AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवार साहेब, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, पर्रिकरांच्या मुलाचं जाहीर पत्र

पणजी : दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रिकर यांनी राफेल विमानांचा व्यवहार न पटल्यामुळे संरक्षण मंत्रीपद सोडलं होतं, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला. यानंतर मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पाल पर्रिकर यांनी पवारांच्या या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या वडिलांच्या जीवंतपणी ज्याने विचारपूसही केली नाही, त्याने त्यांचं नाव राजकारणासाठी वापरु नये, […]

पवार साहेब, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, पर्रिकरांच्या मुलाचं जाहीर पत्र
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM
Share

पणजी : दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रिकर यांनी राफेल विमानांचा व्यवहार न पटल्यामुळे संरक्षण मंत्रीपद सोडलं होतं, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला. यानंतर मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव उत्पाल पर्रिकर यांनी पवारांच्या या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या वडिलांच्या जीवंतपणी ज्याने विचारपूसही केली नाही, त्याने त्यांचं नाव राजकारणासाठी वापरु नये, अशी विनंतीही पर्रिकरांच्या मुलाने केली आहे. शिवाय पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून या वक्तव्यांची अपेक्षा नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

पर्रिकरांच्या मुलाचं पत्र

आदरणीय शरद पवार साहेब, तुमचं वक्तव्य ऐकून मला आणि माझ्या कुटुंबाला धक्का बसलाय. राजकारणासाठी आणि निराधार दाव्यांसाठी माझ्या वडिलांचं नाव वापरण्याचा हा आणखी एक दुर्दैवी आणि असंवेदनशील प्रयत्न आहे. माझे वडील जिवंत असताना आणि ते आजाराशी लढत होते तेव्हाही एका नेत्याने स्वार्थाच्या राजकारणासाठी त्यांचं नाव मध्ये ओढलं होतं. त्यावेळी माझ्या वडिलांनी त्यांच्याच शब्दात त्याला उत्तर दिलं होतं.

पवार साहेब, एक ज्येष्ठ नेता म्हणून तुमच्याकडून ही अपेक्षा नाही. पण, आता तुम्ही हे वक्तव्य केलंच आहे, तर मला काही तथ्य तुमच्यासमोर आणायची आहेत. माझे वडील दिल्लीत असो किंवा गोव्यात, त्यांनी प्रामाणिकपणे देशाची सेवा केली. संरक्षण मंत्री असतानाही त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले, जे कायम स्मरणात राहतील आणि राफेल विमानांचा व्यवहार त्यापैकीच एक आहे.

यानंतर जेव्हा गोव्याच्या जनतेने पर्रिकरांना पुन्हा गोव्यात आणण्याची मागणी केली, तेव्हा पर्रिकरांनी जनतेच्या भावना लक्षात घेत पुन्हा राज्यात येण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी अखेरच्या क्षणापर्यंत गोव्यातील जनतेची सेवा केली. त्यामुळे ते राफेल व्यवहारामुळे गोव्यात आले हे म्हणणं हा पर्रिकर आणि गोव्यातील जनता यांच्या प्रेमाचा अपमान आहे. एक माजी संरक्षण मंत्री म्हणून तुम्हालाही अनेक गोष्टी माहिती आहेत, पण तुम्ही चुकीच्या माहितीला बळी पडून याचं राजकारण करत आहात.

एक आणखी वाईट वाटतं की ज्याने माझे वडील जिवंत असताना आणि आजाराशी लढा देत असताना साधी विचारपूसही केली नाही, त्याच्याकडूनच वडिलांचं नाव स्वार्थाच्या राजकारणासाठी वापरलं जातंय. आमचं कुटुंब, गोव्याची जनता दुःखामध्ये आहे. आमची तुम्हाला विनंती आहे की अशा कृत्यापासून दूर राहा.

उत्पाल पर्रिकर

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...