मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांनी सोडले उपोषण, सरकारच्या शिष्टमंडळाला यश..

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषण करण्यासाठी निघाले होते. मात्र, अचानक त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सरकारला तीन महिन्यांचा कालावधी दिला आहे.

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांनी सोडले उपोषण, सरकारच्या शिष्टमंडळाला यश..
manoj jarange patil
| Updated on: Sep 17, 2026 | 7:37 AM

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. मुंबईच्या दिशेने जरांगे पाटील निघाले होते. 19 तारखेला त्यांचे आझाद मैदानावर उपोषण होते. मात्र, आझाद मैदानावर उपोषणाकरिता त्यांना परवानगी मिळाली नाही. गणेशोत्सवात मुंबईत उपोषणाला आल्याने पोलिसांवरील तणाव वाढू शकतो, यासोबतच सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र, जरांगे यांनी मुंबईकडे कूच केली. मोठ्या ताफ्यासह जरांगे मुंबईकडे रवाना झाले. त्यातच आता सरकारला अत्यंत मोठे यश मिळाले. सरकारचे शिष्टमंडळ जरांगे यांना भेटण्यासाठी बीडला पोहोचले. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले आहे. यादरम्यान विखे पाटीलही उपस्थित होते. विखे आणि राज्यातील काही बड्या नेत्यांबद्दल शिवराळ भाषा वापरताना जरांगे दिसले होते.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 3 महिन्यांचा वेळ दिला. मुंबईकडे निघाल्यानंतर मनोज जरांगे यांनी पाणी आणि सलाईनही सोडले. त्यामुळे त्यांची तब्येत खालावली होती. 19 तारखेपासून ते आझाद मैदानावर उपोषणाला बसणार होते. मात्र, त्यांना पोलिसांकडून या उपोषणाकरिता परवानगी मिळाली नाही.

जरांगे यांनी बोलताना म्हटले की, मुक्ती संग्राम दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्यावर अन्याय अत्याचार झाला आहे. आजच्या दिवशी मराठवाड्याने निजाम घालवला आणि पहाट उगवली. आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो.  तुम्हाला कधीही उघड्यावर सोडणार नाही. गॅझेटीअर भेटल्याशिवाय मागे हटणार नाही. तुम्ही लेखी द्यावं. दुसरे आमचे शिंदे साहेबांचे मंत्री दादा भुसे, आपल्या मराठा समाजाचे आमदार प्रसाद लाड आले आहेत.

आपण ज्यासाठी अंतरवलीमध्ये सांगितला होतं. सातारा, औंध आणि बॉम्बे गॅझेटियर द्याव लागणार. तुम्ही नजर चुकीने का होईना दुर्लक्ष केल होतं. पश्चिम महाराष्ट्रमधील लोक रस्त्यावर होते. लोक पहाटेपर्यंत उभे होते हे भावना तुमच्या लक्षात आली नाही. तुम्हाला जीआरची अंमलबजावणी करावी लागणार आहे. सगळ्यात महत्वाची मागणी आहे.
58 लाखमधील नोंदी कमी होणार नाहीत हे लेखी द्यावं लागणार आहे.

त्याच वाटप करणे आणि व्हॅलिडिटी करण्यासंदर्भात त्यांनी सांगाव. मुख्यमंत्री यांनी त्यावर सही करावी किवा त्यांनी मीडियात मध्ये येवून सांगावं. नाहीतर त्यांनी मोबाईल वर सांगाव. ते संभाजीनगरला आहेत आम्ही इकडे गेलो असतो ना आम्ही मूर्ख सारखं करत नाही. 58 लाख मधील एक नोंद कमी होणार नाही. दुसरे हैदराबाद गॅझेट संख्येनुसार आणि नावा नुसार पाहिजे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us