी! राज्यपालांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, उद्या सकाळी 11 वा. बहुमत चाचणी
| Edited By: | Updated on: Jun 29, 2022 | 9:13 AM
Share

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे. बहुमत सिद्ध करा, या आशयाचं हे पत्र आहे.  काल रात्रीच हे पत्र पाठवण्यात आलं होतं. राज्यपालांनी हे पत्र पाठवल्यानंतर आता महाविकास आघाडी (Maharashtra Politics News Today) सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागेल. बहुमत सिद्ध करण्याच्या उद्देशानं हे पत्र पाठवण्यत आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लवकर आता विशेष अधिवेशन लावलं जाण्याची शक्यता आहे. 39 आमदारांनी पाठिंबा काढल्यानं सरकार अल्पमतात आल्याची माहिती राज्यपालांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली होती. मात्र आता सरकारला बहुमत चाचणीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. नेमकी ही बहुमत चाचणी कधी होणार, हे देखील स्पष्ट करण्यात आलंय. उद्या (30 जून) ही बहुमत चाचणी पार पडेल.

शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी 21 जूनला बंडखोरी केली होती. त्यानंतर त्यांना शिवसेनेतल्या आमदारांचा पाठिंबा वाढत गेला. गुवाहाटीतमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे गटाकडे एकूण 39 आमदारांचा पाठिंबा आहे. या आमदारांनी उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत सरकार करण्यासाठी हाक दिली होती. तर महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची आग्रही मागणी केली होती. आज या बंडाचा नववा दिवस आहे. या बंडाच्या आठव्या दिवशी म्हणजेच काल, देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांनी रात्री उशिरा भेट घेतली होती. सरकार अल्पमतात असल्याची माहिती त्यांनी राज्यपाल यांनी प्रत्यक्ष भेटून दिली होती. त्यामुळे राज्यपालांनी याबाबत योग्य तो निर्णय़ घ्यावा आणि सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

उद्या एकनाथ शिंदे मुंबईत जाणार

दरम्यान, गुवाहाटी येथे बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्या मुंबईला पोहोचणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे. त्यामुळे आता उद्याच बहुमत चाचणीला महाविकास आघाडी सरकराला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी विशेष अधिवेशन बोललं जाईल आणि त्यानंतर आता उद्याच बहुमत चाचणी होणार असल्याचं स्पष्ट झालंय. गुवाहाटीच कामाक्षी देवीच्या मंदिरासाठी गेले असता ते माध्यमांशी बोलत होते.

राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रात काय?

  1. उद्या 11 वाजता विशेष अधिवेशन बोलवावं आणि त्यानंतर अधिवेशनाची कारवाई 5 वाजेपर्यंत पूर्ण केलं जावं
  2. अधिवेशनाच्या बहुमत चाचणीचं थेट प्रक्षेपण केलं जावं
  3. अधिवेशनावेळी जीवाला धोका असलेल्या सर्व बंडखोर आमदारांना सुरक्षा पुरवली जावी

महाविकास आघाडी कोर्टात जाणार?

दरम्यान, आता कोर्टात काही गोष्टी असताना, विशेष अधिवेशन बोलवण्यात आलंय. त्यामुळे महाविकास आघाडी आता सुप्रीम कोर्टात याप्रकरणी दाद मागण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव असल्यानं नेमकं काय घडतं, हे पाहणं महत्त्वाचंय.

वाचा महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींची लाईव्ह अपडेट्स : इथे क्लिक करा. Eknath Shinde News, Maharashtra Politics LIVE

 आमदाराचं नावमतदारसंघ
1एकनाथ शिंदेकोपरी-पाचपाखाडी
2भरत गोगावलेमहाड
3उदय सामंतरत्नागिरी
4संदीपान भुमरेपैठण
5गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण
6दादा भुसेमालेगाव बाह्य
7अब्दुल सत्तारसिल्लोड
8दीपक केसरकरसावंतवाडी
9शहाजी पाटीलसांगोला
10शंभुराज देसाईपाटण
11अनिल बाबरखानापूर
12तानाजी सावंतपरांडा
13चिमणराव पाटीलएरंडोल
14प्रकाश सुर्वेमागाठाणे
15विश्वनाथ भोईर कल्याण पश्चिम
16संजय गायकवाडबुलडाणा
17प्रताप सरनाईकमाजीवडा
18महेंद्र दळवीअलिबाग
19महेंद्र थोरवे कर्जत
20प्रदीप जयस्वाल औरंगाबाद मध्य
21ज्ञानराज चौगुलेउमरगा
22श्रीनिवास वनगापालघर
23संजय रायमूलकरमेहेकर
24बालाजी कल्याणकरनांदेड उत्तर
25शांताराम मोरेभिवंडी ग्रामीण
26संजय शिरसाटऔरंगाबाद पश्चिम
27प्रकाश आबिटकरराधानगरी
28योगेश कदमदापोली
29सदा सरवणकरमाहिम
30मंगेश कुडाळकरकुर्ला
31यामिनी जाधव भायखळा
32लता सोनावणेचोपडा
33किशोरी पाटीलपाचोरा
34रमेश बोरनारे वैजापूर
35सुहास कांदे नांदगाव
36बालाजी किणीकरअंबरनाथ
37दिलीप लांडेचांदिवली
38आशिष जयस्वालरामटेक
39महेश शिंदेकोरेगाव
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.