AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

USA vs NED : यूएसएचा ऐतिहासिक विजय, नेदरलँड्सचा 93 धावांनी धुव्वा, मुंबईकर हरमीत सिंह चमकला

United States of America vs Netherlands Match Result : मोनांक पटेल याच्या नेतृत्वात यूएसएने अखेर विजयाचं खातं उघडलं आहे. यूएसएने स्पर्धेत सलग 2 सामने गमावल्यानंतर अटीतटीच्या सामन्यात हा विजय मिळवला आहे.

USA vs NED : यूएसएचा ऐतिहासिक विजय, नेदरलँड्सचा 93 धावांनी धुव्वा, मुंबईकर हरमीत सिंह चमकला
Harmeet Singh and Monank Patel USAImage Credit source: USA Cricket X Account
| Updated on: Feb 13, 2026 | 10:44 PM
Share

यूएसए अर्थात यूनायटेड स्टेट्‍स ऑफ अमेरिका संघाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत ऐतिहासिक असा विजय मिळवला आहे. यूएसएने स्पर्धेतील 21 व्या सामन्यात नेदरलँड्सवर 93 धावांच्या मोठ्या फरकाने विजय साकारलाय. यूएसएने नेदरलँड्ससमोर 197 धावांच आव्हान ठेवलं होतं. मात्र यूएसएच्या गोलंदाजांसमोर नेदरलँड्सला पूर्ण 20 ओव्हरही लढत देता आली नाही. यूएसएने नेदरलँड्सला 15.5 ओव्हरमध्ये 103 रन्सवर गुंडाळलं. यूएसएने यासह नेदरलँड्सला सलग दुसरा विजय मिळवण्यापासून यशस्वीरित्या रोखलं. तसेच यूएसए वर्ल्ड कप स्पर्धेतील 10 व्या पर्वात सलग 2 पराभवानंतर विजयाचं खातं उघडण्यात यशस्वी ठरली. तसेच यूएसएचा हा टी 20i क्रिकेटमधील नेदरलँड्स विरुद्धचा 4 सामन्यांनंतरचा पहिला विजय ठरला. सोबतच यूएसने या विजयासह स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं आहे.

यूएसएची कडक बॅटिंग

न्यूझीलंडने टॉस जिंकून यूएसएला बॅटिंगसाठी भाग पाडलं. यूएसएने या संधीचा दोन्ही हातांनी फायदा घेतला. कॅप्टन मोनांक पटेल आणि शायान जहांगीर या दोघांनी यूएसएला आश्वासक सुरुवात करुन दिली. त्यानंतर साईतेजा मुक्कामल्ला याने धमाका केला. तर मुंबईकर शुभम रांजने याने फिनिशिंग टच दिला. त्यामुळे यूएसएला 190 पार मजल मारता आली.

मोनांक पटेल याने 22 बॉलमध्ये 36 रन्स केल्या. शायानने 20 धावांचं योगदान दिलं. साईतेजा याने नेदरलँड्सच्या गोलंदाजांना झोडून काढला. साईतेजाने यूएसएसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. साईने 51 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 5 फोरसह 79 रन्स केल्या. तर शुभम रांजने अखेरीस नाबाद परतला. शुभमने 200 च्या स्ट्राईक रेटने 48 रन्स केल्या. शुभमने 2 सिक्स आणि 3 फोर लगावले. तर नेदरलँड्ससाठी बास डी लिडे याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या.

नेदरलँड्सचं 103 रन्सवर पॅकअप

यूएसएच्या गोलंदाजांसमोर 197 धावांचा पाठलाग करायला आलेल्या नेदरलँड्सच्या 4 फलंदाजांनाच दुहेरी आकड्यापर्यंत पोहचता आलं. नेदरलँड्साठी बास डी लिडे याने सर्वाधिक 23 धावा केल्या. स्कॉट एडवर्ड्स याने 20 धावांचं योगदान दिलं. या दोघांव्यरिक्त एकालाही 20 या आकड्यापर्यंत पोहचता आलं नाही.

यूएसएचा दणदणीत विजय

नेदरलँड्सला गुंडाळण्यात मुंबईकर फिरकीपटू हरमीत सिंग याने प्रमुख योगदान दिलं. हरमीतने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. शॅडली व्हॅन शाल्कविक याने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मोहम्मद मोहसिन याने 2 विकेट्स मिळवल्या. तर नोस्थुश केंजीगे याने 1 विकेट मिळवत इतरांना चांगली साथ दिली. यूएसएने अशाप्रकारे विजय मिळवला.

Follow Us
थोड्याच वेळात शिवसेना चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील सरोदेंचं वक्तव्य
अध्यक्षांनी साक्ष, पुरावे, प्रश्नोत्तरे सगळंच... थोड्याच वेळात शिवसेना पक्ष चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील असीम सरोदेंचं विधान चर्चेत
संजय राऊतांकडुन तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी...
संजय राऊतांकडुन तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी नेमकं काय घडलं?
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या नेत्याचं मोठं विधान
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमा
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमाईंडर नोटीस, आता...
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर?
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..