Saamana Editorial : गुवाहाटीत ‘झाडी-डोंगर-हाटील’, महाराष्ट्रात शिवराय आणि बाळासाहेबांचे विचार! सामनातून बंडखोरांना टोला

बंडखोर आमदारांच्या गटाला महाशक्तीचा अजगरी विळखा पडलाय. हा अजगर अख्खा गिळावा तसे या गटाला गिळून पुढे जाईल, अशा शब्दांत सामनातून टीका करण्यात आली आहे.

Saamana Editorial : गुवाहाटीत 'झाडी-डोंगर-हाटील', महाराष्ट्रात शिवराय आणि बाळासाहेबांचे विचार! सामनातून बंडखोरांना टोला
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 8:05 AM

बंडखोर आमदारांना डबक्यातून बाहेर पडण्याचं आवाहान शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून (Saamana Editorial) करण्यात आलं आहे. सामना अग्रलेखातून शिवसेनेनं बंडखोर (Rebel Shiv sena Mla) आमदारांना टोला लगावला आहे. गुवाहाटीमध्ये झाडी डोंगर हाटील वगैरे आहे. पण महाराष्ट्रात शिवराय आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार आहेत. शाहू, फुले आंबेडकरांची भूमिका आहे. तेव्हा डबक्यातून बाहेर पडा, हे पहिले सांगणे आणि भाजपने या डबक्यात उडी मारु नये, हे दुसरे सांगणे, अशा शब्द अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे. शिवसेनेच्या स्थापनेनंतर राजकारणात 280 सेना निर्माण झाल्या. पण गेली 56 वर्ष टिकली ती फक्त शिवसेनाच, असंही अग्रलेखातून म्हटलंय. बंडखोर आमदारांवर 11 तारखेपर्यंत कोणतीही कारवाई करु नये, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. हा दिलासाच आहे. या दिलाशाचे लाभार्थी कोण आहेत, ते भविष्यात उघड होईलच, असाही टोला लगावण्यात आलेला आहे.

भाजपवर हल्लाबोल…

भाजप आपल्या मित्रांचा, सहकारी पत्रांचा घास गिळूनच शांत होतो, हे आता झाडीतल्या आमदारांना आणि नेत्यांना लवकरच कळेल, असाही टोला अग्रलेखातून हाणण्यात आला. बंडखोर आमदारांच्या गटाला महाशक्तीचा अजगरी विळखा पडलाय. हा अजगर अख्खा गिळावा तसे या गटाला गिळून पुढे जाईल, अशा शब्दांत सामनातून टीका करण्यात आली आहे. आता मुख्यमंत्र्यांनी या मंत्र्याची खाती काढून घेतली, पण बिनखात्याचे मंत्री त्यांच्या पदाचा राजीनामा देतील तर शपथ! उद्या महाराष्ट्रात केंद्रीय सुरक्षा घेऊन परतले तरी उंदरांप्रमाणे बिळातच लपून राहावे लागेल, अशा प्रकारची चीड आणि संपात सध्या लोकांमध्ये आहे.

रामाचे नाव आणि रावणाची कृती!

बंडखार आमदार रामाचं नाव घेतता आणि रावणाची कृती करतात, अशी तिखट शब्दांत टीका करण्यात आली आहे. सामना अग्रलेखात म्हटलंय, की…

हे सुद्धा वाचा

बंडखोर आमदार सांगतायत, की आम्ही शिवसेनेत आहोत. आम्ही शिवसेना कुठे सोडली? राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळून आम्ही इथे झाडी-झुडुपांत आलो. पण या बोलघेवड्यांपैकी बहुतेक जण राष्ट्रवादीच्या झुडुपांतूनच शिवसेनेत आले आणि मंत्री झाले. त्यांना आता महाराष्ट्राची झाडी-झुडुपू, शिवसेना आवडेनाशी झाली. महाविकास आघाडी नको ना? मग या इथे. माझ्यासमोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. नवा डाव मांडू, पण पुन्हा त्याच निष्ठेने काम करणार आहात का? रामाचं नाव घेता आणि रावणाची कृती करता! शिवसेनेची अयोध्याच जाळायला हे लोक निघाले आहेत.

वाचा महाराष्ट्रातल्या सध्याच्या राजकीय घडामोडींची लाईव्ह अपडेट्स : इथे क्लिक करा. Eknath Shinde News, Maharashtra Politics LIVE

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.