SC Hearing on Maharashtra Floor Test LIVE : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा राज्यपालांकडे राजीनामा; मुख्यमंत्री पदावरून पायउतार

Eknath Shinde VS Shiva Sena LIVE Maharashtra Governor, MVA Government Updates : ठाकरे सरकारची उद्या अग्निपरिक्षा, बहुमत चाचणी उद्या होणार, राज्यपालांचे आदेश, घडामोडींना वेग, भाजपच्या गोटात हालचाली

SC Hearing on Maharashtra Floor Test LIVE : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा राज्यपालांकडे राजीनामा; मुख्यमंत्री पदावरून पायउतार
Eknath Shinde News, Maharashtra Politics LIVE
Image Credit source: tv9 marathi

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jun 30, 2022 | 6:40 AM

Eknath Shinde News, Maharashtra Politics LIVE : आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाराष्ट्राचं राजकीय (Maharashtra Political Crisis) वातावरण ढवळून निघालं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडाचा आजचा आठवा दिवस आहे.  21 जून रोजी रातोरात आमदार सूरतला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते गुवाहाटीला रातोरात दाखल झाले. तेव्हा पासून गुवाहाटीच्या रिडेसन ब्लू हॉटेलात या आमदारांचा मुक्काम आहे. महाविकास आघाडी सरकारमधून (MVS vs BJP) बाहेर पडा, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्त्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी बंड केल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. सुरुवातील एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या आमदारांच्या समर्थनाची संख्या पुढे पुढे वाढत गेली. आपल्याकडे 50 आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यापैकी 38 शिवसेना आमदार हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत. तर यात 9 अपक्ष आमदारही आहेत.

एकनाथ शिंदे गटामध्ये यांच्यासोबत कोण आमदार आहेत? जाणून घ्या

शिवसेनेचे कोण कोण आमदार सोबत?

 • एकनाथ शिंदे
 • शहाजी पाटील
 • अब्दुल सत्तार
 • शंभुराज देसाई
 • अनिल बाबर
 • तानाजी सावंत
 • संदीपान भुमरे
 • चिमणराव पाटील
 • प्रकाश सुर्वे
 • भरत गोगावले
 • विश्वनाथ भोईर
 • संजय गायकवाड
 • प्रताप सरनाईक
 • राजकुमार पटेल
 • राजेंद्र पाटील
 • महेंद्र दळवी
 • महेंद्र थोरवे
 • प्रदीप जयस्वाल
 • ज्ञानराज चौगुले
 • श्रीनिवास वनगा
 • महेश शिंदे
 • संजय रायमूलकर
 • बालाजी कल्याणकर
 • शांताराम मोरे
 • संजय शिरसाट
 • गुलाबराव पाटील
 • प्रकाश आबिटकर
 • योगेश कदम
 • आशिष जयस्वाल
 • सदा सरवणकर
 • मंगेश कुडाळकर
 • दीपक केसरकर
 • यामिनी जाधव
 • लता सोनावणे
 • किशोरी पाटील
 • रमेश बोरणारे
 • सुहासे कांदे
 • बालाजी किणीकर
 • उदय सामंत

अपक्ष कोण कोण शिंदेंसोबत?

 • बच्चू कडू
 • राजकुमार पटेल
 • राजेंद्र यड्रावकर
 • चंद्रकांत पाटील
 • नरेंद्र भोंडेकर
 • किशोर जोरगेवार
 • मंजुळा गावित
 • विनोद अग्रवाल
 • गीता जैन
 1. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या एकूण जागा : 288
 2. सत्ता स्थापनेसाठी किती जागांची गरज : 145
 3. एकनाथ शिंदेंकडे सध्या किती आमदार : 48
 4. भाजपचं संख्याबळ किती : 106
 5. शिवसेनेचं 2019मध्ये निवडून आलेले आमदार किती : 56
 6. शिवसेनेचे आता फुटलेले आमदार किती : 39
 7. शिवसेनेचे आमदार फुटल्यामुळे शिवसेनेकचे आता किती आमदार : 15
 8. काँग्रेसकडे किती आमदार? : 44
 9. राष्ट्रवादीकडे किती आमदार? : 55 (मलिक देशमुख तुरुंगात असल्यामुळे सध्या 53)
 10. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना असलेलं संख्याबळ : 169
 11. शिवसेना आमदार फुटल्यामुळे महाविकास आघाडीचं संख्याबळ किती झालं? : 121

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 30 Jun 2022 12:26 AM (IST)

  महाराष्ट्राची जनता याचा बदला घेईल; शिवसेनेचे नेते भास्कर जाधव

  सत्ता हे जनसेवेचे साधन असल्याची भावना

  ज्या पद्धतीने राजीनामा दिला, म्हणून भाजप पेढे वाटतात, याचा बदला महाराष्ट्रातील जनता बदला घेणार

  मुख्यमंत्र्यांकडू अनेक चांगले निर्णय

 • 30 Jun 2022 12:10 AM (IST)

  शिवसेना नेमकी कोणाची, त्यांच्याबद्दल संघर्ष करण्याचा विचार नाही; सुधीर मुनगंटीवार

  बहुमत गमवल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा लागला

  उद्धव ठाकरे यांच्याविषयी नेहमीच सकारात्मक संबंध राहीर

  शिवसेना नेमकी कोणाची, त्यांच्याबद्दल संघर्ष करण्याचा विचार नाही

  आताच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय घेणार

 • 30 Jun 2022 12:05 AM (IST)

  राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला

  राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांचा राजीनामा स्वीकारला

  राजभवन येथे भेट घेऊन मुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांचेकडे सुपूर्द केला.

  पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पदाचा कार्यभार सांभाळण्यास सांगितले आहे.

 • 29 Jun 2022 11:59 PM (IST)

  उद्धव ठाकरे यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री पदाची जबाबदारी; नीलम गोऱ्हे

  उद्धव ठाकरे यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्री पदाची जबाबदारी;

  नवे मुख्यमंत्री येईपर्यंत असणार जबाबदारी

 • 29 Jun 2022 11:54 PM (IST)

  शिवसैनिकांच्या जोरदार घोषणाबाजी; उद्धव ठाकरे मातोश्रीकडे रवाना

  शिवसैनिकांच्या जोरदार घोषणाबाजी

  उद्धव ठाकरे मातोश्रीकडे रवाना

  बंडखोर आमदारांवर कार्यर्त्यांची टीका

  बंडखोर आमदार घाबरलेः शिवसैनिकांची टीका

 • 29 Jun 2022 11:50 PM (IST)

  उद्धव ठाकरे राजीनामा देऊन मातोश्रीकडे रवाना; राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द

  उद्धव ठाकरे राजीनामा देऊन मातोश्रीकडे रवाना

  माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया नाही

  सोबत आदित्य ठाकेर

  शिवसैनिकांचा ताफाही परतला

  शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी

 • 29 Jun 2022 11:41 PM (IST)

  उद्धव ठाकरेंनी राजीनामा राज्यपालांकडे सोपविला; मुख्यमंत्री पदावरून पायउतार

  उद्धव ठाकरेंनी राजीनामा राज्यपालांकडे सोपविला

  मुख्यमंत्री पदावरून पायउतार

  यापुढे शिवसैनिकांकडे लक्ष देणार

  बाळासाहेबांची शिवसेना पुढे घेऊन जाणार

  मुख्यमंत्री पद सांभाळताना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे आभार

 • 29 Jun 2022 11:40 PM (IST)

  अडीच वर्षानंतर स्थापन होणारे सरकार 25 र्षे टिकेल; देवेंद्र फडणवीस

  भाजप आमदारांनी मुंबई सोडू नये

  अडीच वर्षानंतर स्थापन होणारे सरकार  25 र्षे टिकेल

  आधी शपथ विधी करू त्यानंतर जल्लोष करू

 • 29 Jun 2022 11:36 PM (IST)

  या सगळ्या परिस्थितीली संजय राऊत जबाबदार: शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर

  आम्ही दुःख व्यक्त केले

  आमच्या नेत्याला आमच्यापासून लांब घेऊन गेले

  50 आमदारांचा विचार उद्धव ठाकरे यांना सांगितला होता.

  या सगळ्या परिस्थितीली संजय राऊत जबाबदार

  संजय राऊत 50 टक्के  शिवसेनेचे 50 टक्के राष्ट्रवादीचे

 • 29 Jun 2022 11:31 PM (IST)

  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून जाणे आमच्यासाठी दुःखद घटनाः दीपक केसरकर

  मोठ्या नेत्यांमुळे बंडखोर आमदारांमध्ये कटूता

  संजय राऊत यांचे नाव घेऊन टीका

  पक्षप्रमुख म्हणून संपर्क कमी होत गेला

  आमच्यासाठी हा दुःखद प्रसंग

  एकनाथ शिंदे सगळ्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेतील

 • 29 Jun 2022 11:26 PM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात राजभवनवर; विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देणार

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात राजभवनवर

  कडेकोट पोलीस बंदोबस्त.

  विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा

 • 29 Jun 2022 11:04 PM (IST)

  उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचं शरद पवारांना आश्चर्य - जयंत पाटील

  उद्धव ठाकरे आज राजीनामा देणारं आहेत याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती नव्हतं. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन घोषणा केली त्यावेळीं आपल्याला आणि शरद पवार यांना माहिती मिळाली. शरद पवार यांना याच आश्चर्य वाटलं, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

 • 29 Jun 2022 10:47 PM (IST)

  बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात कोट्यवधी निधी दिला, शिंदेंच्या खात्याला १२ हजार कोटी दिले-जयंत पाटील

  राज्याच्या राजकारणात मविआचा अद्भुत प्रयोग आमचे नेते शरद पवार यांनी केला. तिन्ही पक्ष शरद पवारांनी एकत्र केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापासून अनेक योजना, सेवा देण्याचा प्रयत्न सरकारने केला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत पायउतार करण्याचा निर्णय घेतला आहे. एक सरळ, लोकांच्या कटिबद्धतेसाठी काम करणारा मुख्यमंत्री राज्याला मिळाला होता. राज्यात गेले अडीच वर्षे उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याची भूमिका शरद पवारांनी स्वीकारली. शाहू, फुले आंबेडकरांचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. हे सरकार खूप चांगले चालले. शिवसेनेचे काही आमदार दुर्देवाने दुरावे, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पायउतार होण्याचं निर्णय घेतला. कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी खूप चांगले काम केले. प्रशासनानेही केले. देशासमोर एक नवा आदर्श ठेवला. राज्याला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हे दीर्घकाळ स्मरणात राहतील. पुढे एकत्र राहणार की नाही, हे आगामी काळात बसून ठरवू. जे आमदार अजित पवार आणि राष्ट्रवादीने मदत दिली नाही म्हणतात, त्यांच्या मतदारसंघात किती निधी वाटप केले याची यादीच जयंत पाटील यांनी वाचून दाखवली आहे. एकनाथ शिंदे यांच्या खात्याला १२ हजार कोटींना निधी दिला होता. हेही जयंत पाटील यांनी सांगितले.

 • 29 Jun 2022 10:36 PM (IST)

  मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया

 • 29 Jun 2022 10:26 PM (IST)

  फडणवीस-शिंदे यांच्या नव्या सरकारचा शपथविधी 1 जुलैला, सूत्रांची माहिती

  उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवं सरकारचा 1 जुलैला शपथविधी होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. उद्या भाजपा सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते १ जुलैला होण्याची शक्यता आहे. उद्या हंगामी अध्यक्षांची निवड होणार असल्याची शक्यता आहे.

 • 29 Jun 2022 10:09 PM (IST)

  उद्धव ठाकरे राजीनामा पत्र देण्यासाठी राजभवनाकडे रवाना

  मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे थोड्याच वेळात राजीनामा पत्र देण्यासाठी राजभवनाकडे निघाले आहेत. राज्यपालांना भेटून राजीनाम्याचे पत्र देणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यांच्या विधान परिषद आमदारकीचाही राजीनामा देणार आहेत.

 • 29 Jun 2022 10:05 PM (IST)

  संभाजीनगर नामांतरणाचे श्रेय एकनाथ शिंदेचे-नितेश राणे

  सगळ्याच गोष्टींचा निकाल लागलेला आहे. गेले अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारने बदल्याचं राजकारण केलं. आता नव्या सरकारकडून अपेक्षा आहे आणि त्या पूर्म होतील असा विश्वास आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे संभाजीनगर नामांतरण झाले. त्याचे श्रेय एकनाथ शिंदे आहे. अशी प्रतिक्रया नितेश राणे यांनी दिली आहे.

 • 29 Jun 2022 09:52 PM (IST)

  बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंनी संपवली-विखे पाटील

  शिवसेनाप्रमुखांची शिवसेना उद्धव ठाकरे यांनी संपवली अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या काळात राज्यात चांगले सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. औरंगाबादच्या नामकरणाचा निर्णय हा सत्ता जाताना घेतला अशी टीकाही त्यांनी केली आहे.

 • 29 Jun 2022 09:51 PM (IST)

  भाजपाचा जल्लोष , फडणवीसांना भरवले पेढे

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपाच्या गोटात जल्लोष पसरलेला आहे. देवेंद्र फडणवीसांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पेढे भरवलेले आहेत. भाजपा कार्यकर्ते जल्लोष साजरा करीत आहेत. फडणवीस यांचा शपथविधी एक दोन दिवसांत होईल, तो अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवा होता, अशी प्रतिक्रिया गणेश नाीक यांनी दिली आहे.

 • 29 Jun 2022 09:47 PM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा, विधान परिषदेचाही दिला राजीनामा

  आजपर्यंत तुम्ही मला भरभरुन प्रेम दिलेत. मी जे सांगत होतो ते तुम्ही ऐकलंत. देशात कुठे दंगली झाल्या नाहीत. सीएए एनआरसीवेळी देशात दंगे पेटले होते, त्यावेळी इथे काही झाले नाही. राज्यातील मुस्लीम बांधवांचे आभार मानतो. आलोही अनपेक्षितपणे, जातोयही अनपेक्षितपणे. आता पुन्हा शिवसेना भवनात बसणार आहे. पुन्हा तरुण तरुणींशी भेटतो आहे. शिवसेना हिरावून घेऊ शकत नाहीत.

 • 29 Jun 2022 09:44 PM (IST)

  मुख्यमंत्रीपदाचा त्याग करीत आहे-उद्धव ठाकरेंचा जनसंवाद

  उद्या या बंडखोरांना राज्यात येऊ द्या. राज्यात उद्या सत्तेचा नवा पाळणा हलतो आहे. चीन सीमेवरील सुरक्षा काढून मुंबईत का आणता. विधानभवनात कुणाकडे किती आमदार आहेत, हे तिथे ठरेल ना. शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन खाली खेचण्याचं पुण्य जर यांना मिळत असेल तर त्यांना मिळू दे. मुख्यमंत्री हे पापाचं फळ  असेल तर ते मी भोगतो. सगळ्यांसमोर मुख्यमंत्रीपदाचा त्याग करीत आहे.

 • 29 Jun 2022 09:41 PM (IST)

  माझ्यासमोर येऊन बोला, बंडखोरांना पुन्हा आवाहन - उद्धव ठाकरेंचा जनसंवाद

  विश्वासमत चाचणी करण्याचा आदेश राज्यपालांनी दिल्यानंतर आता सुप्रीम कोर्टानेही हा निर्णय दिला आहे. विरोधी पक्षांनी पत्र दिल्यानंतर तातडीने राज्यपालांनी हा निर्णय घेतला, त्याबद्दल त्यांचे आभार. पण हीच तत्परता जर राज्यपालांनी १२ आमदारांबाबत दाखवली असती, अजूनही केलीत, तर तुमच्याबद्दल आदर वाढेल. जे दगा देणार म्हणत होते, त्यांनी दगा दिला नाही. त्यांनी पाठिंबा दिला. ज्यांची नाराजी आहे, त्यांची नाराजी का आहे, हे मला समोर येऊन का सांगितले नाही. तुमच्या भावनांचा मी आदर करतो, पण तुम्ही माझ्यासमोर येऊन बोला. आवाहन करुनही आमदार समोर आले नाहीत. मुंबईत आता बंदोबस्त वाढवतायेत. अनेकांना स्थानबद्ध करतायेत. चीन सीमेसारखी परिस्थिती इथे निर्माण झाली आहे.

 • 29 Jun 2022 09:37 PM (IST)

  ज्यांना ज्यांना द्यायचं होतं ते सगळं दिलं, ते नाराज- उद्धव ठाकरेंचा जनसंवाद

  मी मनापासून बोलत आहे. सामान्य माणसांना शिवसेनाप्रमुखांनी आमदार-खासदार केलं. ही माणसं मोठी झाल्यानंतर तेच आपल्याला विसरायला लागले. ज्यांना ज्यांना द्यायचं होतं ते सगळं दिलं, ते नाराज . रिक्षावाले, पानपट्टीवाल्यांना नगरसेवक, मंत्रीपद दिलं. ज्यांना काही दिलं नाही ते आता सोबत आहेत.

 • 29 Jun 2022 09:33 PM (IST)

  औरंगाबादचं संभाजीनगर नामकरण केलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनसंवाद

  मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जनसंवादाला सुरुवात झालेली आहे.  आपल्याशी संवाद साधून मी अश्वस्त केलं होतं, जे आपण चालू ठेवलं होतं, ते चालूच राहील. आत्तापर्यंतच वाटचाल चांगली झाली. सरकारला कर्जमुक्त केलं. या सगळ्या धबडग्यात काही गोष्टी मागे पडतात. आज जगणं सार्थी झाल्यासारखं वाटलं. औरंगाबादचं संभाजीनगर झालं आणि उस्मानाबादचं धाराशीव झालं. काँग्रेस-राष्ट्रवादीने याला विरोध केला नाही. हा निर्णय होताना शिवसेनेचे चारच मंत्री उपस्थित होते, बाकी कुठे होते ते तुम्ही जाणताच.

 • 29 Jun 2022 09:29 PM (IST)

  अनिल परब राजभवनाकडे रवाना

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनसंवाद साधत असतानाच, त्यांचे विश्वासू आमदार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब हे राजभवनाकडे रवाना झाले आहेत. अनिल परब कोणता महत्त्वाचा निर्णय किंवा लिफाफा राज्यपालांकडे देतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

 • 29 Jun 2022 09:27 PM (IST)

  मुख्यमंत्र्यांचा काही क्षणात जनसंवाद

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही क्षणात जनसंवाद साधणार आहे. सुप्रीम कोर्टाने विश्वासत चाचणी होणारच, या दिलेल्या निर्णयानंतर आता उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत, ते राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येते ाहे.

 • 29 Jun 2022 09:26 PM (IST)

  11 जुलैला सदस्यत्वांच्या अपात्रतेच्या निर्णयाबाबत काय, हे अस्पष्टच-उज्ज्वल निकम

  उद्याच्या विधानसभेत विश्वासदर्शक ठरावात पहिल्यांदाच व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे. तसेच प्रत्येक विधानसभेतील सदस्याला जागेवर उभे राहून मतदान करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले आहेत.  हे असे पहिल्यांदाच घडते आहे. तसेच 11 जुलैला सदस्यत्वांच्या अपात्रतेच्या निर्णयाबाबत काय निर्णय होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता पुढे काय होईल, असे पाहावे लागेल. असे ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका करण्याची शक्यता सध्या कमी असल्याचे निकम यांनी सांगितले.

 • 29 Jun 2022 09:22 PM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता

  मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची शक्यता आहे. बहुमत चाचणीच्या आधी राजीनामा देण्याची शक्यता आहे. आजच्या जनता संवादावेळीच ते ही घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

 • 29 Jun 2022 09:19 PM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साडे नऊ वाजता जनतेशी संवाद साधणार

  मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री ९.३० वजता राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. फेसबुक लाईव्हद्वारे ते राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. बहुमत चाचणीच्या आधीच ते राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

 • 29 Jun 2022 09:16 PM (IST)

  अनिल देशमुख, नवाब मलिक यांना बहुमतचाचणीला उपस्थित राहता येणार

  नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे जेलमध्ये असलेले मंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना उद्याच्या विश्वासमत चाचणीला उपस्थित राहता येणार आहे. सुप्रीम कोर्टाने त्याला परावानगी दिली आहे. यापूर्वी राज्यसभा आणि विधान परिषद निवडमुकीत मतदानाला हजर राहता आले नव्हते.

 • 29 Jun 2022 09:14 PM (IST)

  ठाकरे सरकारच्या निर्णयाचा उदया होणार फैसला

  मुंबई- बहुमत चाचणीला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे उद्या सकाळी ११ वाजता विश्वासमत चाचणीला सरकारला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे उद्या सकाळी ठाकरे सरकारचा निर्णय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 • 29 Jun 2022 09:11 PM (IST)

  उद्या बहुमत चाचणी होणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

  नवी दिल्ली - उद्या राज्याच्या विधानसभेत बहुमत चाचणी होणार, सुप्रीम कोर्टाने या चाचणीला दिलेले आव्हान फेटाळले आहे. राज्यपालांनी दिलेल्या बहुमत चाचणीला सरकारतर्फे सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. यावर तीन तास सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करण्यात आला. उद्या ठाकरे सरकारचा फैसला सभागृहात होणार, हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केला होता.

 • 29 Jun 2022 09:03 PM (IST)

  महत्त्वाचा निर्णय - सुप्रीम कोर्टात कोर्टरुममध्ये तिन्ही पक्षांचे वकील दाखल

  नवी दिल्ली - राज्याच्या विशवासमत चाचणीवर काही क्षणात निर्णय होणार आहे.  तिन्ही पक्षांचे वकील कोर्टरुममध्ये दाखल झाले आहेत.

 • 29 Jun 2022 08:59 PM (IST)

  विवेक फणसळकर मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

  मुंबई - 1989 बॅचचे आयपीएस अधिकारी विवेक फणसळकर यांची नियुक्ती मुंबईच्या नव्या पोलिस आयुक्तपदी करण्यात आली आहे. 30 जून रोजी विद्यमान पोलीस आयुक्त संजय पांडे सेवानिवृत्त होत आहेत. यापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारच्या जवळचे संजय पांडे यांना मुदतवाढ दिली जाऊ शकते, असे सांगितले जात होते. तथापि, राज्याच्या गृह मंत्रालयाने अधिकृत प्रेस रिलीज जारी करत विवेक फडणसळकर यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

 • 29 Jun 2022 08:54 PM (IST)

  राज्याचं भवितव्य ठरवणारा सुप्रीम कोर्टाचा निर्णय काही क्षणांत

  नवी दिल्ली - राज्यातील महाविकास आघाडी सरकारचं भवितव्य ठरवणारा सुप्रीम कोर्टाचा निर्णय काही वेळातच होण्याची शक्यता आहे. राज्यपालांनी उद्या बहुमतचाचणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. त्याला सरकारने आव्हान दिले होते. त्यावर सुप्रीम कोर्टात दोन्ही बाजुंनी युक्तिवाद झाला, आता थोड्याच वेळात त्यावर निर्णय येणार आहे. राज्यातील आमदार, सरकार यांचा निर्णय यातून होणार आहे.

 • 29 Jun 2022 08:52 PM (IST)

  विश्वासदर्शक ठराव नक्की जिंकणार, एकनाथ शिंदे यांना विश्वास  

  गुवाहाटी-  आम्ही मुंबईला उद्या पोहचणार आहोत,  विश्वासदर्शक ठरावात सर्व आमदार सहभागी होणार, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विश्वासदर्शक ठराव नक्की जिंकू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. पुढील कारवाई सर्व आमदारांसोबत बोलून ठरुन  कोर्टाचा निर्णय लागेल त्यानुसार पुढची कारवाई होईल  उद्याचं अधिवेशन बोलावलं आहे, त्या कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान होईल उद्या विश्वासदर्शक ठरावानंतर पुढची प्रक्रिया होईल. विश्वासदर्शक ठराव नक्की जिंकणार  काँग्रेस-राष्ट्रवादीला मी काय सल्ला देणार, ते त्यांचा निर्णय घेतील. असे ते म्हणाले.

 • 29 Jun 2022 08:28 PM (IST)

  विश्वासमत चाचणीबाबत सुप्रीम कोर्ट 9 वाजता निर्णय देणार

  नवी दिल्ली - विश्वासमत चाचणीला देण्यात आलेल्या आव्हानावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, आता यावर रात्री 9 वाजता सुप्रीम कोर्ट निर्णय देणार आहे. शिवसेनेकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद करत राज्यपाल हे एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप केला आहे. आधी अपात्रतेचा निर्णय व्हावा आणि नंतर बहुमत चाचणी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मात्र शिंदे गटाचे वकील, राज्यपालांचे वकील आणि सॉलिसिटर जनरल यांनी राज्यपालांचा निर्णय योग्यच असल्याचा दावा केला आहे.

 • 29 Jun 2022 08:24 PM (IST)

  सुप्रीम कोर्ट सुनावणी- अपात्रतेचा निर्णय आधी व्हावा, बहुमत चाचणी एका आठवड्याने व्हावी- शिवसेनेचे वकील

  अभिषेक मनु सिंघवी - बहुमत चाचणी आणि अपात्रता हे एकमेकांशी संबंधित आहे.

  अभिषेक मनु सिंघवी - राज्यपाल एकतर्फी निर्णय घेत आहेत

  अभइषेक मनु सिघवी - अपात्रतेचा निर्णय आधी व्हावा, बहुमत चाचणी एका आठवड्याने व्हावी.

 • 29 Jun 2022 08:12 PM (IST)

  सुप्रीम कोर्ट सुनावणी- हेच ते राज्यपाल ज्यांनी 12 आमदारांवर निर्णय दिला नाही- शिवसेनेचे वकील

  पुन्हा शिवसेनेचे वकील अभिषेक मनु सिंघवी युक्तिवादासाठी उभे राहिलेत.

  अभिषेक मनु सिंघवी - हे तेच राज्यपाल आहेत, ज्यांनी १२ आमदारांचा निर्णय एक वर्षे घेतला नाही.

  अभिषेक मनु सिंघवी - उपाध्यक्षांवरच नेहमी संशय का घेतला जातोय, राज्यपाल हे पवित्र गाय आहेत का

  अभिषेक मनु सिंघवी - ते देवदूत नाहीत, मानव आहेत.

  अभिषेक मनु सिंघवी - राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचं मत जाणून घ्यायला हवं होतं.

 • 29 Jun 2022 08:03 PM (IST)

  सुप्रीम कोर्ट सुनावणी- 39 आमदारांच्या जीवाला धोका होता असा मीडिया रिपोर्ट-सॉलिसिटर जनरल

  सॉलिसिटर जनरल- 39 आमदारांच्या जीवाला धोका होता असा मीडिया रिपोर्ट

  सलिसिटर जनरल - संजय राऊत यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला

  सॉलिसिटर जनरल - या धमक्यांकडे राज्यपाल दुर्लक्ष करु शकत नव्हते.

  सॉलिसिटर जनरल - नोटिशीला उत्तर देण्यासाठी दोन दिवसांचा अवधी देण्यात आला, तेच आता २४ तासांत बहुमत चाचणी का, असा प्रश्न विचारत आहेत.

  सॉलिसिटर जनरल - राज्यपालांनी आलेली सर्व पत्रे तपासली होती. त्यानंतर बहुमत चाचणीचा निर्णय घेण्यात आला.

  सॉलिसिटर जनरल यांचा युक्तिवाद संपला

 • 29 Jun 2022 07:58 PM (IST)

  सुप्रीम कोर्ट सुनावणी - राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देण्यासारखे काही घडलेले नाही - सॉलिसिटर जनरल

  सॉलिसिटर जनरल - नबम राबिया यांच्या निकालाचा संदर्भ देण्यात आला.

  सॉलिसिटर जनरल - राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देण्यासारखे काही घडलेले नाही

  सॉलिसिटर जनरल - राज्यपालांच्या आदेशाचं वाचन

  सॉलिसिटर जनरल - राज्यपालांच्या आदेशाची कोर्ट समीक्षा करु शकते

 • 29 Jun 2022 07:49 PM (IST)

  सुप्रीम कोर्ट सुनावणी - कोण मतदान करणार आणि कोण नाही, हे उपाध्यक्ष ठरवू शकत नाहीत - सॉलिसिटर जनरल

  राज्यपालांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांचा युक्तिवाद

  कोर्ट- सध्याची स्थिती अपरिवर्तनीय नाही-न्यायाधीश

  सॉलिसिटर जनरल तुषार मेहता - उपाध्यक्षांनी त्यांचा अधिकाराचा गैरवापर केला

  सॉलिसिटर जनरल - अविश्वासाचा प्रस्ताव असताना निर्णयाचे धाडस केलेच कसे

  सॉलिसिटर जनरल- अल्पमतात सरकार, उपाध्यक्षांच्या अधिकारांचा चुकीचा वापर

  सॉलिसिटर जनरल - कोण मतदान करणार आणि कोण नाही, हे उपाध्यक्ष ठरवू शकत नाहीत

 • 29 Jun 2022 07:41 PM (IST)

  सुप्रीम कोर्ट सुनावणी- बहुमत चाचणी रोखणे, हे नैसर्गिक न्यायाला धरुन नाही-राज्यपालांचे वकील

  राज्यपालांचे वकील मणिंदर सिंह यांचा युक्तिवाद

  मणिंदर सिंह- बहुमत चाचणीसाठी राज्यपालांना कुणाच्याही सूचनेची गरज नाही.

  मणिंदर सिंह - बहुमत चाचणी बोलावण्याचा राज्यपालांना अधिकार आहे.

  मणिंदर सिंह- बहुमत चाचणीसाठी बोलावणं ही नैसर्गिक न्यायाची प्रक्रिया

  मणिंदर सिंह - बहुमत चाचणी घ्या, बहुमत चाचणी सिद्ध करा

  मणिंदर सिंह- बहुमत चाचणी रोखणे, हे न्यायाला धरुन नाही

 • 29 Jun 2022 07:35 PM (IST)

  सुप्रीम कोर्ट सुनावणी- आम्हीच शिवसेना आहोत, एकनाथ शिंदेंच्या वकिलांचा युक्तिवाद

  नीरज कौल - राजकीय नैतिकतेसाठी बहुमत चाचणी गरजेची

  कोर्ट- बंडखोर गटात किती आमदार आहेत

  नीरज कौल -  माहितीनुसार 55 पैकी 39 आमदार बंडखोर गटात आहे.

  कोर्ट- किती जणांना अपात्रतेची नोटीस

  नीरज कौल- 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस आहे.

  नीरज कौल - शिंदे गटाने शिवसेना सोडलेली नाही.

  नीरज कौल- हा गटच शिवसेना आहे, यांच्याकडे बहुमत आहे. 9 अपक्ष आमदारांचेही समर्थन आहे.

  नीरज कौल - पक्षातील केवळ 14 आमदार आम्हाला विरोध करीत आहेत.

 • 29 Jun 2022 07:26 PM (IST)

  मुख्यमंत्री बहुमत चाचणीला सामोरे जाणार नाहीत-सूत्र

  मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला सामोरे जाणार नाहीत, त्यापूर्वी ते राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बहुमत चाचणीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण होईल. ते निरोपाचं भाषण असेल, अशी माहिती आहे. तर मुख्यमंत्री शेवटच्या क्षणापर्यंत लढा देतील, असे राऊत म्हणाले आहेत.

 • 29 Jun 2022 07:22 PM (IST)

  मुख्यमंत्र्यांनी त्यांची खंत व्यक्त केली- संजय राऊत

  मुंबई- माझ्याच माणसांनी मला दगा दिला, हे  उद्धव ठाकरेंनी केलेले वक्तव्य हेलावून टाकणारे आहे. असे संजय राऊत म्हणाले आहेत.  त्यांच्यासारखा सस्कारक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला. ते अजूनही मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जी वेदना व्यक्त केली, ती हेलावून टाकणारी आहे. हेच जेव्हा संजय राऊत बोलतात तेव्हा त्यांच्यावर गुवाहाटीतील आमदार टीका करतात. पण मी जे म्हणतो तेच मुख्यमंत्री वेगळ्या भाषेत म्हणत आहेत. ज्यांनी न पटणारी कारणे देत मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्याची वेदना महाराष्ट्राच्या मनात कायम राहील. ज्या प्रमाणे औरंगजेब या मातीत गाडला गेला, त्याचप्रमाणे या बंडखोरांना हिशोब द्यावा लागेल. हे जे तुम्ही काही राष्ट्रीय हेतूने केलं की त्यामागे तुमचा काही स्वार्थ होता. हे प्रश्न निर्माण होतील, त्याची उत्तरे बंडखोरांना द्यावं लागेल. उद्धवजींचे भाषण निरोपाचं भाषण केलं नाही, त्यांची त्यांच्या भावना व्यक्त केल्या. उद्या जे व्हायचं ते होईल. राज्याने एक सुस्कंकृत नेतृत्व अनुभवलं, असं राऊत म्हणाले आहेत.  आमचे काही मित्र मंत्रिपदासाठी कपडे शिवून तयार आहेत. त्यासाठी त्यांनी जे पाप केलं आहे शिवसेना फोडण्याचं. ते पाप महाराष्ट्र विसरणार नाही. त्यांना संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रात सैन्य दाखल झालं आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठण्यात आल्या आहेत. काही जणांना अटक करण्यात आली आहे. मला तुरुंगात टाकण्यासाठी केंद्रीय यंत्रणा भाजपाच्या मदतीने प्रयत्न करीत आहेत.

 • 29 Jun 2022 07:15 PM (IST)

  सुप्रीम कोर्ट सुनावणी- उपाध्यक्षांना कोणत्याही निर्णयांचा अधिकार नाही - शिंदेंचे वकील

  नीरज कौल - राज्यपालांविरोधात केलेला सिंघवींचा युक्तिवाद चुकीचा

  नीरज कौल - राज्यपालांनी अपक्षांच्या पत्राचाही विचार केला आहे.

  नीरज कौल -  उपाध्यक्षांना कोणत्याही निर्णयांचा अधिकार नाही, त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आहे.

 • 29 Jun 2022 07:11 PM (IST)

  सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे घेणार राजीनाम्याचा निर्णय

  मुंबई- सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनाम्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. उद्याच जर बहुमत चाचणीचा निर्णय झाला, तर मुख्यमंत्री राजीनमा देण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. कॅबिनेट बैठकीत त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. आजच्या बैठकीत तीन नामांतरांचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 • 29 Jun 2022 07:07 PM (IST)

  सुप्रीम कोर्ट सुनावणी- राज्यपालांचा बहुमत चाचणीचा निर्णय योग्यच-शिंदेंचे वकील

  नीरज कौल- स्पष्टता येण्यासाठी आणि सभागृहाचं बहुमत पाहण्यासाठी विश्वासमत चाचणी गरजेची

  नीरज कौल - या स्थितीत बहुमत चाचणी गरजेची. ती घेण्याचे राज्यपालांनी ठरवले आहे.

  नीरज कौल - तुमच्याकडे बहुमत असेल तर जिंकाल नसेल तर हराल

  नीरज कौल - माध्यमांमधून मिळणारी माहिती महत्वाची

  नीरज कौल- राज्यपालांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर संवैधानिक कर्तव्य बजावले

 • 29 Jun 2022 07:01 PM (IST)

  सुप्रीम कोर्ट सुनावणी- बहुमत चाचणी आधी घ्या, मग इतर निर्णय घ्या - शिंदे गटाच्या वकिलांची मागणी

  नीरज कौल- राज्यात 2020 मध्ये बहुमत चाचणीचा निर्णय देण्यात आला होता.

  नीरज कौल- बहुमत चाचणी तत्काळ व्हायलाच हवी

  नीरज कौल - आधी बहुमत चाचणी आधी घ्या, मग बाकीचे निर्णय घ्या

  नीरज कौल - अविश्वास प्रस्ताव असलेले उपाध्यक्ष नोटीस कशी देऊ शकतात

 • 29 Jun 2022 06:53 PM (IST)

  सुप्रीम कोर्ट सुनावणी- सरकार बहुमत चाचणीला का घाबरते आहे?-शिंदेंचे वकील

  नीरज कौल- लोकशाहीत बहुमत चाचणीसाठी विधिमंडळापेक्षा दुसरी जागा आहे का?

  नीरज कौल - बहुमत सिद्ध करण्यासाठी पक्ष कोर्टात येतात, इथे मात्र दुसरीच परिस्थिती आहे.

  नीरज कौल- कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं असताना बहुमत चाचणीला विरोध का

  नीरज कौल- राज्यपालांनी घेतले निकाल हा योग्य आहे. सध्याची स्थिती पाहता तो योग्यच म्हणायला हवा

  नीरज कौल- चाचणीला उशीर केल्यास घटनेला अधिक धक्का बसेल

 • 29 Jun 2022 06:46 PM (IST)

  मंत्रिमंडळ बैठक- मुख्यमंत्र्यांनी आभार व्यक्त केले- जयंत पाटील

  मुंबई - तीन वेगवेगळे पक्ष एकत्र आले त्यांनी चांगले सरकार चालवले. त्यांनी आणि सचिवांनी केलेल्या कामाबद्दल आभार मानले. सध्याच्या परिस्थितीत विश्वासदर्शक ठराव उद्या होणार आहे. त्यांच्याच पक्षातील आमदारांना उद्या उपस्थित राहता येणार की नाही, याचीच त्यांना शंका असावी. कोर्टाने निर्णय दिल्यास बहुमत चाचणी होईल.  उद्या चाचणी झाली तर ही शेवटची कॅबिनेट बैठक असेल. अडीच वर्ष खूप सहकार्य केले, काही चूक झाली असेल तर माफ करा, असेही मुख्यमंत्री म्हणाल्याची माहिती आहे.

 • 29 Jun 2022 06:40 PM (IST)

  सुप्रीम कोर्ट सुनावणी: अल्पमतातील सरकार सत्तेत राहण्याचा प्रयत्न करतंय-शिंदेंचे वकील

  कोर्ट - बहुमत चाचणीत कोण कोण येऊ शकेल?

  नीरज कौल - अल्पमतातील सरकार सत्तेत राहण्याचा प्रयत्न करतंय. मुख्यमंत्री बहुमत चाचणीपासून वाचण्याचा प्रयत्न का करतायेत.

 • 29 Jun 2022 06:30 PM (IST)

  मला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद, मुख्यमंत्र्यांचे कॅबिनेटमध्ये भाषण

  मुंबई- मला माझ्याच काहीच लकांनी दगा दिल्याने ही परिस्थिती उद्भवली, अशी खंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी हे विधान केलं आहे. सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे धन्यवाद, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. पाच वर्षे हे सरकार चालणार असे मी म्हणालो होतो, पण माझ्याच लोकांनी मला दगा दिला, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 • 29 Jun 2022 06:24 PM (IST)

  औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

  मुंबई- औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर होणार, उस्मानाबादचं नामकरण धाराशीव होणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. शिवसेनेकडून हे प्रस्ताव मांडण्यात आले होते. तर नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यात येणार आहे. या तीन महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दि बा पाटील यांच्या नावाची मागणी काँग्रेसकडूनही करण्यात आली होती.

 • 29 Jun 2022 06:21 PM (IST)

  सुप्रीम कोर्ट सुनावणी: सरकारचं बहुमत सोडा, शिवसेना पक्षातच बहुमत नाही - शिंदेंच्या वकिलांचा युक्तिवाद

  नवी दिल्ली - एकनाथ शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांची युक्तिवादाला सुरुवात

  नीरज कौल - नबम रेबिया यांच्या निकालाचा दाखला दिला. उपाध्यक्षांच्या अविश्वास प्रस्तावावर निर्णय व्हायला हवा. मात्र सद्यस्थितीत बहुमत चाचणी लांबवू नये. घोडेबाजार होऊ नये, म्हणून ही चाचणी महत्त्वाची आहे. अनेकांचे राजकीय करिअर संपुष्टात येईल. सदस्यांची अपात्रता हा मुद्दा नाही. बहुमत चाचणी ही लोकशाही मजबूत करणारी बाब, असे सुप्रीम कोर्टानेच सांगितलेले आहे.

  नीरज कौल - अपात्रता हा मुद्दा गैरलागू ठरतो. बहुमत चाचणी व्हायलाच हवी. विश्वासदर्शक ठराव थांबवता येणार नाही.

  नीरज कौल- सरकारचं बहुमत सोडा, शिवसेना पक्षातच बहुमत नाही

  नीरज कौल - हे बहुमत चाचणीला का घाबरत आहेत.

 • 29 Jun 2022 06:11 PM (IST)

  सुप्रीम कोर्ट सुनावणी: अयोग्यतेचा मुद्दा असला तरी बहुमत चाचणी थांबवता येणार नाही- कोर्ट

  अभिषेक मनु सिंघवी - सिंघवींनी मध्य प्रदेशातील 2020 च्या प्रकरणाचा दावा केला. कृत्रिम बहुमत निर्माण करुन त्यानंतर सरकार स्थापन करण्यात आले होते. हे टाळण्यासाठी 11 जुलैनंतर बहुमत चाचणी व्हावी. मध्य प्रदेशात याबाबत अध्यक्षांना अधिकार होता, मात्र महाराष्ट्रात उपाध्यक्षांना तो अधिकार का नसेल. सदस्यत्वांबाबत निर्णयाचा अधिकार उपाध्यक्षांना का नाही

  अभिशेक मनु सिंघवी - सुनील प्रभू हेच शिवसेनेचे मुख्य प्रतोद आहेत, त्यांना उपाध्यक्षांनी मान्यता दिलेली आहे.

  कोर्ट - अयोग्यतेचा मुद्दा असला तरी बहुमत चाचणी थांबवता येणार नाही.

 • 29 Jun 2022 06:03 PM (IST)

  सुप्रीम कोर्टात सुनावणी: शिंदे गटासाठी एवढी घाई का, शिवसेनेच्या वकिलांचा युक्तिवाद

  अभिषेक मनु सिंघवी- उत्तराखंच्या रावत केसचा दाखला देत बहुमतचाचणीसाठी हा कमी वेळ असल्याचा युक्तिवाद. यापूर्वीच्या प्रकरणांत आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा चर्चेला नव्हता. आधी आमदारांच्या सदस्यत्वाचा मुद्दा निकाली लागणे गरजेचे आहे. १६ आमदार पात्र की अपात्र याचा निर्णय़ होईपर्यंत विश्वासमत चाचणी नको.

 • 29 Jun 2022 05:59 PM (IST)

  पुणे शहराचं नाव जिजाऊनगर करा, काँग्रेसची कॅबिनेट बैठकीत मागणी

  पुणे शहराचे नाव जिजाऊनगर करा अशी मागणी काँग्रेसने मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे. आजची बैठक ही नामांतरासाठी गाजण्याची शक्यता आहे. शिवसेना औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची काँग्रेसची मागणी आहे. शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोडला बॅरिस्टर अंतुलेंचं नाव देण्याची मागणी

 • 29 Jun 2022 05:49 PM (IST)

  विश्वासदर्शक ठरावासाठी अधिक वेळ हवा, सरकारची मागणी

  अभिषेक मनु सिंघवी - राज्यपालांनी कोरोनामुक्त झाल्यावर लगेच ते विरोधी पक्षनेत्यांना भेटले आणि त्यांनी लगेचच बहुमत चाचणीचे आदेश दिले आहेत, याची एवढी घाई का ? ज्यांनी बाजू बदलली ते जनतेची भूमिका मांडू शकणार नाहीत. 11 जुलैपर्यंत राज्यपाल वाट पाहू शकत नाहीत का, ही कायदा आणि घटनेची थट्टा नाही का?

  कोर्ट - राज्यपालांनी विरोधी पक्षाचं सरकार व्हावं, असं लिहिलं आहे का ?

  अभिषेक मनुसिंघवी- किहोटो निकालाचं सिंघवींकडून पुन्हा वाचन. सत्ता लोभी लोकांपासून लोकशाहीला वाचवणे, हा या निकालाया पाया आहे.

  कोर्ट - शिंदे गटाने खरेच सत्ता स्थापन करण्याचे पत्र पाठवले आहे का ? बहुमताचा निर्णय विधानभवनातच शक्य आहे.

  अभिषेकमनु सिंघवी- मुख्यमंत्र्यांना न विचारता बहुमत चाचणीचे आदेश का, शिंदे गटासाठी एवढी घाई का ?

 • 29 Jun 2022 05:41 PM (IST)

  सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद सुरु

  अभिषेक मनु सिंघवी- बंडखोरांनी स्टे मिळवला म्हणजे त्यांना वाटते की ते काहीही करु शकता

  कोर्ट- 34 लोकांनी सह्या केल्या नाहीयेत का

  अभिषेक मनुसिंघवी- त्याची शहानिशा झालेली नाही. विरोधी पक्षनेते भेटल्यानंतरच राज्यपालांनी विश्वसमत चाचणीचे आदेश दिलेत. उपाध्यक्षांच्या निर्णयापूर्वी बहुमत चाचणी नको.

  कोर्ट- जर सरकारने बहुमत गमावलेले असेल, आणि सरकारकडून उपाध्यक्षां वापर केला असेल असे गृहित धरले, हे जर राज्यपालांना कळले असेल तर राज्यपाल काय करणार?

  अभिषेक मनुसिंघवी - राज्यपालांनी शिंदे गटाचं पत्र का तपासलं नाही. अनधिकृत मेल आयडीवरुन पत्र पाठवून आमदार सूरतवरुन गुवाहटीला गेले.

 • 29 Jun 2022 05:37 PM (IST)

  मंत्रिमंडळ बैठकीतून दोन काँग्रेसचे मंत्री बाहेर पडले, काय घडले?

  मुंबई- वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख मंत्रिमंडळ बैठक सोडून निघाले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत असे काय घडले ज्यावरुन हे मंत्री बाहेर पडले आहेत. अशी चर्चा सुरु झाली आहे. नामांतराचे प्रस्ताव मांडण्यात आल्याने काँग्रेस नाराज झाली आहे का अशी चर्चा सुरु झाली आहे.

 • 29 Jun 2022 05:13 PM (IST)

  सुप्रीम कोर्टात विश्वासदर्शक ठरावावर सुनावणी

  नवी दिल्ली - विश्वासदर्शक ठरावाला दिलेल्या आव्हानावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. शिवसेनेकडून अभिषेक मनुसिंघवी, शिंदेंकडून नीरज कौल आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे राज्यपालांच्या बाजूने भूमिका मांडणार आहेत.

  अभिषेक मुन सिंघवी- आपल्याला सात ते आठ मुद्दे मांडायचे आहेत. आजच बहुमत चाचणीचे पत्र मिळाले आहे. खूप वेगाने चाचणी होते आहे. बहुमत चाचणीला सर्व आमदार उपस्थित हवेत, तेव्हाच ती खरी ठरेल. काही आमदार कोरोनाग्रस्त आहेत, तर काही परदेशात असल्याचा युक्तिवाद.

  अभिषेक मनु सिंघवी- मतदानासाठी कोण पात्र आणि कोण अपात्र हे आधी ठरायला हवे ? नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांची याचिका अद्याप प्रलंबित आहे. तसेच शिवसेनेच्या 16 बंडखोरांबाबतचा निर्णयही 11 तारखेला प्रलंबित आहे. 11 जुलैनंतर विश्वासदर्शक ठरावावर मतदान व्हावे.

  कोर्ट- बहुमत चाचणीसाठी कमी वेळ आहे का ?

  अभिषेक मनुसिंघवी- हो, हा वेळ कमी आहे.

  कोर्ट- बहुमत चाचणी आणि अपात्रतेचा संबंध काय ?

  अभिषेक मनुसिंघवी - यांचा एकमेकांशी संबंध आहे. बहुमत चाचणी आणि अपत्रातेचा एकमेकांशी संबंध आहे. ते जर अपात्र झाले तर ते आमदार राहणार नाहीत. अपात्र झाल्यावर त्यांचं मत अवैध ठरेल.

  कोर्ट- ते अपात्र आहेत की नाहीत हे कोर्ट ठरवणार आहेत, याबाबत उपाध्यक्षांवर प्रश्न निर्माण झालेले आहेत. कोर्ट अपवादात्मक परिस्थितीतच आदेश देऊ शकतात. राज्यपालांच्या अधिकारात हस्तक्षेप करता येणार नाही.

  अभिषेक मनुसिंघवी - राजेंद्र सिंह राणा यांच्या खटल्याचा दाखला देण्यात आला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने काम करायला हवे, विरोधी पक्षनेत्यांच्या आदेशानुसार वागू नये. जर उद्या विधानसभा उपाध्यक्षांनी या आमदारांबाबत निर्णय घेतला तर त्यामुळे लोकशाहीच्या मूळची धोकात येतील. ही भीती त्याच दिवशी व्यक्त करण्यात आली होती. मात्र तुम्ही त्यावेळी कोर्टात पुन्हा येऊ शकाल असे सांगितले होते. त्यानुसार आम्ही आलो आहोत. सिंघवींनी 34 बंडखोर आमदारांचे पत्र वाचून दाखवले.

 • 29 Jun 2022 05:09 PM (IST)

  बंडखोर आमदारांचा गुवाहाटी विमानतळावर, गोव्याकडे रवाना होणार

  गुवाहाटी- गेल्या सात दिवसांपासून गुवाहाटीत असलेल्या शिवसेना बंडखोर आमदारांचा मुक्काम आता संपला आहे. आता हे आमदार बसमधून विमानतळावर बसमधून पोहचले आहेत. भाजपा नेते मोहित कम्बोज हेही यात दिसले आहेत. गुवाहाटी विमानतळावरुन ते गोव्याला जाणार आहेत. गोव्यात त्यांचा मुक्काम ताज हॉटेलमध्ये असणार आहे. हा प्रवास सरकार स्थापनेच्या दिशेने आहे, अशी चर्चा रंगली आहे.

 • 29 Jun 2022 05:01 PM (IST)

  मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात पोहोचले.

  मुंबई- मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे हेही त्यांच्यासोबत आहे. या बैठकीपूर्वी त्यांनी अनिल परब यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती आहे. आजच्या बैठकीत तीन नामांतरांच्या मुद्द्यावर खडाजंगी होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरांचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. या नामांतरांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काय भूमिका असणार आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या नामांतरांच्या मागणीला विरोध झाला तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. तर मंत्रालयातही सचिवालयात तयारी करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक पार पडली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक अजित पवार यांच्या दालनात झाल्याची माहिती आहे. मंत्रालयात पोहचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करुन ते मंत्रालयात आत गेले आहेत.

 • 29 Jun 2022 05:00 PM (IST)

  सुप्रीम कोर्टात विश्वासदर्शक ठरावावर सुनावणी सुरु

  नवी दिल्ली - राज्यपालांनी दिलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या आदेशाला शिवसेनेने आव्हान दिले आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली आहे. आज सकाळी ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच्यावर संध्याकाळी 5 वाजता सुनावणी करणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात शिवसेनेने दोन आक्षेप घेतले आहेत. यात पहिल्यात असा युक्तिवाद केला आहे की, अधिवेशन बोलवण्याचा राज्यपालांचा आदेश मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या शिफारसी आणि सल्ल्याने जारी करण्यात येण्याची गरज होती, मात्र राज्यपालांनी त्याच उल्लंघन करून मनमानी पद्धतीने अधिवेशन बोलविण्याचे आदेश जारी केला आहे. शिवसेनेचा दुसरा असा आक्षेप घेतला आहे की, पक्षांतराचा आरोप असलेल्या काही आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होण्यापूर्वी त्यांना विधानसभेच्या कामकाजाचा भाग बनवणे हे संविधान विरोधी आहे. हे शिवसेनेचे आक्षेप आहेत.

 • 29 Jun 2022 04:58 PM (IST)

  राज्यपालांनी ही तत्परता 12 आमदारांच्या वेळी दाखवली असती तर आदर वाढला असता, खडसेंची टीका

  मुंबई- भारतीय जनता पार्टीचे नेते काल राज्यपालांना भेटले आणि महाविकास आघाडी सरकारवर अविश्वास ठराव आणा अशी मागणी केली, राज्यपालांनीही तात्काळ उद्या अधिवेशन बोलवण्याचे सूचना सरकारला केली. मात्र राज्यपालांनी एवढीच तत्परता दोन वर्षांपासून रखडलेल्या 12 आमदारांच्या शिफारसीबाबत का दाखवली नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे. मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे यादी दिली होती, ती आमदारांची यादी तत्परतेने मंजूर केली असती तर राज्यपालांचा आदर वाढला असता, असे खडसे म्हणाले आहेत. राज्यपालांनी अधिवेशन बोलण्यासाठी काही अवधी द्यायला हवा होता, असेही खडसे म्हणालेत. कोणी भेटायचं आणि अविश्वास ठराव राज्यपालांकडे मागणी करायची, कधी अधिवेशन बोलवायचं, याचे काही प्रक्रिया-नियम असतात, असेही ते म्हणाले. तत्काळ अधिवेशन बोलवणे हे कृत्य घटनाबाह्य आहे अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच पुढच्या कालखंडातही राज्यपालांनी अशीच तत्परता दाखवावी, असेही खडसे म्हणालेत.

 • 29 Jun 2022 04:50 PM (IST)

  बंडखोर आमदारांचा गुवाहाटीचा मुक्काम संपला, विमानतळाकडे रवाना

  गुवाहाटी- गेल्या सात दिवसांपासून गुवाहाटीत असलेल्या शिवसेना बंडखोर आमदारांचा मुक्काम आता संपला आहे. आता हे आमदार बसमधून विमानतळाकडे निघाले आहेत. गुवाहाटी विमानतळावरुन ते गोव्याला जाणार आहेत. गोव्यात त्यांचा मुक्काम ताज हॉटेलमध्ये असणार आहे. हा प्रवास सरकार स्थापनेच्या दिशेने आहे, अशी चर्चा रंगली आहे. गेले सात दिवस सूरत ते गुवाहाटी असे राजकीय नाट्य सुरु होते. शिवसेनेचे सुमारे 39 आमदार आणि 11 अपक्ष आमदार यांचा यात समावेश आहे.

 • 29 Jun 2022 04:37 PM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मातोश्रीवरुन निघाले

  मुंबई- मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयाकडे रवाना झाले आहेत. आदित्य ठाकरे हेही त्यांच्यासोबत आहे. या बैठकीपूर्वी त्यांनी अनिल परब यांच्याशीही चर्चा केल्याची माहिती आहे. आजच्या बैठकीत तीन नामांतरांच्या मुद्द्यावर खडाजंगी होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतरांचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. या नामांतरांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची काय भूमिका असणार आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या नामांतरांच्या मागणीला विरोध झाला तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.

 • 29 Jun 2022 04:30 PM (IST)

  राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना संपवण्याचं काम करतेय, हे दोन वर्षापासून सांगतोय-सुजय विखे

  मुंबई- मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला, त्यांच्या हक्काचे 52 आमदार सोडले मात्र ते पवारांना सोडायला तयार नाहीत, अशी टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे. आज शिवसेनेवर जे संकट आहे त्याला कारण शिवसेनाच आहे, असेही विखे म्हणाले. हे सरकार अल्पमतात आहे त्यामुळे राज्याला स्थिर सरकार मिळावे यासाठी चाचपणीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले आहे. उद्याचा निकाल काही असो मात्र राष्ट्रवादीसोबत राहून शिवसेनेचे खच्चीकरण झाले, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे. अजूनही वेळ गेली नाही, उद्धव ठाकरेंनी योग्य निर्णय घ्यावा, असे आवाहनही विखे पाटील यांनी केले आहे. जे आमदार गुवाहाटीला गेले आहेत त्यांनी आपले रक्त सांडून शिवसेना उभी केली आहे, असेही ते म्हणाले. त्यामुळे माझी विनंती आहे उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचा नाद सोडावा आणि 45 आमदार म्हणतील तसं करावं अशी ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो, अशी प्रार्थनाच सुजय विखे यांनी केली आहे.

 • 29 Jun 2022 04:24 PM (IST)

  बंडखोर आमदारांचा नव्या सरकारच्या दिशेने प्रवास सुरु, पहिली गाडी विमानतळाकडे निघाली

  गुवाहाटी- एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार गुवाहाटीचा मुक्काम संपवून आज गोव्याकडे निघणार आहेत. गुवाहाटीतील रेडिसन्स ब्ल्यू या हॉटेलात आमदारांनी त्यांच्या बॅगा भरल्या असून, त्यांची निघण्याची तयारी पूर्ण झाली आहे. हॉटेलमधून कार्यकर्ते आणि स्वीय सहायकांची गाडी विमानतळाकडे निघाली आहे, दुसऱ्या गाडीतून आमदार विमानतळाकडे रवाना होणार आहेत. यातली पहिली गाडी निघाली आहे. हे आमादर आज रात्रीचा मुक्काम गोव्याच्या ताज हॉटेलमध्ये करणार आहेत. गुवाहाटी आणि गोवा विमानतळावर सुरक्षा ठेवण्यात आली आहे. बंडखोर आमदारांचा नव्या सरकारच्या दिशेने प्रवास सुरु असल्याचे मानण्यात येते आहे.

 • 29 Jun 2022 04:19 PM (IST)

  एकनाश शिंदे गटाचे आमदार गोव्याकडे निघणार

  गुवाहाटी- एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार गुवाहाटीचा मुक्काम संपवून आज गोव्याकडे निघणार आहेत. गुवाहाटीतील रेडिसन्स ब्ल्यू या हॉटेलात आमदारांनी त्यांच्या बॅगा भरल्या असून, त्यांची निघण्याची तयारी पूर्ण झाली आहे. हे आमादर आज रात्रीचा मुक्काम गोव्याच्या ताज हॉटेलमध्ये करणार आहेत. गुवाहाटी आणि गोवा विमानतळावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

 • 29 Jun 2022 04:16 PM (IST)

  मुख्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीला जाण्याची शक्यता, अनिल परब यांच्यासोबत मातोश्रीवर चर्चा

  मुंबई- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अनिल परब यांच्यात चर्चा होते आहे. अनिल परब मातोश्रीवर पोहचले आहेत. आज जर राज्य मंत्रिमंडळ बैठक झाली, तर त्यात औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. संध्याकाळी उशिरा ही बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध केला तर त्यावेळी पाहू असे उत्तरही अनिल परब यांनी दिले आहे. मातोश्रीवर जाण्यापूर्वी त्यांनी ही माहिती दिली आहे.

 • 29 Jun 2022 04:12 PM (IST)

  राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरु

  मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. जयंत पाटील आणि हेमंत टकले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहचले आहेत. संध्याकाळी 5 वाजता राज्य मंत्रीमंडळाची बैठक आहे. त्यात औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतराची मागणी शिवसेना करणार आहे, त्यावर काय निर्णय होईल, यावर चर्चा सुरु असल्याची शक्यता आहे. या बैठकीचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोरोना असतानाही आढावा घेतल्याची माहिती आहे. आज शिवसेना औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करा असा प्रस्ताव मांडण्याच येणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीपूर्वी अजित पवारांकडून आढावा घेतला असल्याची माहिती आहे.

 • 29 Jun 2022 04:04 PM (IST)

  काय झाडी..फेम आमदार शहाजीबापू यांची गुवाहाटीत शरद पवारांवर टीका

  गुवाहाटी- गुवाहाटीत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या बैठकीचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यात आमदार शहाजीबापू यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. यात शरद पवारांनी वसंतराव पाटील यांनी कसे बंड केले होते, हे सांगितले आहे. शरद पवारांना ज्यांनी जवळ केलं त्यांना पवारांनी दगा दिला, त्यामुळं पवारांच्या नादी लागू नका, असं शहाजीबापू म्हणाले आहेत. शहाजीबापू यांचे पूर्ण संभाषण- वसंतदादा पाटील हे माझे वडील आहेत, त्यांच्या आशिर्वादाने मी आज मोठा झालेलो आहे. आणि मी वसंतदादा पाटलांना कधीही दगा देणार नाही, असं शरद पवार म्हणाले होते. मात्र दीड वाजता तिथंच बातमी आली. की शरद पवारनं बंड केलं, 40 आमदार घेऊन पळून गेलं, वसंतदादांनी राजीनामा दिला. माझा तर अनुभव लय जोरात आहे. भेटलो की, कसं चाललंय तुझं, बरं चाललंय? काय म्हणतो, गणपतराव...मी तुम्हाला भेटायलोय, ते गणपतराव कशाला काढताय...? हे असंच कायतरी बोलायलंय..हे फसवणारं गुळगुळ आहे...ज्या ज्या माणसाला शरद पवारानं जवळ घेतलं, त्या त्या माणसाला काखेत दाबून मारुन टाकलं...बघा, वसंतदादा पाटलानं आमराईला सभा घेतली, महाराष्ट्रातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवून सांगितलं, इथून पुढं शरद पवारसोबत रहावा...कुठंय वसंतदादाचं घर, कुठंय श्रीपतराव गोंधळ्याचं घर, कुठंय प्रतापराव भोसल्याचं घर, कुठंय कल्लपाचं घर, कुठंय नामदेवराव जगतापाचं सोलापुरातलं घरं...विलासराव आणि सुशीलकुमार शिंदे, हुशार म्हणून पळून गेली. नायतर ह्यांनापण चुरा करुन टाकला असता. असलंय, आपण लांबय, चांगलंय...त्यांच्या नादाला साहेब लागू नका, बाकी काय बी निर्णय घ्या, त्याला जवळ करायचं नाय, नायतर मेलो आपण...

 • 29 Jun 2022 03:57 PM (IST)

  एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर जोरदार कॅम्पेन

  मुंबई- एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर काही व्हिडिओ तुफान व्हायरल केले जात आहेत. या व्हिडीओंमध्ये एकनाथ शिंदे हे खरे हिंदुत्ववादी नेते आहेत असा संदेश दिला जातोय, दुसरीकडे शिंदे हे शिवसेनेतच राहणार हा देखील संदेश या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येत आहे. खरी शिवसेना कोणाची? हा प्रश्नही या व्हिडिओंच्या माध्यमातून उपस्थित करण्यात येत आहे.

 • 29 Jun 2022 03:51 PM (IST)

  तीन नामांतरांच्या भूमिकेवर शिवसेना ठाम, मंत्रिमंडळ बैठक वादळी ठरणार

  मुंबई- आजची मंत्रिमंडळ बैठक वादळी होण्याची शक्यता आहे. तीन नामांतरांसाठी शिवसेना आग्रही असणार आहे. यात औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करा, उस्मानाबादचं नामांतर धाराशीव करा आणि नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी शिवसेना आग्रही असणार आहे. यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेणार, यावर सरकारचे भवितव्य ठरणार असल्याची माहिती आहे.

 • 29 Jun 2022 03:43 PM (IST)

  सुप्रीम कोर्टातील याचिकेत शिवसेनेचे दोन महत्त्वाचे आक्षेप

  नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात शिवसेनेने दोन आक्षेप घेतले आहेत. यात पहिल्यात असा युक्तिवाद केला आहे की, अधिवेशन बोलवण्याचा राज्यपालांचा आदेश मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या शिफारसी आणि सल्ल्याने जारी करण्यात येण्याची गरज होती, मात्र राज्यपालांनी त्याच उल्लंघन करून मनमानी पद्धतीने अधिवेशन बोलविण्याचे आदेश जारी केला आहे. शिवसेनेचा दुसरा असा आक्षेप घेतला आहे की, पक्षांतराचा आरोप असलेल्या काही आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होण्यापूर्वी त्यांना विधानसभेच्या कामकाजाचा भाग बनवणे हे संविधान विरोधी आहे. हे शिवसेनेचे आक्षेप आहेत.

 • 29 Jun 2022 03:37 PM (IST)

  एकनाथ शिंदे यांच्या विनंतीकडे शिवसेना नेतृत्वाचं दुर्लक्ष-विजय शिवतारे

  पुणे - शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत राहून शिवसेनेचं नुकसान होतं आहे. असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे, तीच आपली भूमिका आहे, असे विजय शिवतारे यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांनी याबाबत शिवसेना नेतृत्वाकडे वारंवार विनंती केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असे शिवतारे म्हणाले आहेत. शिवसेना वाचवणे हीच एकनाथ शिंदे यांची भूमिका असल्याचे शिवतारे यांनी सांगितले आहे. मागच्या निवडणुकीत 52 मतदारसंघ असे होते की ज्या ठिकाणी शिवसेना नंबर दोनवर होती, असेही शिवतारे यांनी सांगितले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आम्ही संघर्ष केला असेही शिवतारे म्हणाले. उद्धव ठाकरेंना एक ठराव करुन पाठवत आहोत, त्यात आम्ही तुमच्यासोबत आहोत, मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत नसल्याचे म्हटले असल्याचे शिवतारे यांनी सांगितले आहे.

 • 29 Jun 2022 03:27 PM (IST)

  'कुठे आणून ठेवलीये हिंदूह्रद्यसम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना?', मनसेचा चिमटा

  शिवसेनेवर टीका करणारे ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले आहे. राजीनाम्याची स्क्रीप्ट ठरली आहे. संभाजी नगरच्या नामांतरणाचा आव आणायचा आणि आपले हिरवे प्रेम खरे हिंदुत्व हे सिद्ध करायचे. कुठे आणून ठेवलीये मा. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेबांची शिवसेना? असे ट्विट त्यांनी केले आहे.

 • 29 Jun 2022 03:21 PM (IST)

  राहुल नार्वेकर आणि भाजपाची वकिलांची टीम दिल्लीला रवाना

  दिल्लीत कायदेशीर प्रक्रिया सुरु असताना आता भाजपनेही याची तयारी सुरु केली आहे. राज्यातील भाजपाचे नेते राहुल नार्वेकर यांच्यासोबतचे भाजपाच्या वकिलांची टीम दिल्लीला रवाना झाली आहे. कालही जेव्हा जे पी नड्डा यांची फडणवीस यांनी भेट घेतली होती तेव्हा महेश जेठमलानी हे त्यांच्यासोबत होते.

 • 29 Jun 2022 03:03 PM (IST)

  ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे बाहुबलीच्या स्वरुपात बॅनर

  एकनाथ शिंदे यांना मर्थन करण्यासाठी ठाण्यात एकीकडे शक्तिप्रदर्शन होत असताना दुसरीकडे शिवसेना दक्षिण भारतीय विभागाने एकनाथ शिंदे यांना थेट बाहुबली अशी पदवी देत बाहुबलीच्या स्वरूपात त्यांचे मोठे बॅनर उभारले आहे. या बॅनरच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे बाहुबली असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.एकनाथ शिंदे यांचे बाहुबली स्वरूपात उभारण्यात आलेले हे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. हा बॅनर एकनाथ शिंदे यांच्या निवस्थानाच्या बाहेरच लावण्यात आला आहे. यासंदर्भात दक्षिण भारतीय सेलच्या पदाधिकाऱ्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या बाजूने असल्याचे सांगितले आहे .मात्र या बॅनरच्या माध्यमातून विजयी भवं असा संदेश देखील देण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना दक्षिण भारतीयांचा देखील पाठिंबा यानिमित्ताने जाहीर कारण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे

 • 29 Jun 2022 03:00 PM (IST)

  राज्याचं नेतृत्व फडणवीसांकडे यावं, पडळकरांचे सिद्धिविनायकाला साकडे

  गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राची वाताहत झाली, असे सांगत राज्याचे नेतृत्व हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यावं. असं साकडं गोपीचंद पडळकर यांनि सिद्धिविनायकाला घातलं आहे. यावेळी आघाडी सरकारवर त्यांनी टीका केली आहे.राज्यातील बहुजन समाज,सामान्य जनता,व्यापारी,शेतकरी या भ्रष्टाचाराच्या वणव्यात होरपळून निघाले आहेत, असे पडळकर म्हणाले.

 • 29 Jun 2022 02:53 PM (IST)

  कोरोना असतानाही अजित पवार सक्रिय

  अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्यानं ते सध्या होम क्वारंटाईन आहेत. मात्र या सत्तासंघर्षात तेही घरातून सक्रिय असल्याची माहिती आहे. घरी बसून अजित पवार सूत्रं हलवतायेत, अशी माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराला अजित पवार फोन करतायेत. फोनवरून अजित पवार आमदारांना सूचना देत असल्याचे सांगण्यात येते आहे. विश्वासदर्शक ठरावासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मुंबईत दाखल व्हायला सुरुवात

 • 29 Jun 2022 02:47 PM (IST)

  आमच्यावर दबाव नाही, लवकरच मुंबईत येतोय-संजय शिरसाट

  आमच्यावर कोणताही दबाव नाही. आम्ही स्वखुशीने  एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो आहोत. आता लवकरच मुंबई मध्ये येत आहोत. असे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे. मतदारसंघातील सर्व नागरिकांचा आमच्यावर विश्वास आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.  आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेतच राहणार आहोत, असेही शिरसाट यांनी म्हटले आहे.

 • 29 Jun 2022 02:43 PM (IST)

  Maharashtra Govt News : देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना फोन 

  देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरे यांना फोन

  बहुमतासाठी मदत करण्याचं आवाहन

 • 29 Jun 2022 02:38 PM (IST)

  Rajyapal of Maharashtra : सेना भवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

  सेना भवनाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

  सर्व पोलिसांना काठी आणि सुरक्षा कवच देण्यात आले आहे

  पुरूष आणि महिला पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

 • 29 Jun 2022 02:30 PM (IST)

  Maharashtra Political Crisis सुधीर मुनगंटीवार, प्रविण दरेकरांनी घेतली उपाध्यक्षांची भेट

  आजारी आमदारांच्या आसन व्यवस्थेसंदर्भात उपाध्यक्षांशी चर्चा

  बहुमत चाचणीपूर्वी आसनव्यवस्थेचा मुनगंटीवारांचा आढावा

  सुधीर मुनगंटीवार यांची टीव्ही 9 मराठीशी बोलताना माहिती

  खुर्ची तुटेपर्यंत खुर्ची सोडू नये, यासाठी लोकशाही आहे का?

  मुनगंटीवारांचा सवाल

 • 29 Jun 2022 02:21 PM (IST)

  देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरेंना फोन

  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा राज ठाकरेंना फोन

  राजू पाटील यांचं मतासाठी फोन

 • 29 Jun 2022 02:19 PM (IST)

  शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात धाव

  शिवसेनेची कोर्टात धाव

  बहुमत चाचणीविरोधात शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात याचिका

  संध्याकाळी पाच वाजता सुनावणी

  तीन वाजेपर्यंत सर्व कागदपत्र सादर करण्याचे आदेश

 • 29 Jun 2022 02:15 PM (IST)

  राज्यात बैठकांचं सत्र

  मातोश्रीवर शिवसेनेचे नेते बैठकीसाठी उपस्थित आहेत

  सागर बंगल्यावर देखील भाजपची बैठक बोलावण्यात आलीय

  सत्तासंघर्ष सुरू असताना घडामोडींना वेग आलाय

 • 29 Jun 2022 02:11 PM (IST)

  शिंदे गटातील आमदार उद्या मुंबईत

  शिंदे गटातील आमदार उद्या मुंबईत

  तीन वाजता गोव्यात बंडखोर आमदार दाखल होतील

  त्यानंतर उद्या आमदार मुंबईत येतील

 • 29 Jun 2022 02:09 PM (IST)

  सागर बंगल्यावर भाजपची बैठक

  सत्तासंघर्ष सुरु असताना भाजपची बैठक

  महत्वाचे नेते सागर बंगल्यावर दाखल

  बैठकीत काय होणार याकडे लक्ष

 • 29 Jun 2022 02:06 PM (IST)

  'मातोश्री'वर आमदारांची बैठक सुरू

  'मातोश्री'वर आमदारांची बैठक सुरू

  शिवसेना नेते संजय राऊत, मंत्री सुभाष देसाई यांच्यासह दिग्गज नेत्यांची उपस्थिती

 • 29 Jun 2022 01:31 PM (IST)

  Eknath Shinde : बाळासाहेबांचं हिदुत्व आम्ही पुढे घेऊन जातोय- एकनाथ शिंदे

  ठाकरे सरकार अल्पमतातच, उद्या विजय आमचाच होणार

  एकनाथ शिंदे यांना विश्वास

  बाळासाहेबांचं हिदुत्व आम्ही पुढे घेऊन जातोय

  एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट भूमिका मांडली

 • 29 Jun 2022 01:27 PM (IST)

  Maharashtra Govt News : शिंदे गटाच्या प्रवासाचा संपूर्ण प्लॅन, वाचा सविस्तर...

  आज बुधवारी दुपारी 3.30 वाजता गुवाहटीतून एकनाथ शिंदेंसह सर्व आमदार गोव्याकडे रवाना होतील

  बुधवारी संध्याकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान बंडखोर आमदार गोव्यात उतरतील. बुधवारचा गोव्यातील मुक्काम हा ताज हॉटेलमध्ये असेल

  गुरुवारी सकाळी 7 ते 8 वाजेच्या सुमारास गोव्याहून सर्व आमदार मुंबईच्या दिशेने विमानाने निघतील

  गुरुवारी सकाळी मुंबई विमानतळावरून सर्व आमदार हॉटेल ताज येथे जातील

  मुंबईतील हॉटेल ताजमध्येच भाजपच्या सर्व आमदारांना बोलावून घेण्यात आलं आहे

  मुंबईतल्या हॉटेल ताजमध्येच भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार एकत्र नाश्ता करतील

  बहुमत चाचणी सकाळी 11 वाजता आहे. त्याआधी भाजप आणि शिंदेसेना विधानभनाकडे रवाना होईल

 • 29 Jun 2022 01:21 PM (IST)

  Maharashtra Political Crisis : नवाब मलिक-अनिल देखमुखांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

  'उद्या मतदान करता यावं'

  नवाब मलिक-अनिल देखमुखांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

  उद्या ठाकरे सरकारची बहुमताची अग्निपरिक्षा

  सरकार टिकवण्यासाठी मविआचे प्रयत्न

 • 29 Jun 2022 01:19 PM (IST)

  Floor Test in Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत काय झालं?

  राष्ट्रवादीची सिल्व्हर ओकवरची बैठक पार

  सर्व कायदेशीर मार्ग अवलंबून पाहायचे

  संध्याकाळी 5 वाजता सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय येईल त्यानंतर पुढील रणनीती ठरवली जाईल

  जर फ्लोअर टेस्टची वेळ आली तर त्याला सामोरे जायचं...

  शेवटपर्यंत महाविकास आघाडी टिकावी, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायचे

 • 29 Jun 2022 01:10 PM (IST)

  कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर शिंदे गटाचे आमदार परतले

  कामाख्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर शिंदे गटाचे आमदार परतले

  थोड्याच वेळात गोव्याला रवाना होणार

 • 29 Jun 2022 12:56 PM (IST)

  Maharashtra Floor Test : आधीच कसे अधिवेशन बोलावता, अरविंद सावंत यांचा सवाल

  राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नाव अजून पुढे दिली नाही

  त्या राज्यपाल यांनी बहुमत चाचणीचा घाईघाईने निर्णय घेतला

  कायदा घटना पायदळी तुडवली जातेय

  आम्ही नोटीस ला उत्तर देण्यासाठी, न्यायालयात गेलो आहोत

  सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलै पर्यंत मुदत दिली आहे

  अपात्र सदस्याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही,

  आधीच कसे अधिवेशन बोलावतात

  अरविंद सावंत यांचा सवाल

 • 29 Jun 2022 12:48 PM (IST)

  Rajyapal of Maharashtra : संदीपान भुमरे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची भव्य रॅली

  संदीपान भुमरे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांची भव्य रॅली

  धुळे सोलापूर हायवेवर निघाली कार्यकर्त्यांची भव्य रॅली

  रॅलीत शेकडो कार्यकर्ते झाले सहभागी

  पारंपरिक वेशभूषेत बंजारा महिलाही रॅलीत झाल्या सहभागी

 • 29 Jun 2022 12:39 PM (IST)

  मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक

  मातोश्रीवर एकेक आमदार येण्यास सुरुवात

  मुख्यमंत्र्यांनी आमदारांना बोलवले

  रवींद्र वायकर, वैभव नाईक, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई मातोश्रीवर

  शिवसेना खासदार विनायक राऊतही उपस्थित

 • 29 Jun 2022 12:33 PM (IST)

  Floor Test in Maharashtra : भाजपचे नागपुरातील आमदार कृष्णा खोपडे मुंबईकडे रवाना

  भाजपने आपल्या सगळ्या आमदारांना मुंबईला बोलावल्यानंतर आमदार मुंबईकडे जायला सुरवात

  भाजपचे नागपुरातील आमदार कृष्णा खोपडे मुंबईकडे रवाना

  आज सायंकाळ पर्यंत सगळेच आमदार आपल्या सोयीनुसार मुंबईला जाणार

  'सरकारवर शिवसेनेचेच नाही तर सगळेच आमदार नाराज'

  भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या टीव्ही 9 मराठीशी बातचीत

 • 29 Jun 2022 12:23 PM (IST)

  Meaning of Floor Test in Politics : खबरदारी आणि सुरक्षेसाठी शिंदे गटाचे आमदार गोव्यात

  शिंदे गटाचे आमदार गोव्यात जाणार

  दुपारी साडे तीन वाजता गोव्यासाठी निघणार

  सकाळी सात वाजता गोव्याहून मुंबईत येणार

  बहुमत चाचणीत सहभागी होणार

  आसाममध्ये मुसळधार पावसाचा इशारा

  खबरदारी आणि सुरक्षेसाठी शिंदे गटाचे आमदार गोव्यात

 • 29 Jun 2022 12:18 PM (IST)

  Maharashtra Political News :आमदारांची बस कामाख्या मंदिराच्या दिशेने रवाना

  कामाख्या देवीच्या दर्शनासाठी शिंदे गटाचे आमदार रवाना

  आमदारांची बस कामाख्या मंदिराच्या दिशेने रवाना

  उद्या मुंबईत दाखल होणार

 • 29 Jun 2022 12:13 PM (IST)

  Maharashtra Political Crisis : आम्ही कायम उद्धव ठाकरेंसोबत- नाना पटोले

  शिवसेनेच्या घरात शांतता राहावी, हीच काँग्रेसची ठाम भूमिका

  आम्ही कायम उद्धव ठाकरेंसोबत

  नाना पटोले यांचं स्पष्टीकरण

 • 29 Jun 2022 12:06 PM (IST)

  Maharashtra Floor Test Date : काँग्रेस आमदारांची आज दुपारी एक वाजता बैठक

  काँग्रेस आमदारांची आज दुपारी एक वाजता बैठक

  विधानभवनात पार पडणार काँग्रेस आमदारांची बैठक

  राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश

  बैठकीत औरंगाबाद नामांतराच्या प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता

 • 29 Jun 2022 12:03 PM (IST)

  MVA Government : नाना पटोले पटोले म्हणतात...

  शिवसेनेने कोर्टात जी भूमिका मांडली तीच काँग्रेसची भूमिका

  नाना पटोले यांचं स्पष्टीकरण

 • 29 Jun 2022 12:00 PM (IST)

  Maharastra Political Crisis : उद्याचा दिवस काय घेऊन येणार? काय घेऊन जाणार?, चित्रा वाघ यांचं ट्विट

  'उद्याचा दिवस काय घेऊन येणार? काय घेऊन जाणार?'

  चित्रा वाघ यांचं ट्विट

 • 29 Jun 2022 11:50 AM (IST)

  Rajyapal of Maharashtra : महाधिवक्ता, राज्यपालांमध्ये भेट

  महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी आणि राज्यपाल कोश्यारी यांच्यात भेट

 • 29 Jun 2022 11:47 AM (IST)

  बाळासाहेब ठाकरेंचं हिंदूत्व जोपासणारा मी माणूस, एकनाथ शिंदे यांचं ट्विट

  बाळासाहेब ठाकरेंचं हिंदूत्व जोपासणारा मी माणूस

  एकनाथ शिंदे यांचं ट्विट

 • 29 Jun 2022 11:38 AM (IST)

  Maharashtra Floor Test Date : राष्ट्रवादीचे आमदार मुंबईसाठी रवाना, सूत्रांची माहिती

  राज्यपालांचे बहुमत चाचणीचे आदेश

  राष्ट्रवादीचे आमदार मुंबईसाठी रवाना

  आज रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीचे सर्व आमदार मुंबईला पोहचणार

  15 ते 20 आमदार मुंबईत आहेत

  सूत्रांची माहिती

 • 29 Jun 2022 11:31 AM (IST)

  Meaning of Floor Test in Politics : भाजप आमदारांची आज संध्याकाळी 7 वाजता मुंबईत बैठक

  भाजप आमदारांची आज संध्याकाळी 7 वाजता मुंबईत बैठक

  मुंबईतील हॉटेल ताजमध्ये भाजप आमदारांची बैठक

  बैठकीला सर्व आमदारांनी उपस्थित राहण्याचे आदेश

  राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदारांच्या बैठकीचे आयोजन

  भाजपचे अनेक आमदार मुंबईत दाखल

  देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक

 • 29 Jun 2022 11:28 AM (IST)

  Maharastra Political Crisis : आसाममधील पूरग्रस्त शिंदे गटाकडून 51 लाख रुपयांची मदत

  आसाममधील पूरग्रस्त शिंदे गटाकडून 51 लाख रुपयांची मदत

  शिवसेनेचे बंडखोर आमदार तसेच सहयोगी आमदारांच्यावतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीला मदत

  51 लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय

 • 29 Jun 2022 11:23 AM (IST)

  Shivsena News : मुंबईच्या माजी महापौर पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी

  मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना धमकीचं पत्र

  'सरकार पडू दे, अन्यथा तुला मारू'

  मुंबईच्या माजी महापौर पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी

  'अश्या पत्रांना आम्ही घाबरत नाही पण दखल घेणं गरजेचं'

  पेडणेकरांकडून पोलिसात तक्रार दाखल

 • 29 Jun 2022 11:05 AM (IST)

  Maharastra Crisis : गुलाबराव पाटील म्हणतात...

  "कुछ लगता नहीं दुश्मनी बनाने में, उम्न बित जाती है दोस्ती निभाने में..."

  गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

  शिंदे गटाची बैठक

  गुलाबराव पाटलांचं दमदार भाषण

  उद्धव ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला

  शिवसेनेच्या आमदारांना सोडलं

  पण पवारांची साथ सोडली नाही

  गुलाबराव पाटील यांचं विधान

 • 29 Jun 2022 10:51 AM (IST)

  Rajyapal of Maharashtra : संध्याकाळी 5 वाजता कागदपत्रं सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

  ठाकरे सरकारच्या 'भविष्याची परिक्षा'

  शिवसेनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

  शिवसेनेकडून अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद

  बहुमत चाचणी कधी आहे? न्यायालयाची विचारणा

  संध्याकाळी 5 वाजता कागदपत्रं सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश

  केंद्रालाही बाजू मांडायची आहे

  महाधिवक्त्यांची कोर्टात माहिती

 • 29 Jun 2022 10:46 AM (IST)

  What is Floor Test in Politics : शुक्रवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार-सूत्र

  1 जुलैला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी

  महाराष्ट्रात स्थापन होणार नवं सरकार

  शुक्रवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार

  उद्या फ्लोअर टेस्ट झाल्यानंतर तात्काळ दुसऱ्या दिवशी शपथविधी

  विश्वसनीय सूत्रांची माहिती

 • 29 Jun 2022 10:40 AM (IST)

  Rajyapal of Maharashtra : शिवसेना आमदारांची 11 वाजता बैठक

  संजय राऊत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणार

  आमदारही मातोश्रीवर दाखल व्हायला सुरूवात

  शिवसेना आमदारांची 11 वाजता बैठक

  बांद्र्यातील कलानगरमध्ये होणार बैठक

  शिवसेनेचे आमदार मुंबईत परतायला सुरुवात

  नितीन देशमुख मुंबईत पोहोचले

 • 29 Jun 2022 10:26 AM (IST)

  Maharashtra Floor Test : शिवसेनेचे मुख्य प्रतोत सुनिल प्रभू यांच्याकडून याचिका दाखल

  बहुमत चाचणी आधी शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका

  राज्यपालांच्या बहुमत चाचणीच्या निर्णयाला विरोध

  शिवसेनेचे मुख्य प्रतोत सुनिल प्रभू यांच्याकडून याचिका दाखल

 • 29 Jun 2022 10:21 AM (IST)

  Floor Test in Maharashtra : काँग्रेस- राष्ट्र्वादीचे नेते सिल्व्हर ओकवर

  सिल्व्हर ओकवर महाविकास आघाडीची बैठक

  काँग्रेस- राष्ट्र्वादीचे नेते सिल्व्हर ओकवर

  शिवसेनेचे नेते गैरहजर

 • 29 Jun 2022 10:14 AM (IST)

  आमदार राजन साळवी यांच्याकडे शिवसेनेचं उपनेतेपद

  शिवसेनेतील बंडाळी नंतर शिवसेनेला सावरण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख यांची खेळी

  शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांना दिले शिवसेनेचे उपनेते पद

  गौरीशंकर खोत यांना सुद्धा शिवसेना जाहीर केलं उपनेतेपद

  दैनिक सामनामधून नवीन नियुक्त्या जाहीर

 • 29 Jun 2022 10:08 AM (IST)

  CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावली बैठक, सूत्रांची माहिती

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावली बैठक

  स्वतः मुख्यमंत्री घेणार बैठक

  पुढची रणनीती आखण्यासाठी बोलावली बैठक

  अजय चौधरी यांचा व्हीप आमदारांना असणार बंधनकारक

  कोर्टात जायचं की काय करायचं यासाठी पक्षाची बोलावली बैठक

  थोड्या वेळात मातोश्रीवर होणार बैठक

  विश्वसनीय सूत्रांची माहिती

 • 29 Jun 2022 10:07 AM (IST)

  BJP : उद्या ठाकरे सरकारची बहुमत चाचणी, आज दुपारी 2 वाजता भाजप नेत्यांची बैठक

  उद्या ठाकरे सरकारची बहुमत चाचणी

  आज दुपारी 2 वाजता भाजप नेत्यांची बैठक

  देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक

 • 29 Jun 2022 10:05 AM (IST)

  MVA : नामांतर प्रस्तावाआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून ठाकरेंवर दबाव

  महत्वाची बातमी! मुख्यमंत्र्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दबाव

  बहुमत चाचणीच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्यास

  संभाजीनगरच्या मुद्द्याचं काय?

  नामांतर प्रस्तावाआधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून ठाकरेंवर दबाव

 • 29 Jun 2022 09:56 AM (IST)

  Shivsena : संजय राऊत म्हणतात...

  राज्यपालांनी दिलेला बहुमत सिद्ध करण्याचा आदेश मोदींच्या राफेल पेक्षा वेगवान

  संजय राऊतांचं विधान

  राज्यपालही राजकारणात सहभागी असतील

  तर सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल- संजय राऊत

 • 29 Jun 2022 09:53 AM (IST)

  MVA : आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार- संजय राऊत

  आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार

  राज्यपालांच्या निर्णयाविरोधात संजय राऊतांची घोषणा

  विशेष अधिवेशनाचा निर्णय बेकायदेशीर

 • 29 Jun 2022 09:52 AM (IST)

  Sanjay Raut : सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार, संजय राऊत म्हणाले...

  पर्यटन सुरू आहे, पण आमदारांना मुंबईत तर यावंच लागेल

  बंडखोर आमदार मुंबईत आल्यावर बघा

  संजय राऊत यांचं विधान

 • 29 Jun 2022 09:42 AM (IST)

  भाजप आमदार मुंबईत येण्यास सुरुवात

  भाजप आमदार मुंबईत येण्यास सुरुवात

  भाजप आमदारांना आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मुंबईत येण्याच्या सूचना

  भाजपा कामाला लागले

  सर्व आमदारांनो मुंबई गाठा, रात्रीपर्यंत प्रेसिडेंशियल हॉटेलवर मुक्काम

 • 29 Jun 2022 09:33 AM (IST)

  घरचे नावडते, बाहेरचे आवडते- बंडखोर आमदार भरत गोगावले

  बंडखोर आमदार भरत गोगावले यांची शिवसेनेवर टीका

  तुमच्याकडे बहुमत आहे तर तुम्ही व्हिप बजावा-भरत गोगावले

  आमच्याकडे बहुमत असल्यानं आम्हीच व्हिप बजावणार

  ठरावीक लोक गेल्यानंतर पुन्हा दहा लोक आले, नऊ मंत्री आमच्यासोबत

  दावे करणं आणि संभ्रम निर्माण करणं, याला कुणीही बळी पडणार नाही

  किती दिवस लोकांना उपसवणार, त्यांनी थांबावं

  महाविकास आघाडीची साथ का सोडत नाही, गोगावले

 • 29 Jun 2022 09:28 AM (IST)

  शपथविधीची तारीख ठरली!

  1 जुलैला नव्या सरकारचा शपथविधी, सूत्रांची माहिती

  राज्यात घडामोडींना वेग

  महाविकास आघाडी सरकार कोर्टात जाणार

  बंडखोर मुंबईत येण्याची शक्यता, भाजपकडूनही हलचालींना वेग

  नवे मंत्री कोण असणार, याकडे राज्यभराचं लक्ष

 • 29 Jun 2022 09:21 AM (IST)

  मविआ कोर्टात जाणार

  मविआ कोर्टात जाणार

  महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत

  उद्याच ठाकरे सरकारची बहुमत चाचणी

 • 29 Jun 2022 09:13 AM (IST)

  Shivsena : बॅगा भरून तयार राहा, आपल्याला मुंबईकडे जायचंय, एकनाथ शिंदेंच्या आमदारांना सूचना

  'बॅगा भरून तयार राहा, आपल्याला मुंबईकडे जायचंय'

  एकनाथ शिंदेंच्या आमदारांना सूचना

  एकनाथ शिंदे उद्या मुंबईत येणार

 • 29 Jun 2022 09:07 AM (IST)

  MVA : उद्या बहुमत चाचणीसाठी हजर राहणार- एकनाथ शिंदे

  आम्ही बाळासाहेब आणि दिघेसाहेबांचे शिवसैनिक

  एकनाथ शिंदेंकडून पुनर्उच्चार

  उद्या बहुमत चाचणीसाठी हजर राहणार

  एकनाथ शिंदे यांची महत्वाची माहिती

 • 29 Jun 2022 08:46 AM (IST)

  Eknath Shinde : उद्या बहुमत चाचणी, मी हजर राहणार, उद्या मुंबईत पोहोचणार- एकनाथ शिंदे

  उद्या विधानसभेची बहुमत चाचणी

  बंडखोर आमदार उद्या मुंबईत पोचणार

  एकनाथ शिंदे यांची माहिती

  मी फ्लोअर टेस्टसाठी जाणार

  जी प्रक्रिया आहे ती करणार

  एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण

 • 29 Jun 2022 08:43 AM (IST)

  Maha Vikas Agahadi : उद्या बहुमत चाचणी होणार

  उद्या बहुमत चाचणी होणार

  ठाकरे सरकारची उद्या अग्निपरिक्षा

  महाविकास आघाडी बहुमत सिद्ध करू शकणार?

 • 29 Jun 2022 08:36 AM (IST)

  Eknath Shinde : आताची सर्वात मोठी बातमी!

  राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं

  बहुमत सिद्ध करण्याचे आदेश

  आताची सर्वात मोठी बातमी

  करण्याच्या उद्देशानं हे पत्र पाठवण्यता आलं

 • 29 Jun 2022 08:23 AM (IST)

  Deepak Kesarkar : आमदार गुवाहाटीमधून निघण्याची शक्यता  -दीपक केसरकर

  अधिवेशन कधीही लागेल त्यामुळे मुंबईच्या आसपास राहणं गरजेचं

  आमदार गुवाहाटीमधून निघण्याची शक्यता

  शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांची माहिती

 • 29 Jun 2022 08:19 AM (IST)

  Eknath Shinde : एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल

  एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी मंदिरात दाखल

  सकाळी साडे पाच सहाच्या दरम्यान निघाल्याची माहिती

 • 29 Jun 2022 08:06 AM (IST)

  Eknath Shinde : दुपारी 12 वाजता शिंदे गट मुंबईला रवाना होणार

  एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार आजच मुंबईत दाखल होणार- सूत्र

  एकनाथ शिंदे रेडसन ब्लू हॉटेलमधून बाहेर पडले

  दुपारी 12 वाजता मुंबईला रवाना होणार

 • 29 Jun 2022 08:01 AM (IST)

  Eknath Shinde : एकनाथ शिंदे नक्की कुठे गेले?

  एकनाथ शिंदे रेडसन ब्लू हॉटेलमधून बाहेर पडले

  एकनाथ शिंदे नक्की कुठे गेले?

  चर्चांना उधाण

  मुंबईकडे येणार का?

  कामाख्यादेवीच्या दर्शनाला गेले?

  सस्पेन्स कायम

 • 29 Jun 2022 07:40 AM (IST)

  आज राज्यमंत्रीमंडळाची बैठक

  आज राज्यमंत्रीमंडळाची बैठक

  विविध मुद्द्यांवर बैठक होणार

  महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता

  औरंगाबादच्या नामांतरणाचा प्रस्ताव येण्याची शक्यता

  आजची महत्वाची कॅबिनेट

  बहुमत चाचणीपूर्वी कॅबिनेट

 • 29 Jun 2022 07:39 AM (IST)

  बंडखोर गटाची दुपारी 12 वाजता बैठक

  बंडखोर एकनाथ शिंदे गटाची आज दुपारी 12 वाजता बैठक

  बहुमत चाचणी आधी बंडखोर आमदारांची बैठक

 • 29 Jun 2022 07:36 AM (IST)

  फडणवीसांच्या बंगल्यावर मध्यरात्री खलबतं

  देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर मध्यरात्री खलबतं

  मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, आशिष शेलार यांच्यात बैठक

 • 29 Jun 2022 07:17 AM (IST)

  बंडखोर आमदार गुरुवारी मुंबईत येणार-सूत्र

  बंडखोर आमदार गुरुवारी मुंबईत येणार

  केंद्रीय सुरक्षा यंत्रणेच्या व्यवस्थेत बंडखोर मुंबईत येणार

  बंडखोर मुंबईत येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 • 29 Jun 2022 07:08 AM (IST)

  सामनातून भाजपसह बंडखोरांवर निशाणा

  आधी डबक्यातून बाहेर पडा

  सामना अग्रलेखातून टीकास्त्र

  भाजपचं काम नारदमुनीप्रमाणं भाजप सहकाऱ्यांचा घास गिळते

  डबक्यातून बाहेर पडा, महाराष्ट्राच्या स्वर्गात या

  सामनातून भाजपसह बंडखोरांवर निशाणा

 • 29 Jun 2022 06:58 AM (IST)

  राज्यपाल 'मविआ'ला बहुमत चाचणीचे आदेश देण्याची शक्यता

  शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या  सत्ता स्थापनेच्या संघर्षात भाजप आणि राज्यपालांची थेट एन्ट्री

  देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली

  राज्यपाल राज्य सरकारला बहुमत चाचणीचे आदेश देण्याची शक्यता

 • 29 Jun 2022 06:43 AM (IST)

  ठाकरे सरकारला बहुमत चाचणीसाठी बोलवावे- देवेंद्र फडणवीस

  शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे गटाच्या  सत्ता स्थापनेच्या संघर्षात भाजप आणि राज्यपालांची थेट एन्ट्री

  देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली

  राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे केली मागणी

  सरकार अल्पमताता असल्याने बहुमत चाचणीची मागणी फडणवीस यांनी केली आहे

  बंडखोर आमदांरांच्या याचिकेची प्रत राज्यपालकांडे दिली जाईल

  या याचिकेत शिंदे गटाने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचे नमूद केले आहे.

Published On - Jun 29,2022 6:38 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें